मध्यप्रदेश सरकारने जानेवारी 2023 मधे सुरू केलेल्या ‘ लाडली बहना ’ योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील ‘ माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने या योजनेचे स्वागत केले जात आहे. राज्यातल्या जवळपास 1 कोटी महिलांना याचा लाभ होणार आहे. आज आपण या योजनेबद्दल सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. यामुळे बहुतेक महिला आणि बहीणींपर्यंत या योजनेची इत्यंभूत माहिती पोहोचेल आणि योजनेचे उद्दिष्ट सफल व्हायला मदत होईल.
‘ माझी लाडकी बहीण योजना ’ काय आहे ? याचे उद्दिष्ट काय आहे ? याचा लाभ घेणारे लाभार्थी आणि त्यांची पात्रता काय असावी, आवश्यक कागदपत्रं, योजनेचा कालावधी , अंतिम मुदत काय आहे हे पुढीलप्रमाणे –
योजनेचे उद्दिष्ट :
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा नावाने सुद्धा ओळखल्या जाणाऱ्या या योजनेत गरजू आणि गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
- विधवा, घटस्फोटीत आणि अपंग महिला यांना समाजात स्वाभिमानाने जगता यावे , यासोबतच या महिलांच्या शिक्षणाचा आणि आरोग्याचा विचारही केला जावा अशी बहुउद्देशीय योजना सरकारने सुरू केली आहे.
योजनेसाठी पात्र आणि अपात्र लाभार्थी :
- सर्वात महत्वाचे म्हणजे या योजनेसाठी लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- योजनेसाठी पात्र महिलेचे / मुलीचे वय 18 – 65 मधे असणे आवश्यक आहे.
- योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न Rs. 2.5 लाखापेक्षा कमी असावे.
- एकाच कुटुंबातल्या जास्तीत जास्त 2 महिला, माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असू शकतात.
- कुटुंबातील कुठलीही व्यक्ती सरकारी नोकरी करणारी नसावी तसेच आयकर भरणारी नसावी, असे असल्यास अर्ज करणारी व्यक्ती अपात्र ठरू शकते.
- अर्जदार व्यक्ती इतर कुठल्याही योजनेच्या माध्यमातून सरकारकडून या आगोदरच आर्थिक लाभ मिळवत असेल तर ती महिला / मुलगी, माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरेल.
योजनेचा लाभ :
- या योजनेनुसार, पात्र महिलांना दर महिना Rs.1500 देण्यात येणार आहे.
- तसेच लाभार्थीला एक वर्षात 3 गॅस सिलेंडर विनाशुल्क देण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रं:
माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तीकडे खालील कागदपत्र असणे आवश्यक आहे-
- आधारकार्ड
- अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल सर्टिफिकेट)
- जन्म प्रमाणपत्र (बर्थ सर्टिफिकेट) (महाराष्ट्र राज्य)
- पासपोर्ट साईज फोटो
- रेशन कार्ड
- बँक पाससबुक
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
अर्ज करण्यासाठी कुठे संपर्क करायचा ?
- लाभार्थी ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्हीप्रकारे अर्ज करू शकतात.
- ऑनलाइनसाठी नारीशक्ति दूत या संकेतस्थळाचा उपयोग करायचा आहे.
- ऑफलाइनसाठी ग्रामीण भागातील लाभार्थी अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक यांना संपर्क साधू शकतात आणि शहरी भागात राहणारे लाभार्थी त्यांच्या वॉर्डमधे राहणाऱ्या वॉर्ड अधिकाऱ्यांना संपर्क साधू शकतात.
लाडकी बहीण योजनेसाठी अंतिम मुदत :
- लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची सुरुवात 1 जुलै 2024 झाली आहे.
- योजनेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2024 आहे.
अर्जमधील खालील मुद्याचा समावेश आहे, ते असे –
- अर्जदाराचे नाव
- जन्मदिनांक
- पत्ता
- जन्मठिकाण
- मोबाइल नंबर
- आधार क्रमांक
- वैवाहिक स्थिति
- बँकचे खाते क्रमांक आणि तपशील
- तुमचे खाते आधार कार्डशी जोडलेले आहे का ? याची खात्री करणे गरजेचे आहे.
- कुठल्याही प्रकारे तुम्ही आधीपासूनच शासनाकडून आर्थिक योजेचनेचे लाभार्थी आहे का?
याबरोबरच छापील स्वरूपातील हमीपत्र भरून देणे आवश्यक आहे, या हमीपत्रात अर्जदाराने काही नियमांची पूर्तता करणे अपेक्षित आहे.
अर्ज आणि हमीपत्र दिल्यानंतर अर्जदाराला त्याची पावती मिळणार आहे. या पावतीमधे अर्जाचा नोंदणी क्रमांक दिलेला असेल.तसेच मोबाईलवर एसएमएस आणि व्हॉटस् अप वर देखील अर्ज मिळाल्याची पावती पाठवण्यात येणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेमधे नव्याने होणार काही बदल :
नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 6 नवीन नियम व अटी आणि शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे. याबद्दलचा शासन निर्णयही लवकरच लागू केला जाणार आहे. याबद्दल काही मुद्दे बघू , ते असे –
- लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ही आता ग्राह्य धरले जाणार आहेत.
- परराज्यात जन्मलेल्या महिलेने महाराष्ट्रात राहत असलेल्या पुरुषासोबत लग्न केल्यास, तिच्या पतीच्या कागदपत्रांवर त्या महिलेला देखील माझी लाडकी बहिणी या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र,अशा महिलेकडून ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरून घेण्यात यावा अशी माहिती दिली आहे.
- महिला जर नवविवाहित असेल आणि विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर योजनेचा लाभ घेण्यासाठी तिच्या पतीच्या रेशन कार्डचा पुरावा ग्राह्य धरण्यात येईल.
- ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात येईल असेही यात म्हटले आहे.
या मंत्रिमंडळ बैठकीत, योजनेसंबंधी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये देखील शिथिलता आणली जाणार आहे असे नमूद केले आहे. तसेच योजनेची सर्व कार्यप्रणाली सोपी आणि सरळ असावी यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहे.
लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असून पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे (रुपये 3000) 19 ऑगस्टला बँक खात्यांमध्ये जमा करण्याचा असल्याचे देखील सांगितले आहे.
दरम्यान नव्याने बदल झालेल्या नियमांचे आणि अटींची पूर्तता शासन लवकरच लागू करणार आहे असे सांगण्यात आले आहे.
#मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
#महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजना