PPF
Reading Time: 2 minutes

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF)

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) हा आजही आपल्याकडील करबचतीच्या सर्वाधिक लोकप्रिय पर्यायांपैकी एक आहे. अतिशय मनमानी स्वरुपाचे नियम असलेला हा मोगलाईछाप पर्याय लोकप्रिय का असावा, हे मला नेहमीच पडलेले एक कोडे आहे.

आजपर्यंत 7.1% मिळत असलेले PPF मधील सर्व शिलकीवरील(balance) व्याज उद्यापासून 6.4% च मिळेल, म्हणजेच व्याजदरात जवळजवळ 10% घट. मी ज्याला मोगलाई म्हणतो, ती हीच बरं!

PPF: सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीचे त्रिदोष:

  • एखादी व्यक्ती जेव्हा कोणत्याही बॅंकेत मुदत ठेव (FD) ठेवते. त्या दिवशीचा चालू व्याजदर ठेवीच्या पूर्ण कालावधीकरिता बँकेकडून लिहून घेते. पुढे व्याजदरांचे काहीही होवो.
  • या ‘PPF’ मध्ये मात्र तसे नाही.12/11/10 टक्के जो असेल तो व्याजदर फक्त पैसे ठेवतानाचे दिवशी. मात्र नंतरच्या दराची कोणतीही हमी नाही. 
  • पंधरा वर्षांची प्रदीर्घ मुदत.
  • दरम्यान व्याजदरांची कुठलीही हमी नाही. मात्र त्याचवेळी पैसे काढायचे नियम जाचक. असा त्रिदोष या योजनेत प्रसाद भागवतांना आढळतो.

हे नक्की वाचा: Tax Planning: सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन (सन2020-2021)

PPF: गुंतवणूक, करबचत आणि व्याजदर 

  • एखादी योजना केवळ सरकारी मालकीची आहे म्हणजे ती सर्वोत्कृष्ट असतेच असे नाही आणि प्रत्येक खासगी पर्याय हा असुरक्षित वा कमी प्रतिचा असतो असेही नाही.
  • समजा (दुर्दैवाने) आपणावर आपल्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाला दवाखान्यात भरती करावयाची वेळ आली, तर आपला प्राधान्यक्रम काय असेल? आपण त्याला खासगी रुग्णालयात भरती कराल की सरकारी?
  • आपल्या स्वतःस, मुलास, मुलीस वा भावास एकाचवेळी नोकरीच्या दोन संधी आल्या, एकी आय.टी. कंपनी आणि दुसरी सरकारी, प्रामाणिकपणे सांगा, सामान्यतः आपण कोठली निवडाल?
  • आपण आपला नियमित पत्रव्यवहार पोस्टातून करता की खाजगी कुरियरने? 
  • आणि भ्रमणध्वनी (Mobile) ‘भारत संचारचा’ (BSNL) वापरता की…??
  • आता बाकी जवळजवळ प्रत्येक बाबतीत जेथे आपण खासगी क्षेत्र हे सेवा व सुविधा याबाबत सरस मानतो. मग फक्त गुंतवणूक (आणि विमा) याबाबत ‘सरकारी’ शब्दाचा पांगुळगाडा आपल्याला कशाला हवा बाबांनो?
  • टाटा, बिर्ला, मुर्थी, कोटक, एचडीएफसी चे पारेख (आणि अगदी अंबानीही) यांच्यासारख्या अनेकांच्या भरवशावरच आपली अर्थव्यवस्था आणि त्यामुळे सरकार चालते आणि अशा लोकांची, त्यांच्या व्यवसायांची विश्वासार्हता व कार्यक्षमता ही ‘सरकारी’ हे लेबल नसतानाही कमालीची जास्त आहे. हे मी एक गुंतवणूक सल्लागार म्हणून गेल्या 25 वर्षांच्या अनुभवाने सांगेन.असो, मुद्दा थोडा भरकटला याबद्द्ल क्षमस्व. 
  • खरं म्हणजे मी ‘PPF’ या योजनेबद्द्लचे माझे आक्षेप नोंदवित होतो. 
  • या सरकारी योजनेची व्याज आकारणीची पद्धतही मोठी चमत्कारिक आहे. दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेपर्यंतच्या किमान रकमेवरच म्हणे व्याज मिळणार आणि याहूनही आणखी तह्रेवाईकपणा असा की असे दरमहा आकारणी केलेले व्याज एकदाच, वर्षाच्या शेवटी, तुमच्या खाती जमा होणार. 
  • रोज बदलणारी ‘NAV’ देणारे फंड्स, महिन्याच्या ‘सरासरी’ शिलकीवर व्याज आकारणी करणार्‍या, मासिक, तिमाही ‘चक्रवाढ’ देणार्‍या  बॅंका  कुठे आणि ही ‘पुराणकालीन’ योजना कुठे? 

असो, या ‘लांब शिंगी कमी दुधी’ योजनेबद्दल आणखी बरीच ’बोंब’ (शिमगा स्पेशल) मारता येईल मला, पण आवरते घेतो. शेवटी सांगायचे काय, तर या 1 ते 5 तारखेपर्यंतच्या जाचक नियमामुळे नवे आर्थिक वर्ष सुरु होताच पहिल्याप्रथम, ताबड्तोबीने, धडपडत ‘PPF’ मध्ये पैसे गुंतवणून कृतकृत्य होणार्‍या मंडळींनो, 

‘PPF’ ह्या कालबाह्य पर्यायात नका पैसे ठेवू. फारफारतर दंड वाचवण्यासाठी 1000 रुपये ठेवायला प्रसाद भागवतांची ना नाही). खात्रीने सांगतो, त्यापेक्षा करबचतीचे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. शंका असल्यास मला अवश्य भेटा. अगदीच नाही तर ‘PPF’ ईतकाच सरकारी असलेला ‘NPS’ हा पर्यायही ‘PPF’पेक्षा चांगला आहे.

आणि  हो,

‘सरकारी’ या शब्दाचे भूत आपल्या मानगुटीवरून उतरायला तयार नसलेच तर,

‘PPF’ चा भरणा करायला बॅंकेत जाताना खाजगी वहानाने न जाता सरकारी परिवहन सेवेनेच जा बरं का… 

– प्रसाद भागवत

९८५०५०३५०३

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: PPF in Marathi, PPF Marathi Mahiti, PPF Marathi

Share this article on :
1 comment
  1. आज पर्यंत सेन्सेक्स चालू झाल्या पासून किती कंपनी टिकल्या आहेत?
    PPF तेव्हा पण होत आणि आता पण आहे. बंद नाही पडल.
    ८०% पेक्षा जास्त mutual funds इंडेक्स ला हरवू शकत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…