जॅक वेल्श! कॉर्पोरेट जगतातील एक मोठं नाव. गेल्या दोन दशकांपासून कॉर्पोरेट जगतात ज्यांच्या नावाचा मोठा दबदबा आहे अशा जॅक वेल्श यांचे मंगळवारी २ मार्च २०२० रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८४ वर्षांचे होते. वेल्श हे एक यशस्वी व्यवसाय व्यवस्थापक होते.
जनरल इलेक्ट्रिक या अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनीमध्ये सन १९८१ पासून सन २००१ पर्यंत वेल्श यांनी सीईओ म्हणून काम केले आहे. कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोचून, दोन दशकांपर्यंत अधिराज्य गाजवणे, ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद होती.
जनरल इलेक्ट्रिक कंपनीचे उत्पन्न वेल्श यांच्या कारकिर्दीत सुमारे पाचपट वाढून १३० बिलिअन डॉलर्सवर गेले, तर शेअर बाजाराच्या समभागांची किंमत १४ बिलिअन डॉलर्सवरून ४१० बिलिअन डॉलर्सपेक्षा जास्त झाली होती.
गुगल सीईओ “सुंदर पिचाई” यांची नवी झेप
शैक्षणिक पार्श्वभूमी आणि करिअर-
-
सन १९५७ मध्ये वेल्कयांनी “मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. त्यांनतर त्यांनी सन १९६०मध्ये इलिनॉय विद्यापीठातून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएच.डी. केली.
-
त्यांनतर ते जनरल इलेक्ट्रिकमध्ये रुजू झाले. परंतु तेथील कॉर्पोरेट नोकरशाही आणि तुटपुंजी पगारवाढ त्यांना अजिबात मान्य नव्हती.
-
लवकरात लवकर कंपनीला रामराम करून दुसरीकडे नोकरी करायचे त्यांनी ठरवले. तेथून बाहेरच पडायचे होते. परंतु काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली नाही.
-
मोठ्या कंपनीतील कार्यपद्धती त्यांना कधीच रुचली नाही. खाओ, पीओ, ऐश करो अशा आरामशीर कार्यपद्धतीचा त्यांना तिटकारा होता. याउलट आपल्या अस्तित्वाची लढाई लढत स्वतःला प्रगतीपथावर नेणाऱ्या छोटय़ा कंपन्यांमध्ये असणारी उत्साही आणि आशादायी संस्कृती त्यांना नेहमीच आवडत असे.
-
सन १९६८ मध्ये वेल्श कंपनीच्या प्लास्टिक उत्पादन विभागाचे प्रमुख झाले आणि उत्साही आणि आशादायी संस्कृती स्वतंत्रपणे राबवण्याची पहिली संधी त्यांना मिळाली.
-
त्यांनंतर सन १९७१ मध्ये धातू आणि रासायनिक विभाग त्यांच्या अधिपत्याखाली आले आणि त्यांनंतर अवघ्या दोनच वर्षांनी धोरणविषयक विभागाचे प्रमुख बनले. त्यांनंतर सहा वर्षे त्या पदावर राहिले.
-
सन १९८१ मध्ये त्यांनी जनरल इलेक्ट्रिकचे सीईओ म्हणून पद धारण केले. जनरल इलेक्ट्रिकचे पहिले सर्वात तरुण सीईओ होते.
-
सीईओ झाल्यावर त्यांना स्वत:च्या पसंतीची कार्यपद्धती कंपनीच्या संपूर्ण समूहात राबवली आणि त्यांच्या कारकिर्दीत जनरल इलेक्ट्रिक अमेरिकेमधल्या अग्रगण्य कंपन्यांपैकी एक कंपनी बनली.
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीबद्दल ८ महत्वपूर्ण गोष्टी
काय होती ही वेल्श यांची कार्यसंस्कृती?
१. भांडवल आणि संपत्ती निर्मितीवरच भर:
-
आपली कंपनी जनरल इलेक्ट्रिक आपल्या प्रत्येक उद्योगात अव्वल स्थानी राहावी यासाठी वेल्श नेहमीच प्रयत्नशील असत. कंपनी नेहमी नफ्यातच राहिली पाहिजे आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजता आली पाहिजे, हे वेल्श यांचे जीवनसूत्र होते.
-
एखादी कंपनी मानांकनात घसरू लागली की तिला बंद करावे किंवा विकून टाकावे यापैकी एका पर्यायाचा अवलंब करून वेल्श त्या कंपनीचा प्रश्न निकालात काढत असत.
-
सीईओ कार्यकाळाच्या पहिल्याच वर्षांत त्यांनी जवळपास १०० कंपन्या विकून टाकल्या होत्या.
२. सिक्स सिग्मा :
-
व्यवस्थापनशास्त्रातील ‘सिक्स सिग्मा’ हे धोरण वेल्श यांनी कठोरपणे राबवले आणि यशस्वी करून दाखवले.
-
उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यवस्थापकांना कंपनीचे भागभांडवलही दिले गेले, तर खराब कामगिरी करणाऱ्या व्यवस्थापकांची हकालपट्टी करण्यात आली.
-
वेल्श प्रचंड बुद्धिमान होते. नवीन उद्योगांची व क्षेत्रांची उत्तम जाण होती. प्रसार माध्यमे असोत वा बँकिंग प्रत्येक क्षेत्रात जनरल इलेक्ट्रिकने शिरकाव केला.
-
अर्थात कंपनीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळालं असं नाही. अनेक अडचणी आल्या पण वेल्श यांनी प्रत्येक अडचणींवर मात केली.
कोण आहेत नोबेल मेमोरियल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी?
जनरल इलेक्ट्रिकमधून निवृत्ती :
-
सन २००१ मध्ये जनरल इलेक्ट्रिकमधून निवृत्त झाल्यानंतर वेल्श ‘क्लेटन’, ‘दुबिलियर’ आणि ‘राईस’ या खाजगी इक्विटी कंपनीचे सल्लागार आणि आयएसीचे मुख्य कार्यकारी “बॅरी डिलर” यांचे सल्लागार म्हणून काम करू लागले.
-
वेल्श एक चांगला वक्ता आणि एक चांगला लेखक होते. बिझनेस वीकसाठी त्यांनी आपली पत्नी सुझी यांच्यासमवेत २००९ पर्यंत स्तंभलेखन केले होते. त्यांचं स्तंभलेखन प्रचंड लोकप्रिय झालं होतं. हा
-
सप्टेंबर २००४ मध्ये, कल्पित गुप्तचर विभागाचे उपसंचालक म्हणून काम करताना सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सीने वेल्श यांच्या व्यवस्थापन कौशल्ये वापरण्याची विडंबन प्रकाशित केली.
-
२००५ मध्ये वेल्श यांनी ‘सुझी वेल्च’ यांच्यासोबत विनिंग (Winning) हे पुस्तक प्रसिद्ध केले. हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय झाले.
वैयक्तिक आयुष्य –
-
वेल्श हे काही फार श्रीमंत घरात जन्माला आले नव्हते. त्यांची आई गृहिणी तर वडील बोस्टन अँड मेने येथे रेलरोड कंडक्टर होते.
-
वेल्श यांचे शालेय शिक्षण सालेम हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. शाळेत असताना ते उत्तम खेळाडू होते. बेसबॉल व फुटबॉलमध्ये तर प्रसिद्ध होतेच, शिवाय शाळेच्या हॉकी संघाचा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते.
-
हायस्कुलमध्ये असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत वेल्श वृत्तपत्र वितरण, शू सेल्समन आणि ड्रिल प्रेस ऑपरेटर म्हणून काम केले आहे.
-
त्यांनतर त्यांनी युनिव्हर्सिटीमधून आपलं केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. त्यावेळी नोकरीसाठी त्यांना अनेक चांगल्या कंपन्यांच्या ऑफर्स येत होत्या, परंतु वेल्श यांनी त्या नाकारल्या व आपली पीएचडी पूर्ण केली.
वैवाहिक आयुष्य-
-
वेल्श यांचे एकूण तीन विवाह झाले असून पहिली पत्नी कॅरोलिन सोबत तब्ब्ल २८ वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला होता. त्या दोघांना एकूण चार मुले होती.
-
त्यांनतर त्यांनी १९८९ मध्ये व्यवसायाने वकील असणाऱ्या जेन बीस्ले यांच्याशी विवाह केला. परंतु त्यांचा हा विवाह २००३ मध्ये संपुष्टात आला.
-
त्यांनतर त्यांनी त्यांच्यापेक्षा तब्ब्ल २४ वर्ष लहान असणाऱ्या सुझी यांच्याशी विवाह केला. सुझी या त्यांच्या विनिंग (Winning) या पुस्तकाच्या सहलेखक तसेच बिझनेस पत्रकार व दूरदर्शन समालोचक होत्या. तसेच त्यांनी “हार्ड्वर्ड बिझनेस मॅगझीन” या प्रसिद्ध मासिकासाठी “चीफ एडिटर” म्हणून काम केले आहे.
अमेरिकेत अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी प्रोत्साहन दिलेल्या भांडवलवादी संस्कृतीचे जॅक वेल्श हे प्रतिनिधी होते. त्यांच्या निधनाने कॉर्पोरेट जगतातील एक मोठा अध्याय संपुष्टात आला आहे.
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/