Mama Earth Journey : फक्त चार वर्षातच १०० कोटींचा टर्नओव्हर पार करणारी ‘ममा अर्थ’ कंपनीचा रोमांचकारी प्रवास!

Reading Time: 3 minutes

हल्ली बाजारात लहान मुलांसाठीचे अनेक प्रॉडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध असतात. परंतु सगळेच प्रॉडक्ट्स विकले जातातच असे नाही. प्रॉडक्टच्या निवडीबाबतीत ग्राहक अगदी सजग व तत्पर असल्याचं आपल्याला दिसून येतं. सर्वप्रथम त्या प्रॉडक्टचा ब्रँड बघितला जातो. मग त्या ब्रँडची चारचौघात नीट चौकशी करूनच ते प्रॉडक्ट विकत घेतले जाते. कमीतकमी किमतीमध्ये जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण वस्तू आपल्याला कशी मिळेल, याचा विचार हा प्रत्येक ग्राहक करत असतो.

या सर्वामध्ये, ते प्रॉडक्ट बाजारात विकण्यापासून ते त्याला एक ब्रँड बनवणं हा एका उद्योजकासाठी फार कठीण आणि खडतर प्रवास असतो. अशाच खडतर प्रवासावर मात करून ‘ममा अर्थ’ने (Mama Earth) स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली आहे. या कंपनीच्या प्रवर्तकांचा रोमांचकारी प्रवास आपण बघुयात.

ममा अर्थ कंपनी काय काम करते?

लहान बाळांसाठीचे सर्व प्रकारचे बेबी प्रॉडक्ट्स तयार करणारी ममा अर्थ कंपनी वरूण अलघ आणि गाझल अलघ या दाम्पत्यांनी २०१६ साली सुरू केली. केवळ ९० लाख रुपयांची गुंतवणूक करून या व्यवसायाला सुरुवात करण्यात आली होती. अवघ्या चार वर्षातच ममा अर्थने १०० कोटी रुपये विक्री पल्ला गाठलेला असून सध्या कंपनीचे तीन लाखांहून अधिक नियमित ग्राहक आहेत. गेल्या काही वर्षातच ममा अर्थ हा भारतातील बेबी प्रॉडक्ट् सेगमेंट मध्ये मोठा ब्रँड बनला असून संपूर्ण जगभरातच या ब्रँडचे ग्राहक आहेत.

‘ममा अर्थ’ ची सुरुवात –

गुरुग्राम या हरियाणा मधील शहरामध्ये राहणाऱ्या गाझल आणि वरून अलघ या दाम्पत्याने ममा अर्थच्या व्यवसायाला २०१६ साली सुरुवात केली. अगस्त्य या त्यांच्या लहान मुलासाठी अलघ दाम्पत्य बाजारात मिळणारे नेहेमीचे बेबी प्रॉडक्ट्स वापरत असत. दुर्दैवाने अगस्त्यला या भेसळयुक्त प्रॉडक्टमुळे एक्झिमा हा त्वचारोग झाला. या रोगामधे त्वचेवर लाल डाग उठतात आणि खाज सुटण्यास सुरुवात होते. काही काळानंतर गझल व वरुणच्या लक्षात आलं की त्यांच्या काही नातेवाईकांना सुद्धा अश्याच समस्यांना तोंड द्यावे लागत होते. याच संधीचा विचार करून त्यांनी लहान बाळांसाठी सेंद्रिय प्रोडक्ट (organic products) बनवण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच पुढे ममा अर्थ हे एक यशस्वी कंपनी उभी झाली.

हेही वाचा – Financial Freedom : आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टीप्स

गाझल व वरूण अलघ यांचा प्रवास –

ममा अर्थ कंपनी सुरू करण्यासाठी वरूण व गाझल यांच्याकडे योग्य ती पार्श्वभूमी देखील होती. वरुण अलघ हे हिंदुस्थान यूनिलिव्हर, इन्फोसिस आणि दिल्लीतील कोका कोला येथे वरिष्ठ ब्रँड व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. तर गाझल अलघ या आयटी क्षेत्रात कोर्पोरेटर ट्रेनर म्हणून काम करत होत्या. यासाठी सेंद्रिय उत्पादनावर सखोल अभ्यास व संशोधन केल्यांनतर नैसर्गिक घटकांपासून लहान बाळांसाठीचे स्किनकेअर प्रॉडक्ट्स बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

सुरुवातीला फक्त दोनच प्रॉडक्ट्स (बॉडी लोशन आणि फेस क्रीम) बनवून त्यांच्या वेबसाईटद्वारे फेसबुक आणि इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विकण्यास त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना कमी विक्री, कमी परतावा दर, तोटा यांसारख्या अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. पण हार न मानता परिश्रम त्यांनी तसेच सुरु ठेवले. काही महिन्यातच त्यांना ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळू लागल्या. विक्री वाढू लागली. पुढे त्यांनी ग्राहक अधिकाधिक आकर्षित होण्यासाठी व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी ९० लाख रुपयांची गुंतवणूक करून व्यवसायाची सुरुवात केली होती व केवळ दोन वर्षातच त्यांची उलाढाल ही २० कोटी रुपयांवर पोहोचली.

ममा अर्थ प्रॉडक्ट्स बद्दल :-

कॉस्मॅटिक प्रॉडक्ट्स विचार केला जातो तेव्हा प्रॉडक्ट्समध्ये वापरण्यात येणाऱ्या केमिकल्सबाबत ग्राहकांना काळजी वाटते. प्रॉडक्ट्स योग्य पद्धतीने बनवले जातात की नाही याची ग्राहकांना फार उत्सुकता व तेवढीच काळजी देखील असते. त्यामुळे आजकाल ऑर्गेनिक किंवा नैसर्गिक घटकांपासून बनवण्यात येणाऱ्या प्रॉडक्ट्स लोकप्रिय आहेत.

ममा अर्थ कंपनीने ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी व त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी नेहमीच सतर्कता दाखवली आहे. नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात येणारे ममा अर्थ प्रॉडक्ट्स हे ग्राहकांना खात्रीशीर व गुणकारी प्रॉडक्ट्स वाटतात. ममा अर्थच्या काही प्रॉडक्ट्सची वैशिष्ट्ये आपण पाहूयात –

ममा अर्थ प्रॉडक्ट्स – 

Mamaearth Tea Tree Natural Face Wash : पिंपल्सची समस्या असेल किंवा चेहरा कोरडा पडत असेल तर ममा अर्थ चा हा फेस वॉश अतिशय गुणकारी आहे. यातील कडुनिंब आणि टी ट्री ऑईल हे घटक अँटी बॅक्टेरियाचं काम करून चेहरा आतवर स्वच्छ करतं.

Mamaearth’s Onion Hair Mask for Hairfall Control with Organic Bamboo Vinegar : कांदा आणि ऑरगॅनिक बाम्बू व्हिनेगर पासून बनवण्यात आलेला ममा अर्थ चा हा हेअर मास्क केसांचे आरोग्य सुधारून केस गळतीची समस्या दूर करतो. ऑरगॅनिक बाम्बू व्हिनेगरमधील असणाऱ्या अँटीबॅक्टेरीलमुळे त्वचा कोरडी पडत नाही व केस अगदी हेल्दी व शायनी दिसू लागतात.

Mamaearth Ubtan Natural Face Wash with Turmeric & Saffron : ममा अर्थच्या या फेस वॉशमध्ये उटण्याचा समावेश केला आहे. ज्यातील हळद आणि केशराच्या वापरामुळे त्वचा अगदी स्वच्छ व मुलायम होते. शिवाय हळद आणि केशरामुळे उन्हापासून त्वचेचं सरंक्षण होतं तसेच त्वचा नितळ आणि उजळ बनते.

Mamaearth Onion Anti Hairfall Combo : ममा अर्थचा हा ओनियन अँटी हेअरफॉल कॉम्बो आहे ज्यात केसांसाठीचे तेल, शॅम्पू आणि कंडिशनर यांचा समावेश आहे. यात वापरण्यात येणाऱ्या प्लांट केरटिनमुळे केस अगदी स्मूथ व मजबूत होतात. शिवाय केस तुटण्याचं व गळण्याचं प्रमाणही कमी होतं.

केवळ लहान मुलांसाठीच नव्हे तर त्यांच्या मातांसाठी देखील ममा अर्थ चे प्रोडक्टस उपलब्ध आहेत. याचबरोबर पूर्णपणे नैसर्गिकरीत्या तयार करण्यात येणारे हे प्रोडक्टस वापरल्यानांतर चेहरा आणि केस नेहमी आरोग्यदायी राहते. तेही फार खर्च न करता किंवा फार मेहनत न घेता.

अशाप्रकारे वरुण व गाझल अलघ यांचा हा यशस्वी आणि प्रेरणादायी प्रवास आपण बघितला. तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर तुम्ही कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकता, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘ममा अर्थ’!

ममा अर्थ या ब्रँडने अनेक अडचणींवर मात करून खूप कमी वेळात देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील ग्राहकांना आपलसं केलं, तेवढा विश्वास ग्राहकांमध्ये निर्माण केला. ममा अर्थ चा हाच रोमांचकारी प्रवास इतर उद्योजकांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल.

Leave a Reply

Your email address will not be published.