गुगल सीईओ “सुंदर पिचाई” यांची झेप

Reading Time: 2 minutes
 • तंत्रज्ञान क्षेत्रातली महाबलाढ्य कंपनी असणाऱ्या गुगलची मालकी अल्फाबेट या कंपनीकडे आहे. 
 • सुंदर पिचाई गेल्या ४ वर्षांपासून गुगलचे सीईओ आहेत. त्यांच्या कारकिर्दीत गुगलने चांगलीच आर्थिक घौडदौड केली आहे. अल्फाबेटचे मार्केट कॅप जवळपास ९०० बिलियन डॉलर्स म्हणजे तब्बल ६० लाख कोटी रुपये इतके आहे.    
 • आतापर्यंत केवळ गुगलचे सीईओ असणाऱ्या सुंदर पिचाई यांना अल्फाबेटच्या सीईओ पदाची सुद्धा जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यामुळे एकाचवेळी दोन कंपन्यांचे सीईओ म्हणून कार्यरत असणार आहेत.
 • या प्रमोशनमुळे जगातल्या सर्वात शक्तिशाली कॉर्पोरेट लीडर्स मध्ये सुंदर पिचाई यांची गणना होणार आहे.  
 • लॅरी पेज आणि सर्जी बिन या दोघांनी १९९८ म्हणजे २१ वर्षांपूर्वी गुगलची स्थापना केली होती. 
 • छोटी सुरुवात असणाऱ्या गुगल ने आपले अवघे जीवन व्यापून टाकले आहे. जी-मेल, युट्युब, गुगल सर्च, गुगल मॅप्स, गुगल प्ले स्टोअर यांसारख्या अनेक मार्गांनी गुगल आपले उत्पन्न मिळवते.
 • सुंदर पिचाई यांचे पूर्ण नाव सुंदरराजन पिचाई आहे. त्यांचा जन्म १० जून १९७२ रोजी तामिळनाडूतील मदुरै येथे एका तमिळ कुटुंबात झाला. त्यांचे वडील रघुनाथ पिचाई जनरल इलेक्ट्रिक कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून काम करत होते, तर आई लक्ष्मी स्टेनोग्राफर होत्या. सुंदर आपल्या कुटुंबियांसोबत चेन्नई मधील अशोकनगर भागात २ बेडरूम अपार्टमेंट मध्ये रहात होते. 
 • अंजली हरयानी या सुंदर यांच्या पत्नी असून त्या केमिकल इंजिनिअर आहेत. उभयतांना काव्य व किरण अशी दोन अपत्ये आहेत. 
 • सुंदर पिचाई याना क्रिकेट व फुटबॉलची आवड आहे. 
 • सुंदर यांचे सुरुवातीचे शिक्षण चेन्नई येथे तर इंजिनिअरिंग B.Tech चे शिक्षण आयआयटी खडगपूर येथे झाले. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड महाविद्यालयात MS केल्यानंतर पेन्सिलवेनिया युनिव्हर्सिटीतुन त्यांनी MBA पदवी मिळवली. 
 • २००४ मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून त्यांनी गुगल मध्ये काम करण्यास सुरुवात केली.  
 • सीईओ बनण्या पूर्वी त्यांनी गूगल क्रोम (Google Crome), क्रोम ओएस (Crome OS), गूगल ड्राइव्ह (Google Drive), जीमेल (Gmail), गूगल मॅप (Google Map), क्रोमबुक (Cromebook) आणि क्रोम ओएस (Crome OS) प्रोजेक्टवर काम केले. 
 • २००८ मध्ये सुंदर यांची प्रोजेक्ट मॅनेजर पदावरून व्हाईस प्रेसिडेंट पदावर पदोन्नती झाली. 
 • गुगलच्या सहसंस्थापकांपैकी एक असण्याऱ्या लॅरी पेज यांच्या जागी ऑक्टोबर २०१५ मध्ये सीईओ म्हणून सुंदर यांची नेमणूक झाली होती.  

आपल्या नवीन कामाचा सध्याच्या गुगलच्या कामात कसा चांगलं परिणाम होणार आहे यासाठी त्यांनी पुढील ट्विट केले:

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/  

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!