Mortgage Loan
Reading Time: 3 minutes

तारण कर्ज (Mortgage Loan)

तारण कर्ज (Mortgage Loan) हे सुरक्षित कर्ज असून ते बँक, बिगर बँकिंग संस्था, सहकारी संस्था, सावकार यांच्याकडून व्यक्ती अथवा संस्था यांना देण्यात येते. सहसा हे कर्ज जमीन, घर खरेदी करण्यासाठी कमी पडणाऱ्या पैशांची पूर्तता करण्यासाठी घेतले जाते. कर्ज घेणाऱ्याची मालमत्ता गहाण ठेवलेली असल्याने ते सुरक्षित असते. कर्जदार कराराने बांधला गेल्याने ठराविक मुदतीत ठरलेली रक्कम मुद्दल व त्यावरील व्याजासह समान मासिक हप्त्यात (Equated monthly installments) देण्याचे बंधन कर्जदारावर असते. या मुदतीत कर्ज फेडले तर तारण ठेवलेल्या मालमत्तेची पूर्ण मालकी कर्जदाराकडे पुन्हा येते आणि यापुढे तिचे काहीही करण्याचे अधिकार मूळ मालकास परत प्राप्त होतात.

हे नक्की वाचा: गृहकर्ज घ्यायचं आहे? मग या गोष्टी तपासून पहा

तारण कर्ज (Mortgage Loan)

  • तारण कर्ज हे मालमत्ता कर्ज, गहाण कर्ज या नावानेही ओळखले जाते. जर कर्जदाराने कर्ज फेडले नाही तर कर्ज देणाऱ्यास तिची विक्री करून आपले पैसे परत मिळवण्याचा हक्क प्राप्त होतो.
  • तारण कर्जावर मुद्दल (Principal) , व्याज (Interest), कर आणि विमा (Taxes and Insurance)या गोष्टीं प्रभाव पाडतात.
    • मुद्दल:  कर्जदाराने मालमत्ता तारण ठेवून घेतलेली रक्कम.
    • व्याज: हे कर्ज दिल्याबद्दल कर्ज देणाऱ्यास मिळालेला आर्थिक मोबदला. यावर प्रभाव पाडणारा महत्वाचा भाग म्हणजे व्याजदर होय.
    • कर आणि विमा: कर्ज घेणाऱ्यास यामुळे आयकरात सूट मिळू शकते तर त्याने संपादित केलेल्या मालमत्तेवर विविध कर द्यावे लागतात. त्याचप्रमाणे तारण मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी आणि कर्जफेडीसाठी स्वताचा  विमा घ्यावा लागतो. या सर्वांच्या एकत्रितपणे होणाऱ्या परिणामांचा आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या आर्थिक तरतुदींचा कर्ज घेतांना अवश्य विचार करावा. त्यामुळे परतफेड सुलभ होते.

महत्वाचा लेख:  वैयक्तिक कर्जाची गरज आणि प्रक्रिया,

  • तारण कर्ज फेडण्यासाठी जे व्याज द्यावे लागते ते पूर्ण कालावधीसाठी एकसमान दराने (Fixed rate) द्यायचे की बदलत्या दराने (Adjustable rate) याची निवड कर्जदारास करता येते.
  • बाजारातील कर्जाची मागणी आणि उपलब्ध कर्ज पुरवठा यावर व्याजदर निश्चित केले जात असून ते वेळोवेळी बदलत असतात.
  • जर दीर्घकाळात व्याजदर वाढण्याची शक्यता असल्यास स्थिरदराने कर्ज घेणे फायद्याचे होते. व्याजदर कमी होत असतील तर बदलत्या दराने कर्ज घेणे अधिक फायदेशीर होते. यात कर्जदर जरी कमी / जास्त झाला तरी कर्जदाराच्या मासिक हप्त्यावर काही काही परिणाम होत नाही तर त्यांची संख्या कमी / जास्त होते.
  • व्याजदर सतत बदलत असल्याने बहुदा दिर्घ कालावधीसाठी कर्ज घेताना अनेकजण बदलत्या व्याजदाराचा पर्याय निवडतात . मात्र व्याजदर वाढले की वित्तसंस्था ज्या तत्परतेने ते वाढवतात, त्यामानाने ते  कमी झाल्यास त्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यात टाळाटाळ करतात, असा सार्वत्रिक अनुभव आहे..

महत्वाचा लेख: नवीन वर्षात कर्जमुक्त होण्याचे ५ सोपे मार्ग

  • या दोन पद्धतींशीवाय अल्प प्रमाणात, कर्जावर फक्त व्याज (Interest Only) आकारणी करायची या अटीवर देखील असे कर्ज दिले जाते. या पद्धतीत दरमहा फक्त व्याज घेतले जाते त्यामुळे मुद्दल रक्कम तीच रहाते. मुदत संपल्यावर कर्जदार एकरकमी मुद्दल रकमेची परतफेड करतो.
  • जरी हे कर्ज एकसमान हप्त्यात दरमहा द्यायचे असले तरी सुरुवातीच्या काळात मुद्दल जास्त असल्याने त्यावरील व्याज जास्त असते, त्यामुळे यात व्याजाचा भाग जास्त आणि मुद्दलाचा भाग कमी असतो. जसजशी वर्षे वाढतात तशी व्याजाची रक्कम कमीकमी होऊन मुद्दलाची रक्कम वाढत जाते. जेव्हा मुद्दल संपून जाते त्यावेळी कर्ज पूर्णपणे फिटते.
  • मालमत्तेच्या सतत वाढत असलेल्या किमतींचा विचार करता कर्जाशिवाय मालमत्तेची खरेदी करणे बहुतेकजणांना अशक्य असते. हे ‘हमीकर्ज’ असल्याने इतर कर्जाच्या तुलनेत सहज आणि कमी व्याजदराने उपलब्ध होते.
  • तारण कर्जाची मागणी करण्याऱ्याची पात्रता निश्चय करण्याचे प्रत्येक संस्थेचे निकष वेगवेगळे असले तरी काही सर्वसाधारण गोष्टींचा निश्चित विचार करण्यात येतो उदा.
    • व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न, ती पगारदार आहे की व्यावसायिक? हाती येणाऱ्या मासिक प्राप्तीच्या ६० पट रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते.
    • वय किमान २१ कमाल ६० याहून जास्त वयाच्या व्यक्तींना काही संस्था इतर गोष्टी विचारात घेऊन अधिक जोखीम स्वीकारून कर्ज देतात.
    • तारण मालमत्तेची बाजारातील किमतीच्या (Market value) ८०% रक्कम तारणकर्ज मिळू शकते.
    • कर्ज फेडण्याची क्षमता यात व्यक्तीचा कर्ज इतिहास (Credit score), त्यावर अवलंबित व्यक्ती, जबाबदाऱ्या यासारख्या गोष्टी विचारात घेतल्या जातात.
  • हे कर्ज मिळवण्यासाठी, रीतसर अर्ज, फोटो, ओळखीचा पुरावा, तारण मालमत्तेची कायदेशीर कागदपत्रे, उत्पन्नाचा पुरावा, अलीकडच्या ६ महिन्यांचा बँक खातेउतारा (Bank Statement) यासारख्या गोष्टी सादर कराव्या लागतात. याशिवाय काही रक्कम प्रक्रिया शुल्क द्यावे लागते.
  • बँकेकडून याची छाननी केली जाते. क्रेडिट स्कोर तपासला जातो. मालमत्तेचे मूल्यांकन केले जाते आणि त्यावर आलेल्या शिफारशींचा विचार करून कर्ज मंजुरी पत्र दिले जाते. त्यातील कायदेशीर अटींची पूर्तता केली की बँक कर्जदाराच्यावतीने त्याला मंजूर केलेली कर्जरक्कम एकरकमी अथवा ठराविक कालावधीत ज्याने मालमत्ता विकली, त्याच्या नावाने किंवा परस्पर त्याला देते.

– उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…