Today’s Top 10 Shares : जाणून घ्या, बाजार सुरू होण्यापूर्वी आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Reading Time: 2 minutes

अखेर दोन दिवसांच्या वाढीनंतर बाजार बुधवारी लाल चिन्हात बंद झाला. निफ्टी (Nifty) 19.00 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 16,240.30 वर बंद झाला. तर सेन्सेक्स (Sensex) 109.94 अंकांनी म्हणजेच 0.20 टक्क्यांनी घसरून 54,208.53 वर बंद झाला.

आजची परिस्थिती कशी राहणार ?

सुरुवातीचा विचार केला तर निफ्टीने चांगली सुरुवात केली आणि गती कायम ठेवली होती. मात्र, 16,400 च्या जवळ पोहोचल्यानंतर तो पुन्हा घसरला. यामुळे नफा-वसुलीचे वर्चस्व राहिल्याचे, असे शेअर खानचे गौरव रत्नपारखी यांनी सांगितले. तर अलीकडे जो नफा होत आहे, तो दर्शवतो की बुधवारची घसरण लाईट स्टँडस्टिल आहे.

शॉर्ट टर्म पुलबॅक अजूनही बाजारात कायम आहे. निफ्टी 16,200 च्या आसपास पोहोचल्यावर नवीन खरेदी दिसून येईल. अशा परिस्थितीत, शॉर्ट टर्म व्यापाराच्या दृष्टिकोनातून थोडीशी घसरण ही खरेदीची संधी मानली पाहिजे. निफ्टीचे शॉर्ट टर्म टारगेट 16,500 आहे तर त्याला 16,000 वर शॉर्ट टर्म सपोर्ट आहे.

फार्मा आणि एफएमसीजी शेअर्समुळे दुपारपर्यंत देशांतर्गत बाजारात चांगली मजबूती होती, असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. इंग्लंडमध्ये किरकोळ महागाईची वाढती आकडेवारी आणि फेडच्या अध्यक्षांकडून महागाई कमी करण्याचे आश्वासनामुळे बाजारातील परिस्थिती खराब झाली. तर यामुळे पुढे जाऊन जागतिक मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात झालेली वाढही पाहायला मिळू शकते.

यासोबतच बुधवारी बाजाराला सुरुवातीचा नफा कायम ठेवता आला नाही आणि मर्यादित मर्यादेत व्यवहार करून थोड्या घसरणीवर बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. वाढत्या व्याजदरामुळे वाढीवर दबाव येण्याची भीतीही बाजाराच्या भावनेवर नकारात्मक परिणाम करत आहे. निफ्टीने डेली चार्टवर एक लहान बिअरिश हॅमर कॅंडलस्टिक तयार केली आहे जी आगाम काळात शेअर बाजार आणखी खाली येण्याचे संकेत देत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  1. टाटा कंझ्युमर (TATACONSUM)
  2. हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
  3. अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)
  4. श्री सिमेंट (SHREECEM)
  5. अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
  6. ऑरो फार्मा (AUROPHARMA)
  7. पर्सिस्टेंट (PERSISTENT)
  8. एल अँड टी (LTTS)
  9. एम फॅसिस (MPHASIS)
  10. लॉरस लॅब (LAURUSLABS)

टीप : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. म्हणून नेहमी क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करावी. मगच गुंतवणूक करावी.

Leave a Reply

Your email address will not be published.