Reading Time: 2 minutes

आज आपण जाणून घेऊया, ईटिएफ (इंडेक्स) किंवा एक्सचेंज ट्रेडेड इंडेक्स फंडविषयी!

आपल्याकडील बीएसइ (BSE) आणि एनएसइ (NSE) या दोन्ही शेअर बाजारामध्ये निरनिराळे इंडेक्स असतात. उदाहरणार्थ, सेन्सेक्स-30, निफ्टी-50, BSE-100, BSE -BANKEX, BSE-Pharma, BSE-IT वगैरे. ह्या इंडेक्समध्ये सहभागी असलेल्या कंपन्या त्या बाजाराचे किंवा विशिष्ट क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतात. इंडेक्स जेव्हा वर खाली जातो तेव्हा तो त्या बाजारातील किंवा क्षेत्रातील कंपन्यांचा बाजारातील कल दर्शवितो. 

आपल्याला माहितीच आहे की म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच प्रकारच्या समभाग संबंधित योजना असतात. सेबीच्या नियमानुसार प्रत्येक योजनेच्या संबंधित इंडेक्सला बेंचमार्क मानून त्या योजनेच्या कामगिरीशी शेअर बाजारातील संबंधित इंडेक्सशी तुलना केली जाते. 

उदाहरण द्यायचे झाल्यास, जर एखादा लार्जकॅप कॅटेगरी मधला फंड असेल व त्याचा बेंचमार्क इंडेक्स निफ्टी-५० असेल, तर वेगवेगळ्या कालावधीसाठी योजनेने दिलेला परतावा आणि त्या बेंचमार्क इंडेक्सने दिलेला परतावा याची तुलना केली जाते. योजनेने सातत्याने बेंचमार्क परताव्यापेक्षा जास्त परतावा दिला, तर त्या विधी व्यवस्थापकाची (फंड मॅनेजर) कामगिरी चांगली मानली जाते.  

आता समजा गुंतवणूकदाराला प्रत्यक्ष बेंचमार्कमध्ये गुंतवणूक करायची आहे, तर त्याला कोणते पर्याय उपलब्ध आहेत? 

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना दोन पर्याय देतात.

  • इंडेक्स फंड:-
    • या योजनेचा प्रकार हा कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेसारखाच असतो. 
    • इंडेक्स फंडाचा गुंतवणूक पोर्टफोलिओ हा त्या इंडेक्स मधील अधोरेखित समभागांच्या टक्केवारी इतकाच असतो. 
    • जेव्हा आपण रु.५,००,००० सेन्सेक्स इंडेक्स खरेदी करतो तेव्हा आपण प्रत्यक्षात सेन्सेक्समधील ३० कंपन्यांचे समभाग त्यांच्या इंडेक्स मधील टक्केवारीप्रमाणे आपण खरेदी करतो. अशा प्रकाच्या योजनेचा व्यवस्थापन खर्च हा इतर योजनांपेक्षा थोडा कमी असतो. 
  • एक्सचेंज ट्रेडेड इंडेक्स फंड:
    • म्युच्युअल फंड ही योजना चालू करून ती शेअर बाजारामध्ये सूचिबद्ध करतात. 
    • ह्या योजनेमध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांना त्यांचे शेअर साठीचे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. 
    • सुरुवातीच्या काळात जमा झालेल्या रकमेचे युनिट्स संबंधित गुंतवणूकदाराच्या डिमॅट अकाउंटमध्ये जमा केले जातात. पुढील कामकाज हे शेअर बाजारातील समभागाप्रमाणे चालते.
    • आपल्या डिमॅट अकाउंटला असलेले इंडेक्स फंडचे युनिट्स हे समभागाप्रमाणे आपण आपल्या स्टॉक ब्रोकरच्या मार्फत बाजारामध्ये विकू शकतो किंवा नवीन खरेदी करू शकतो. 
    • बाजारामध्ये जर युनिट्स खरेदी करणं शक्य नसेल म्हणजेच जर कोणी युनिट्स विकणारा नसेल, तर म्युच्युअल फंडाला युनिट्सची रक्कम अदा केल्यास, म्युच्युअल फंड बाजारातील खरेदीने तयार झालेले नवीन युनिट्स गुंतवणूकदाराच्या डिमॅट अकाउंटवर जमा करते. 
  • म्युच्युअल फंडाने योजना शेअर बाजारात सूचिबद्ध केल्याने यात व्यवस्थापन खर्च अत्यल्प असतो. मात्र जेव्हा आपल्याला स्टॉक ब्रोकरमार्फत इंडेक्स फंडाचे युनिट्स खरेदी किंवा विक्री करायचे असतात तेव्हा स्टॉक ब्रोकरच्या कमिशनचा भार गुंतवणूकदाराला उचलावा लागतो.
  • एखाद्या इक्विटी समभागाप्रमाणे दिवसभरात कधीही आपण आपल्या इंडेक्स फंडातील युनिट्सचे व्यवहार करू शकतो. ह्या योजनेतील गुंतवणुकीला कर प्रणाली जी आहे ती इक्विटी समभागाला लागू असलेली करप्रणाली असते.
  • भारतातील म्युच्युअल फंड योजना अजूनही बेंचमार्क परताव्यापेक्षा जास्त परतावा देत आहेत, तसेच आपल्या देशात काही ठराविकच इंडेक्स असल्याने, आपल्याकडे अजून एक्सचेंज ट्रेडेड इंडेक्स फंड लोकप्रिय झाले नाहीत. मात्र बऱ्याचशा प्रगत देशांमध्ये एक्सचेंज ट्रेडेड इंडेक्स फंड लोकप्रिय आहेत.
  • प्रगत देशांमध्ये साधारण ७०-८० % गुंतवणूक शेअर बाजार, कर्जरोखे, म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड इंडेक्स फंड मध्ये होते, अमेरिकेत १२०० पेक्षा अधिक प्रकारचे एक्सचेंज ट्रेडेड इंडेक्स फंड आहेत. आपल्याकडे गुंतवणुकीच्या साधनांची मूलभूत अर्थसाक्षरता नसल्याने बहुतेक गुंतवणूकदार पारंपरिक गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करतात. 

गुंतवणुकीच्या प्रक्रियेत आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, आपल्या मित्र परिवारातील लोकांना अर्थसाक्षर अभियानात जोडा, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मदत करा. 

धन्यवाद!

– निलेश तावडे. 

[email protected]

(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्ष कार्यरत होते, सध्या ते गुंतवणूक सल्लागार आहेत.)

म्युच्युअल फंड संबंधित काही रोचक माहिती

उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस

भारतीय स्टॉक एक्स्चेंज आता जर्मनीपेक्षाही सरस

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:  https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…