Reading Time: 3 minutes

वैयक्तिक कर्जाची गरज आणि प्रक्रिया

 • 1990 साली स्वतःचे घर बांधण्यास सुरुवात केली. कंपनीच्या नियमांप्रमाणे 1 लाख रुपये मला कर्जरूपात मिळाले. घराचा अंदाजित खर्च होता 1 लाख 60 हजार परंतु तो वाढून 2 लाखापर्यंत गेला. आज ही आकडेवारी किरकोळ वाटत असली तरी 28 वर्षांपूर्वी माझे वार्षिक उत्पन्न 20 हजाराचे आसपास असल्याने त्या तुलनेत ही रक्कम खूप मोठी होती.
 • मला मिळालेली वेतनवाढीची थकबाकी, नातेवाईक, मित्रमंडळी यांनी केलेली मदत, कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज याशिवाय 45 हजाराची तूट येत होती. ती भरून काढण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेण्याचे मी ठरवले.
 • माझा पगार एका नामवंत सहकारी बँकेत जात होता. बँकेत ओळख होती.  याशिवाय बँकेस अपेक्षित असलेले तारण ठेवण्याची माझी तयारी होती. तरीही सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही काहीतरी कारणे काढून हे कर्ज मिळण्यास मला दोन महिने लागले.
 • अशा प्रकारे बँकेच्या दृष्टीने सुरक्षित असलेले कर्ज मिळवणे एके काळी तापदायक ठरत होते. यानंतर 10 वर्षांनी याच बँकेतून याहून अधिक रकमेचे कर्ज, कागदपत्रे सादर  दिल्यापासून 3 दिवसात मिळाले. हा सर्व खाजगीकरण, उदारीकरणआणि जागतिकीकरण या (#खाउजा) धोरणाचा परिणाम.

वैयक्तिक कर्ज

 • वैयक्तिक कर्ज ही सर्वसाधारणपणे, विनातारण असतात. बँका, पतसंस्था अथवा नॉन बँकिंग कंपन्या यांच्याकडून ते आपल्याला मिळू शकते.
 • बँका , बिगर बँकिंग कंपन्या आपल्या अनुभवावर वितरित करतात. कर्ज परतफेडीची पात्रता हा त्यांचा महत्वाचा निकष असतो.
 • याशिवाय काही वित्तसंस्था एलआयसी पॉलिसी (LIC), एनएससी (NCS) यावर आपला बोजा चढवतात किंवा एक दोन हमीदार मागतात.
 • बँकाबँकांमध्ये  आणि फायनान्स कंपन्यामध्ये  असलेली तीव्र स्पर्धा यामुळे असे कर्ज देण्याच्या अटी, परातफेडीचा कालावधी, कमान /किमान कर्जरक्कम, व्याजदर यात भिन्नता आढळते.
 • हे कर्ज सामान्यतः विनातारण मिळत असल्याने त्याचा व्याजदर हा तारण कर्जाहून अधिक असतो.  सध्या अशा प्रकारच्या कर्जावरील व्याजदर किमान 11% प्रतिवर्ष आहे.
 • काही तातडीच्या अडचणींवर जसे की आजारपण, शिक्षण, लग्नाचा खर्च, घराचे नूतनीकरण, स्थावर मालमत्ता खरेदी, परदेश प्रवास, इ अशा तात्कालीक  मोठया खर्चावर मात करण्यासाठी अशी कर्जे घेतली जातात. तर काही जण असे कर्ज सुलभतेने मिळते आहे असे समजल्यावर, ते मुद्दाम घेऊन आपल्या काही इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरतात.

कर्ज वितरित करण्यासाठी, अर्जदाराची पात्रता निश्चित करण्याचे बँक आणि फायनान्स कंपन्या यांचे सर्वसाधारणपणे खालील निकष आहेत. यात त्यांच्या धेय्यधोरणानुसार थोडाफार फरक असू शकतो.

 1. अर्जदाराचे वय 18 ते 60 व्यावसायिकांसाठी 55 वर्षापर्यंत असावे.
 2. तो नोकरदार किंवा व्यावसायिक असावा.
 3. त्याची हाती येणारे मासिक उत्पन्न किमान 15 ते 25 हजार रुपये असावे.
 4. सिबिल (CIBIL) या पतमापन संस्थेकडे असलेला अर्जदाराचा पतदर्जा (rating) किमान 750 (उच्च दर्जाचे) हून अधिक असावा.
 5. नोकरदारांना कमाल 15 लाख तर व्यावसायिकांना 30 लाख रुपये वैयक्तिक कर्ज मिळू शकते.

आवश्यक कागदपत्रे:

 • यासाठी नियमाप्रमाणे अर्ज, फोटो ओळखपत्र , निवासाचा पुरावा आणि उत्पन्नाचा पुरावा व फोटो द्यावा लागतो.
 • व्यावसायिकांना मागील दोन वर्षांचा लेखपालाने प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला  लागतो. क्वचित एखादी व्यक्ती हमीदार म्हणून हवी असेल तर तिची माहिती व फोटो लागतो.
 • सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर वैयक्तिक कर्ज 48 तासात मंजूर होऊ शकते.
 • अन्य कर्जाप्रमाणे ते त्याच कारणास वापरले पाहिजे असे बंधन नसते.
 • कर्ज रक्कम जरुरीप्रमाणे लागेल तशी टप्याटप्याने घेता येते. परतफेड आपणास शक्य होईल असा हप्ता बांधून करता येते.

कर्ज प्रक्रिया:

 • bankbazaar.com या संकेतस्थळावर भेट  देऊन आपण ऑनलाईन कर्ज मागणी करू शकतो.या वेबसाईटवर  व्याजदर, प्रक्रिया फी, कर्जरक्कम ,परतफेडीची मुदत याशिवाय अन्य काही खर्च यांची तुलना करता येते.
 • वैयक्तिक कर्जामुळे आपली तत्कालीन गरज झटपट पूर्ण होते. सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), ऍक्सिस बँक (AXIS Bank) , बजाज फाईनोत्सव (Bajaj Finserv) यांनी मोठया प्रमाणात वैयक्तिक कर्ज व्यवसायावर ताबा मिळवलेला आहे.

 महत्वाचे मुद्दे:

अशा प्रकारे कर्ज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

     *आपल्याला किती कर्जाची गरज आहे ते निश्चित करावे.

     *कर्ज घेणे कोठून फायदेशीर होईल याचा शोध घ्यावा.

     *आपला पतदर्जा तपासून पहावा.

     *कर्ज करारातील बारीकसारीक तपशील वाचावा.

     *विशेषतः कर्ज मुदतीपूर्वी परत केल्यास काही आकारणी फी द्यावी लागेल अथवा नाही ते तपासावे.

     *आपल्याला योग्य अशी मुदत आणि कर्जफेड रक्कम ठेवावी.

     *आपली पात्रता, कर्जफेडीची क्षमता, व्याजदर या गोष्टी विचारात घ्यावी.

     *प्रोसेसिंग फी ची तुलना करावी.

     *कर्ज परतफेडीसाठी पुढील तारखेचे धनादेश, किंवा इसिएस (ECS), नच या सारख्या माध्यमातून परस्पर हप्ता कापण्याची सूचना देऊन ठेवावी.

उदय पिंगळे

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2AzhGLV )

(हा लेख म्हणजे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठीची शिफारस नसून यात उल्लेख केलेल्या बँक, नॉन बँकिंग कंपनी, संकेतस्थळ यांच्याशी लेखकाचा कोणताही प्रकारचा व्यावसायिक संबंध नाही.)

पर्सनल लोन विषयी सर्व काही भाग १,  पर्सनल लोन विषयी सर्व काही भाग २,

पर्सनल लोन नामंजूर होण्याची कारणे- भाग १ , नवीन वर्षात कर्जमुक्त होण्याचे ५ सोपे मार्ग

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…