Arthasakshar Financial Planning & investment planning in Marathi
Reading Time: 3 minutes

गुंतवणूक नियोजन

गुंतवणूक नियोजन हा कोणत्याही आर्थिक नियोजनाचा पाया आहे. मागच्या लेखात आपण तिशीनंतरचे आर्थिक जीवन आणि नियोजन यासंबंधीचे काही मुद्दे पाहिले. या लेखात आपण आणखी काही मुद्द्यांचा व तिशीनंतर गुंतवणूक नियोजन कसे करायचे, याबद्दल माहिती घेऊ. 

यशस्वी गुंतवणूकदाराची वैशिष्ट्ये- भाग १

आपल्या वेळेची किंमत ओळखा.  

  • काहीही झालं तरी वेळ कुणासाठी थांबत नाही आणि एकदा गेलेली वेळ परत येत नाही. गुंतवणूक नियोजन करताना वेळेला अत्यंत महत्व असते. 
  • आयुष्यात पैसा कितीही महत्वाचा असला तरी प्रत्येक वेळी तुम्ही आयुष्यातला भरमसाठ वेळ पैश्यासाठी खर्ची घातलाच पाहिजे असं नाही. 
  • पैसा हे आयुष्यात सोयीसुविधा मिळविण्याचं माध्यम असलं तरी त्यापलीकडे पैशापेक्षा वेळ जास्त महत्वाची आहे.
  • गरजेपुरता पैसा मिळविण्यापुरतं काम झालं की उरलेला वेळ स्वतःच्या प्रगतीमध्ये म्हणजेच स्वतःसाठी वापरा.

यशस्वी गुंतवणूकदाराची वैशिष्ट्ये-२…

योग्य गुंतवणूक पद्धतीनेच गुंतवणूक नियोजन यशस्वी करा

  • आपल्यापैकी बरेच जण सामान्यत: लहान वयातच बचत करण्यास सुरवात करतात. 
  • वाढत्या वयासोबत जे काही बाकी उरते त्यातून ते मोठे झाल्यावर गुंतवणूक सुरु करतात. 
  • इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे, आयुष्यात बऱ्याच उशिरा गुंतवणूक करण्यास सुरुवात करणे ही काही गुंतवणूक करण्याची योग्य पध्दत असू शकत नाही. 
  • यशस्वी गुंतवणूकीचे गमक म्हणजे आपल्या विशीच्या सुरूवातीसच गुंतवणुकीस प्रारंभ करणे. 
  • आयुष्यात आपण जितक्या लवकर गुंतवणुकीस सुरुवात करू तितका जास्त वेळ आपल्याला आपल्या स्वप्नातली संपत्ती निर्माण करण्यासाठी मिळेल.

गुंतवणूकदारांच्या ५ मूलभूत चुका

स्वत:चा आणि आपल्या प्रियजनांचा विमा उतरवून घ्या

  • आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून किंवा कधीकधी आपल्या स्वतःच्या अनुभवांवरून आपल्या लक्षात आलेच असेल की वैद्यकीय सोयीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि भविष्यातही त्या उत्तरोत्तर वाढतच जाणार आहेत. 
  • साहजिकच अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या लहानमोठ्या आजारांसाठी आणि त्यातून उद्भवणाऱ्या महाकाय खरचला सामोरे जाण्यासाठी आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या आरोग्य विम्याचे महत्व अधोरेखित होते. 
  • आरोग्य विम्यामुळे गुंतवणूक नियोजन यशस्वी होण्यास मदत होते. 

करिअरच्या सुरुवातीला गुंतवणूक करणे का आवश्यक आहे?

दीर्घकालीन गुंतवणूकीचा विचार करा

  • गुंतवणूक नियोजन करताना दीर्घकालीन गुंतवणूक नियोजन अवश्य करा.
  • बचतीच्या सोबतच गुंतवणुकीतूनही, त्यातही दीर्घकालीन गुंतवणुकीतून आपल्याला आपल्या अनेक उद्दिष्टांची पूर्ती करता येते. मग ते मनासारखे छंद जोपासणे असो, एकाद्या आवडत्या ठिकाणाला भेट देणे असो, किंवा काही नवीन उपक्रम सुरु करणे असो. 
  • अशाप्रकारच्या क्रियाकल्पांना बऱ्याचदा एकरकमी पैशांची गरज पडते आणि अशावेळी केलेली गुंतवणूक कमी येते. 
  • गुंतवणुकीचा उद्देश ठराविक काळासाठी ठेवलेल्या पैशांवर चांगला परतावा मिळविणे हा असतो. त्यामुळे बचत ही जरी अडी-अडचणीसाठी बाजूला काढून ठेवलेली रक्कम असली तरी गुंतवणूक ही वाढती रक्कम असते आणि ठराविक काळाच्या नियोजनातून त्यातून अपेक्षित अर्थप्राप्ती होऊ शकते. 

राकेश झुनझुनवाल – भारतीय शेअर बाजारातील बादशाह

अपत्यांच्या खर्चाचे नियोजन 

  • नुकतेच लग्न झाले असेल आणि लहान मुले असतील किंवा येण्याच्या मार्गावर असतील, तर त्यांच्या भावी आयुष्यातील खर्चाचे नियोजन करण्याचा हाच योग्य काळ आहे. 
  • त्यांच्या रोजच्या खर्चापासून ते त्यांच्या आजारपण आणि शिक्षणाच्या खर्चासाठी लागणारी रक्कम त्यासंबंधीच्या आर्थिक नियोजनातून अतिशय शिस्तबद्धरित्या उभी करता येऊ शकते. 

आपल्या गुंतवणूकींमध्ये विविधता आणा

  • इंग्रजीमध्ये एक म्हण आहे:डोन्ट पुट ऑल युवर एग्ज इन वन बास्केट”. तेच सूत्र गुंतवणुकीच्या बाबतीतही लागू होते. 
  • गुंतवणुकीच्या बाबतीत आणि त्यातून मिळणाऱ्या परताव्याच्या बाबतीत केवळ एकाच उत्पनाच्या स्रोतांवर अवलंबून राहणे बऱ्याचदा अनावश्यक आर्थिक धोक्याला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे आर्थिक क्षेत्रातले जाणकार बऱ्याचदा गुंतवणुकीमध्ये विविधता ठेवण्याचा सल्ला देतात. 
  • उत्पन्नाच्या परताव्यामध्ये जरी विविधता आली तरी दुर्दैवाने एकाद्या उत्पन्न स्त्रोतामध्ये काही चढ उत्तर झाले तरी त्याचा परिणाम इतर ठिकाणच्या गुंतवणुकीमधून आणि त्यातून मिळणाऱ्या परताव्याच्या माध्यमातून भरून काढला जाऊ शकतो. 

गुंतवणुकीची ८ प्रमुख कारणे…

निवृत्तीनंतरचे नियोजन

  • तिशीत प्रवेश करताना, साठीचा आणि त्यानंतरच्या जीवनाचा विचार करणेही क्रमप्राप्त आहे. 
  • बरेचसे लोक तिशीत प्रवेश करताना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनाचे नियोजन सुरु करतात. 
  • तुमच्या आर्थिक गरजा कशा आहेत, तुमचा जीवनमानाचा स्टार कसा आहे याच्या अनुरूप तुम्हाला निवृत्तीनंतर मासिक किती रक्कम लागेल आणि त्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल याचा विचार करून आर्थिक तसेच गुंतवणूक नियोजन करा.
  • यासाठी अनेक ऑनलाईन कॅल्क्युलेटर्स व ॲप्स उपलब्ध आहेत, त्याचा वापर करू शकता. 

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन…

अनावश्यक ताण टाळा

  • तिशीमध्ये आयुष्यात अनेक आघाड्यांवर जरी धावपळ सुरु असली तरी त्याचबरोबर स्वतःच्या शरीराची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे हे स्वतःला पटवून द्या. 
  • गेलेला पैसे पुन्हा उभा करता येतो पण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जर राखता आले नाही, तर त्याचे केवळ आपल्या स्वतःवरच नाही, तर आपल्या कुटुंबातील सदस्यांवरही अनेक दूरगामी परिणाम होऊ शकतात. 
  • या संकटातून पूर्ववत होण्यासाठी पुन्हा आर्थिक ताण पडून उपचार घ्यावे लागतात तो भाग वेगळाच. 
  • त्यामुळे सतत उद्यमी राहणे जरी आवश्यक असले तरी आपले आणि आपल्या जवळच्या लोकांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणे हि देखील आपली जबाबदारी आहे याचे भान असू द्या. 

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search: guntvnuk, Guntvnuk niyojan kase karal in marathi, aarthik niyojan marathi mahiti, Investment Planning in Marathi, Financial planning in marathi 
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…