Investment strategies
https://bit.ly/31EgfcL
Reading Time: 3 minutes

 जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गुंतवणूक कशी कराल?

गुंतवणुकीचे सूत्र (Investment strategies)

गुंतवणुकीस सुरुवात करण्याची योग्य वेळ कोणती असे जर का कोणी विचारले तर त्याचे उत्तर असेल ‘शुभस्य शीघ्रम’! गुंतवणूक सुरु करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते. परंतु, ती करताना आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यावर कशी आणि कुठे करायची (Investment strategies) हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आपला पैसा जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर कसा गुंतवायचा याबद्दलची माहिती आपण आजच्या लेखात घेणार आहोत.  

नील एकदम खुशीत त्याची बचत केलेली रक्कम मोबाइल मधून बाबांना दाखवत होता. नीलचे बाबा म्हणजे आर्थिक क्षेत्रामध्ये एकदम गुरु. मागच्याच वर्षी बँकेच्या नोकरीतून रिटायर्ड झालेले आणि भक्कम पेन्शन घेणारे गृहस्थ. आजच्या जनरेशनची उधळपट्टी माहीत असलेल्या नीलच्या बाबांना त्याचे कौतुकच वाटले. त्यांच्या मनात विचार आला हीच योग्य वेळ आहे त्याला गुंतवणुकीबद्दल माहिती द्यायची.

हे नक्की वाचा: अनिश्चित उत्पन्न आणि गुंतवणूक नियोजनाच्या ५ स्टेप्स 

नीलचे बाबा बोलायला लागले,

“नील, तू बचत तर छान करतो आहेस. मात्र तू सांग अशी बचत आणखी काही वर्ष जरी केलीस तरी यात फारशी वाढ होणार नाही. तेच जर तू हे आता गुंतवायला सुरुवात केलीस तर नक्की तुला याचा उत्तम परतावा मिळेल.”

“आता तर सुरुवात आहे बाबा. अजून काही वर्षानी करतो की गुंतवणूक”,  नील म्हणाला.

तसे बाबा म्हणाले, चालेल ना तुला जेव्हा पण गुंतवणूक सुरू करायचिये तेव्हा करू शकतोस. मात्र त्या आधी कोणत्या वयामध्ये कशाप्रकारे गुंतवणूक करणे योग्य ठरेल ते तर ऐक.”

तसा नील कान देऊन ऐकायला लागला,

Investment strategies:  जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरील गुंतवणूक 

तरुण वर्ग –

  • हा वर्ग नुकताच नोकरीला लागलेला अथवा नोकरीला लागून काही वर्ष झालेला आणि अजून फारशी आर्थिक जबाबदारी नसलेला असल्याने गुंतवणुकीचे अनेक मार्ग यांच्यासाठी खुले असतात.
  • सर्वप्रथम नुकतीच नोकरी चालू झाली असल्यास आपले बँकेमध्ये खाते उघडून त्यामध्ये पगाराची रक्कम जमा व्हावी याची व्यवस्था करा. 
  • खर्च जाऊन उरलेले पैसे खात्यात जमा असू द्या. तीन ते सहा महीने आपण निर्वाह करू शकू इतकी रक्कम खात्यावर जमा ठेवा आणि यानंतर गुंतवणुकीचा विचार आपण करू शकतो.
  • गुंतवणूक किती करायची या पेक्षा ती करायला लवकर सुरू करणे गरजेचे आहे.
  • जर आपल्याला टॅक्स मध्ये फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी म्यूचुअल फंडच्या काही योजना आहेत. शिवाय इन्शुरंस या वयात काढणे देखील उत्तम ठरते. 
  • निवृत्ती अजून खूप लांब असली तरी आजकाल खाजगी असो वा शासकीय, नोकर्‍यांमधील अस्थिरतेमुळे आत्तापासून निवृत्तीसाठी योजना करायला हरकत नाही. 
  • पी.पी.एफ. मध्ये काही रक्कम महिन्याला जमा होऊ द्या. यात मिळणार्‍या चक्रवाढ व्याजाचा फायदा नक्की घ्या. हे टॅक्स फ्री असते.
  • हे झाले दीर्घकाळसाठीची गुंतवणूक. याशिवाय स्टॉक, बॉन्ड, म्यूचुअल फंड यामध्ये देखील गुंतवायला सुरुवात करा. 
  • यामध्ये सतत लक्ष ठेवेने, योग्य वेळी रक्कम टाकणे आणि काढणे आणि सतत मार्केटचा अभ्यास करणे महत्वाचे ठरते. यासाठी जाणकारचा सल्ला घ्या.
  • पुढे चालून आपल्याला आपल्या निवृत्ती ठेवीमध्ये 15% पर्यन्त योगदान द्यायचे आहे. तेव्हा त्याप्रमाणे थोडी थोडी सुरुवात करून आपल्याला निवृत्तीसाठीची बचत/गुंतवणूक 15% पर्यन्त आणायची आहे. यातही जोपर्यंत ही रक्कम 15% होत नाही तोपर्यंत वर्षाकाठी 1 ते 2 टक्क्यांनी वाढ करत जावी.  

महत्वाचा लेख: करिअरच्या सुरुवातीला गुंतवणूक करणे का आवश्यक आहे? 

मध्यमवयीन वर्ग –

  • हा वर्ग म्हणजे बर्‍यापैकी स्थैर्य मिळालेला वर्ग असतो. त्याबरोबरच त्यांच्या जबाबदर्‍या देखील वाढलेल्या असतात. 
  • त्यांना मुलांचे शिक्षण, लग्न या गोष्टी देखील गृहीत धराव्या लागतात. त्यायोगे गुंतवणुकीमध्ये थोडाफार बदल करावाच लागतो.
  • सर्वप्रथम जी जोखमीची गुंतवणूक आहे जसे की शेअर्स, बॉन्ड, मनी मार्केट इ. मधील गुंतवणूक थोडी कमी करावी आणि केलेल्या गुंतवणुकीकडे लक्ष असू द्यावे. 
  • या ऐवजी आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता. कारण या पाठोपाठ सोन्यामध्ये आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो.
  • असे म्हटलेलेच आहे की सेकंड ओपिनियन घेणे नेहमी फायद्याचे ठरते. त्यामुळेच आपण केलेल्या गुंतवणुकीसाठी आपण एखाद्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला नक्की घेऊ शकता. जेणेकरून तो योग्य असे इतर पर्याय देईन तसेच जोखमीच्या पर्यायांपासून सावध करेल.
  • मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी वेगळी तरतूद करा. त्यासाठी देखील वेगवेगळ्या योजना आहेत, त्यामध्ये गुंतवणूक करता येईल.
  • जीवनात बरीच संकटे अनपेक्षितपणे येतात. त्यासाठी आपल्या विमा योजनेचे पुनरावलोकन करा.
  • विमा योजनेत गुंतवणूक केली नसेल तर विमा योजना काढा. जेणेकरून अचानक झालेल्या अपघातामध्ये आलेला खर्च विमा योजनेतून भरला जाईल आणि आपल्याला निवृत्तीच्या ठेवेमधून रक्कम उचलायची गरज पडणार नाही.

इतर महत्वाचे लेख: तिशीनंतरचे आर्थिक नियोजन – गुंतवणूक नियोजन

उतारवयीन वर्ग –

  • जर अगदी कमी वयात आपण गुंतवणुकीस सुरुवात केली असेल तर या टप्प्यामध्ये आपल्याला एक वेगळेच स्थैर्य लाभलेले असेल. 
  • मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी योग्य वेळी तरतूद करून ठेवली असल्यामुळे त्याचाही ताण कमी झालेला असतो. मात्र जरी आपल्यावर मालमत्ता इ. साठीचे कर्ज असेल तरी ते निवृत्तीच्या आधी संपवायचा प्रयत्न करा.
  • आता मोठ्या जोखीमी घेणे टाळायच्या उद्देशाने हळूहळू बॉन्ड, मनि मार्केट इ. मधील गुंतवणूक थांबवावी आणि अशा ठिकाणी गुंतवणूक करावी जेणेकरून आपल्याला जीवनशैलीसाठी पैशाचा प्रवाह सुरू राहील. म्हणजेच निवृत्तीनंतर देखील आर्थिक स्थैर्य लाभेल.
  • निवृत्तीनंतर निवृत्त लोकांसाठी असलेल्या जास्तीच्या व्याजदराचा आपण लाभ घेऊ शकता.
  • निवृत्तीनंतर पी.एफ. मधून मिळालेल्या रकमेसाठी देखील आपण योग्य योजनेचा लाभ घेऊ शकता जसे की, सीनियर सिटीजन सेविंग स्कीम, पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम इ.

विशेष लेख: आर्थिक नियोजनाची सप्तपदी

“जरा जास्तच पुढचे सांगतोय ना?”असं म्हणून नीलचे बाबा हसले.

“नाही बाबा, उलट यामुळे मला कोणत्या टप्प्यामध्ये कशी गुंतवणूक करावी हे समजले. तसेच, कमी वयात गुंतवणूक करण्याचे फायदे देखील समजले”. नील आनंदाने म्हणाला.

नक्कीच! योग्य वयात गुंतवणूक करणे फायद्याचे असतेच. मात्र जरी गुंतवणूक करण्यास उशीर झाला असे आपल्याला वाटत असेल, तर लक्षात ठेवा “काहीही न करण्यापेक्षा उशिरा केलेले केव्हाही उत्तम!”  

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel – CLICK HERE

Download Arthasakshar AppCLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Investment strategies Marathi Mahiti, Investment strategies in Marathi, Investment strategies Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…