Reading Time: 2 minutes
 • असे म्हटले जाते, “सुरक्षिततेचा अट्टाहास असुरक्षेची भावना निर्माण करतो.” इंटरनेट च्या साहाय्याने पैशासंबंधीचे सर्व व्यवहार चुटकीसरशी होऊ लागले आणि हा बदल मानवी जीवनाला कलाटणी देणारा ठरला. वेळ, बिनचूकता, निश्चितता, सहजता अशा सगळ्या पातळीवर ‘इंटरनेट बँकिंग’ खरी उतरली.
 • हे प्रगत तंत्रज्ञान लोकांच्या स्वाधीन झालं तेव्हा अजून एक ग्वाही दिली गेली, ती म्हणजे ‘सुरक्षितता’. चोरी, दरोडा अशा पैशासंबंधीच्या गुन्हेगारीला इथून पुढे चाप बसणार अशी खात्री पटली. परंतु तंत्रज्ञानामुळे सामान्य माणूस/ग्राहक प्रगत आणि जागरूक झाला तसंच या शर्यतीत गुन्हेगारही मागे राहिला नाही.
 • सायबर क्राईमच्या (Cyber crime) नोंदींची संख्या आजकाल इंटरनेट वापरकर्त्यांच्या गतीने वाढत चालली आहे, म्हणूनच अधिक अधिक सुरक्षा मिळवत असताना आपण अजून असुरक्षित होतो आहोत! अशा परिस्थितीत सामान्य माणसांनी काय करावं? इंटरनेट बँकिंग सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्याच्यातील धोक्यांमुळे बंद करावा? हे सोडून जुन्या, पारंपारिक पद्धतीनेच बँकिंग वापरावी? तर अजिबात नाही!!
 • ‘Prevention is better than cure’  असं म्हटलं जातं. सायबर क्राईम आणि सुरक्षित इंटरनेट बँकिंग च्या पद्धती यांचा थोडासा अभ्यास आणि इंटरनेट बँकिंग वापरताना बाळगलेली जागरूकता खूप मोठी संकटं टाळू शकतात. म्हणूनच जाणून घ्या काय आहेत इंटरनेट बँकिंग च धोके? ते कसे टाळावे? कोणती काळजी घ्यावी?
 • खरंतर ऑनलाईन च्या रम्य वाटणाऱ्या जगात सगळं कसं साधं सोपं सोयीचं झाल्यासारखं दिसतंय. बारा महिने चौवीस तास बँकिंगची सोय, मोबाईल किवा कॉम्पुटरच्या एका क्लीक वर झटपट होणारे व्यवहार आणि बरंच काही… पण या रंगीबेरंगी नाण्याची दुसरी बाजू बघायला हवी, कारण ती तितकीच अंधारलेली आणि त्रासदायक आहे.
 • नुकत्याच केलेल्या अभ्यासावरून हे लक्षात आले आहे की भारतात ३.२ मिलीयन हून अधिक डेबिट कार्डांची सुरक्षितात धोक्यात आली आहे.
 • इंटरनेट बँकिंग च्या हजारो फायद्या सोबत काही धोके अपरिहार्यपणे समोर येतात. आणि हे एक काळजी करण्याजोगी गोष्ट आहे.
 • तेलेनॉर कंपनीने केलेल्या सर्वे नुसार, इंटरनेट वापरणाऱ्या एकून संख्ये पैकी ३६% भारतीय ऑनलाइन घोटाळ्याना बळी पडतात. म्हणजे सरासरी ८ लाख १६ हजार रुपये प्रती व्यक्ती याप्रमाणे होणारे नुकसान चिंताजनक बाब आहे. हे घोटाळे मुख्यतः ‘फेक इमेल’ द्वारे केले जातात. फसवणुकीचे काही प्रमुख प्रकार पुढील प्रमाणे –

१. ट्रोजन:

ट्रोजन म्हणजे इंटरनेट व्हायरस! जो इंटरनेट ब्राउझिंग करताना किंवा असुरक्षित वेबसाइट्सवरून काही डाउनलोड करताना आपल्या संगणकावर येतो. एकदा आपल्या सिस्टममध्ये ट्रोजन शिरला की मालवेअर आपल्या ऑनलाइन व्यवहारांवर लक्ष ठेवते आणि पासवर्ड/ क्रेडिट कार्ड नंबर इ. संवेदनशील माहिती वाचते/चोरते.

२. फिशिंग ईमेल:

नावाप्रमाणेच,  हे फसव्या ईमे अधिकृत चॅनेलवरून येण्याचा दावा करतात. असे मेलस् एकदा कॉम्पुटर वर आले की मालवेअरकिंवा स्पायवेअरद्वारे ग्राहकांची माहिती, पासवर्ड आणि पिन मिळवते.

३. वाढीव उत्पन्न/पैसे ईमेल:

मनी म्युल्स(Money Mules) म्हणजे, जागरूक नसलेले पीडित, सर्वसाधारणपणे नोकरी शोधणारे आणि सुलभ ऑनलाइन पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे लोक आहेत.

 • मोठमोठ्या कंपन्यांकडून नोकरी मिळवण्याचे आमिष दाखवून गरजू लोकांना आकर्षित केले जाते आणि त्यांना छोट्याश्या कामासाठी भरपूर कमिशन किंवा होम जॉबकडून अर्धवेळ कामासाठी मोठ्या पगाराची ऑफर दिली जाते.
 • कधी फसवणुकदार आपल्याला गुंतवणूकीच्या रूपात आगाऊ पैसे भरण्यासाठी विचारतो.  ज्याबाद्ल्यात तुम्हाला बरीच परतफेड मिळेल असे आश्वासन दिले जाते.
 • किंवा कमिशन दिले जाते आणि आपल्या खात्याचा वापर करुन व्यवहार करायला सांगितले जाते. अशाप्रकारे आपल्या बँक खात्याचा तपशील विचारून घेईल आणि त्यात पैसे जमा करेल.
 • याहीपुढे जाऊन इतर इतर कोणत्यातरी व्यक्तीच्या खात्यांमध्ये कमिशन देऊन पैसे हस्तांतरित करण्यास सांगेल. असे निधी हस्तांतरण बरेचदा अवैध असते आणि याप्रकारे तुम्ही गुन्हेगारी गैरव्यवहारांमध्ये खेचले जाऊ शकते.
 • स्मार्ट फोन्स वापरण्यात अजून एक मोठी जोखीम आहे आज मोबाइल द्वारे फसवणूकीचा धोका इतर मार्गापेक्षा जास्त आहे. बरेच वापरकर्ते त्यांच्या फोनवर अॅप्स डाउनलोड करतात जे त्यांच्या डेटा आणि फोनवरील माहिती आणि इतर अॅप्समध्ये बिनशर्त प्रवेश करतात. हे मालवेअरअॅप्स आपल्या मोबाइल बँकिंग वापरावरीलवरील आपल्या इनपुटची माहिती मिळवू शकतात आणि संवेदनशील डेटा प्राप्त करू शकतात. लक्षात ठेवा, तुमची बँके संदर्भातली माहिती फक्त तुमच्याकडे सुरक्षित रुपात राहिली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत अशा संवेदनशील माहितीचे हस्तांतरण फार महागात पडू शकते.

 

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2yByQYh )

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutes मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.