Reading Time: 2 minutes

मुकेश धीरूभाई अंबानी! भारतीय उद्योग वर्तुळातलं एक मोठं नाव. अब्जाधीश उद्योगपती असणारे मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज लि. चे चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर आणि सर्वात मोठे भागधारक.  मुकेश अंबानी यांच्या पत्नीच्या म्हणजेच नीता अंबानी यांच्या कपडे व दागदागिन्यांची किंमत, डिझाइन्स हा सोशल मीडियावरचा एक चर्चेचा विषय आहे. 

इन्फोसिसची यशोगाथा  – कोण बनला करोडपती…?

सलग १२ वर्षे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानी आशियातील श्रीमंत लोकांच्या यादीतही अग्रक्रमावर आहेत.  फोर्ब्स आणि ब्लूमबर्गने प्रकशित केलेल्या आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते अव्वल स्थानी आहेत. गेल्या दहा वर्षांत अंबानींची संपत्ती दुप्पट झाली आहे. सन २०१९ मध्ये अनेक लोकांची सांपत्तिक स्थिती खालावलेली असताना गेल्या दहा वर्षात मुकेश अंबानी यांची संपत्ती दुप्पट झाली आहे. 

गेल्यावर्षी मार्चमध्ये त्यांच्या मोठ्या मुलाचे म्हणजे आकाश अंबानी यांच्या विवाहप्रसंगी उद्योग जगतातील मान्यवर व्यक्तींसह बॉलिवूड, राजकारण, क्रीडाजगत अशा भारतातील सर्व क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्याच त्याचबरोबर  बँक ऑफ अमेरिकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन मोयनिहान, युनायटेड नेशन्सचे माजी सरचिटणीस बान की मून, ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई जागतिक मान्यवरांची सपत्नीक उपस्थितीने प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले होते.

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -“पिडीलाईट’ची यशोगाथा”

मुकेश अंबानीं यांच्या संपत्तीबद्दल –

  1. सन २०१० मध्ये मुकेश अंबानी यांची संपत्ती $२७ बिलियन म्हणजेच  $२७ अब्ज होती. तर आज त्यांच्या संपत्तीची किंमत $६० अब्ज इतकी आहे. 
  2. गेल्या आर्थिक वर्षाचा विचार करता अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. जागतिक मंदीचा जबरदस्त फटका भारताला  बसला आहे. वाहन आणि ग्राहक वस्तू उद्योगांची प्रचंड पीछेहाट झाली आहे. देशाचा जीडीपी देखील कमी झाला आहे. भारतातील बहुतेक श्रीमंत लोकांची संपत्तीमध्ये घट झाली आहे, तर काहींना आपली संपत्ती स्थिर ठेवण्यासाठीही तारेवरची कसरत करावी लागतेय. परंतु मुकेश अंबानी मात्र आपली संपत्ती वाढविण्यामध्ये यशस्वी झाले आहेत.
  3. फोर्ब्सच्या अहवालानुसार, ही कमाल अंबानी यांच्या “जियो” ची आहे. पाच वर्षांपासून जियोने टेलिकॉम जगतातील सगळे  ठोकताळे बदलले आहेत. एकंदरीत ३४० सबस्क्राईबर्स असणाऱ्या “जियो”ने अंबानींना “जियो जी भर के” असं वरदान दिलेलं आहे.
  4. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती तंत्रज्ञान उद्योजक शिव नादर यांच्यापेक्षा अंबानी जवळजवळ चार पट जास्त श्रीमंत आहेत. 
  5. स्वप्ननगरी मुंबईमध्ये जिथे सर्वसामान्य माणसाला स्वतःची १ खोली घेतानाही आयुष्यभराची कमाई खर्च करावी लागते तिथे मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासमवेत ७ मजली टोलेजंग इमारतीमध्ये  राहत आहेत. अंबानी यांचे घर केवळ भारतातीलच नाही, तर जगातील महागड्या घरांपैकी एक आहे. 
  6. २०१८ मध्ये अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या “वर्किंग इंडिया” या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार भारतातील कामगारांचे सरासरी वेतन १६२,७४४ रुपये इतके होते. अंबानी यांचे उत्पन्न यापेखा ७२ लाख पट जास्त आहे. 
  7. मुकेश अंबानी यांची नेटवर्थ अफगाणिस्तान, बोत्सवाना, बोस्निया आणि हर्झगोव्हिना यांच्या एकत्रित जीडीपींइतकीच आहे. तर, बेलारूसच्या संपूर्ण जीडीपीपेक्षा त्यांची संपत्ती जास्त आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार २०१८ मध्ये बेलारुसचा जीडीपी $५९.६ बिलियन होता
  8. मुकेश  अंबानी यांची  कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लि.  फॉर्च्युन ५०० मधील अग्रगण्य भारतीय कंपनी ठरली आहे.  गेल्यावर्षीची अग्रगण्य कंपनला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला (IOC ) मागे टाकून या यादीत १०६ वा  क्रमांकावर आहे. “आयओसी” या यादीत ११७ व्या  क्रमांकावर आहे. फॉर्च्युन ५०० ही फॉर्च्युन मासिकातर्फे दरवर्षी प्रकाशित करण्यात  येत असून, त्यामध्ये कंपन्यांनी वित्तीय वर्षात मिळविलेल्या महसूलानुसार कंपनींची क्रमवारी ठरविण्यात येते. 

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -‘आयटीसी’ची यशोगाथा

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.