प्रत्येक व्यक्तीला कर्ज घेत असताना वय हे महत्वाचे का असते हा प्रश्न पडतो. याबद्दलची अधिक माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
वैयक्तिक कर्जाबद्दलची माहिती
- जेव्हा कधी अचानक पैशांची निकड भासते तेव्हा वैयक्तिक कर्ज हे खूप मोठे साधन आहे. ते मिळण्यास सहसा अडचण येत नाही आणि तीन दिवसांच्या आतमध्ये मिळून जाते. पण जेव्हा कर्ज हवे असते तेव्हा कागदोपत्री गरजांची पूर्तता करणे गरजेचे असते. सर्वसाधारणपणे कर्ज घेताना तुमचा सिबिल स्कोअर, मासिक उत्पन्न आणि वयाची चौकशी केली जाते.
- जेव्हा कर्ज दिले जाते तेव्हा ते विशिष्ट व्याजदरावर वितरित केले जाते. यामध्ये इएमआय रक्कम आणि वय हे कर्ज भरण्याच्या दरम्यानचा कालावधी स्पष्ट करतात. त्यामुळे ते लक्षात घेणे गरजेचे आहे.
वय आणि कर्ज यांचा संबंध काय?
- जेव्हा तुम्ही कर्ज घेता तेव्हा ‘वय’ हा घटक प्रामुख्याने लक्षात घेतला जातो. वैयक्तिक कर्ज घेतल्यानंतर एक वर्ष ते पाच वर्षाच्या दरम्यान ते फेडावे लागते. तरुण व्यक्तीने कर्ज घेतल्यास त्याला ते फेडण्यासाठी जास्त कालावधी मिळतो. त्याचवेळी वृद्ध व्यक्तीने कर्ज घेतल्यास कमी कालावधी मिळतो.
- एखाद्या वीस वर्षाच्या कर्ज घेतलेल्या व्यक्तीला तीस किंवा पन्नास वर्षाच्या कर्जदाराच्या तुलनेने फेडीसाठी जास्त वेळ मिळतो. तरुण अर्जदाराची कमाई वाढत असल्यामुळे त्याला परतफेड करण्यासाठी जास्त कालावधी दिला जातो. तर वृद्ध व्यक्ती निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे त्याला मुदतवाढ मिळू शकत नाही. वैयक्तिक कर्जाचे तीन पैलू आहेत ज्यामध्ये अर्जदाराचे वय महत्वपूर्ण समजले जाते.
- वृद्ध अर्जदाराच्या प्रमाणात तरुण अर्जदाराकडे कमाईच्या अधिक संधी उपलब्ध असतात. तुम्ही कमी वयाचे असल्यास कर्ज वय ५० असणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त मिळते. कर्जाचा कालावधीही वाढवून मिळतो.
Loan Rejection: कर्ज नामंजूर होण्याची ११ कारणे
वय आणि कर्जाची रक्कम यांच्यातील संबंध
- तरुण कर्जदाराची कमाई वाढत असते. त्यामुळे त्याला जास्त कर्ज मिळते. त्याप्रमाणात जास्त वयाच्या व्यक्तीला कमी कर्ज मिळते.
- कर्ज मिळाल्यानंतर तरुण व्यक्तीला फेडीसाठी जास्त कालावधी मिळतो तर वृद्ध व्यक्तीला कमी कालावधीतच कर्जफेड करावी लागते.
वय आणि व्याजदर यांच्यातील संबंध
- कर्जासाठी अर्ज केल्यानंतर सर्वात प्रथम तुमचा क्रेडिट स्कोअर तपासला जातो. नवीन नोकरीला लागलेल्या किंवा सुरुवातीला पैसे कमवायला लागलेल्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर कमी असतो. तिथेच ५ – १० वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यामुळे कर्ज लवकर मिळते.
तुमची कर्ज पात्रता तपासा
वैयक्तिक कर्ज घेत असताना संबंधित वित्तीय संस्थांच्या सर्व नियमांचे तुम्ही काटेकोर पालन करत आहात का ते तपासून घ्यावे. भविष्यात कधी जेव्हा तुम्ही कर्ज मागायला जाल तेव्हा याबद्दलची माहिती असावी. कर्ज घेतले तरी ते वेळच्या वेळी फेडले जाईल याकडे लक्ष द्यायला हवे.