Reading Time: 2 minutes

बँकेत खाते उघडायला गेले की केवायसी केलेली आहे का? हा प्रश्न पहिल्यांदा विचारला जातो. पण केवायसी म्हणजे काय हेच अनेकदा माहित नसते. बँकेत खाते उघडत असताना ग्राहकांची ओळख, योग्यता आणि जोखीम तपासण्यासाठी केवायसी करणे गरजेचे केलेले आहे.  

 

केवायसी म्हणजे काय आणि ती कशासाठी करावी लागते हे आपण खालील लेखातून समजून घेणार आहोत. 

 

केवायसी म्हणजे काय? What is Kyc? –

 • KYC किंवा Know Your Customar ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक अनिवार्य प्रक्रिया आहे. केवायसी प्रक्रियेतून ग्राहकांची वैयक्तिक माहिती आणि पत्ता तपासून त्याची ओळख तयार केली जाते. 
 • बँकेत गुंतवणूक करणे, क्रेडिट मिळवणे आणि इतर काही आर्थिक सेवांसाठी केवायसी करणे गरजेचे समजले जाते. 
 • केवायसी पद्धतीमध्ये नाव, जोडीदार किंवा पालक, पत्ता, पॅन क्रमांक आणि आधार तपशील, इतर ओळखीचे पुरावे शिक्षण आणि व्यवसायाच्या तपशिलाची माहिती जमा करून तिची तपासणी केली जाते. 

 

केवायसीचे महत्व Importance of kyc – 

 • पैशांचे गैरव्यवहार टाळण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००४ पासून केवायसी करणे सर्व बँकांना बंधनकारक केले आहे. 
 • ग्राहकांची ओळख पटण्यासाठी आणि आर्थिक जोखीम व फसवणुकीचे मूल्यांकन करण्यासाठी केवायसी करणे गरजेचे केले आहे. 
 • केवायसी केल्यामुळे फायनान्शिअल कंपन्यांना ग्राहकांची ओळख आणि कायदेशीर माहिती पटवणे सोपे जाते. 

 

ईकेवायसी म्हणजे काय? – What is Ekyc? 

 • ईकेवायसी म्हणजे ग्राहकांची ओळख पटण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आधार कार्डचे व्हेरिफिकेशन केले जाते. 
 • ईकेवायसी पद्धतीमध्ये वैयक्तिक माहिती गोळा करणे, सरकारने जारी केलेल्या स्मार्ट आयडीमधून डिजिटल डेटा जमा केला जातो. 
 • ऑनलाईन ओळख पडताळणीमध्ये प्रमाणित डिजिटल ओळख आणि चेहऱ्यावरील ओळखीचाही वापर केला जातो. 

नक्की वाचा : केंद्रीय केवायसी भांडाराबद्दल तुम्हाला माहिती आहे का? 

 

केवायसी कसे काम करते? – How does kyc works? 

 • डिजिटल केवायसी करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नसते. 
 • केवायसीच्या पहिल्या टप्यात ग्राहकाची वैयक्तिक माहिती जमा केली जाते. ईकेवायसी करताना ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागतो. 
 • फॉर्म ईमेल किंवा एसएमएस सारख्या माध्यमांद्वारे लिंक केलेला असतो. 
 • फॉर्म भरल्यानंतर वैयक्तिक ओळखीचे पुरावे जमा करावे लागतात. 
 • एकदा माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाते. ईकेवायसी मध्ये कागदपत्रांची स्कॅन केलेली कॉपी जमा करावी लागते. 
 • ईकेवायसी आर्टिफिशील इंटेलिजन्स या तंत्रज्ञानावर आधारित असेल तर व्हिडीओ कॉलद्वारे वैयक्तिक माहितीची तपासणी केली जाते. 
 • कागदपत्रे जमा केल्यानंतर माहिती सुरक्षित असल्याची खात्री केली जाते आणि त्यानंतरच पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होते. 

 

केवायसीसाठी लागणारी कागदपत्रे – Documents required for KYC 

 • केवायसीसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते. 
 1. पासपोर्ट 
 2. निवडणूक ओळखपत्र 
 3. ड्रायव्हिंग लायसन 
 4. आधार कार्ड 
 5. पॅन कार्ड 

 

अल्पवयीन ग्राहकांसाठी – 

 • अल्पवयीन मुलांचे खाते उघडायचे असल्यास त्यांचे खाते चालवणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक पुरावे जमा करणे आवश्यक असते. 
 • अल्पवयीन मुले स्वतःचे खाते चालवू शकतात पण त्या खात्याची केवायसी केलेली असणे गरजेचे आहे. 

 

माहितीची तपासणी – 

 • ग्राहकाने कागदपत्रे अपलोड केल्यावर त्यांची तपासणी केली जाते. 
 • कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड केली जाऊ नये म्हणून ही तपासणी केली जाते. 

 

डेटा जमा करणे – 

 • कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर माहितीचे दोन वेग वेगळ्या प्रकारे संकलन केले जाते. 

१. Optical Capital  Resources – 

 • या पद्धतीमध्ये अर्जदाराच्या वैयक्तिक माहितीचे संकलन केले जाते. अर्जदाराच्या कागपत्रांमधून पत्त्याचा पुरावा तपासला जातो. 
 • फॉर्म मध्ये भरलेली माहिती बरोबर आहे का नाही याचीही तपासणी केली जाते. 

 

     २. Without Optical Capital  Resources –        

 • या डेटा पद्धतीमध्ये पोर्टलवर जाऊन माहिती भरावी लागते. 
 • या पोर्टलवर त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी लागतात. त्यानंतर कागदपत्रांमधील माहिती आणि फॉर्ममधील माहितीची तपासणी केली जाते. 

 

केवायसीची तपासणी आधी कागदपत्रांच्या आधारे केली जात होती. पण काही काळाने ऑनलाईन पद्धतीने त्याची तपासणी करायला सुरुवात केली गेली. या पद्धतीत झालेला हा खूप मोठा बदल आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांच्या वेळेत बचत होते, खर्च वाचतो आणि केवायसीची प्रक्रियाही लवकर पूर्ण होते. 

 

नक्की वाचा : युपीआय म्हणजे काय? 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes Phule Yojna –  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची…

ESIC- सरकारची ‘इएसआयसी योजना’ तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutes ESIC- इएसआयसी  योजना  एका मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबातली हुशार मुलगी कार्तिकी. शिष्यवृत्तीतून शिक्षण…

वाढीव पेंन्शनबाबत अजून काही

Reading Time: 4 minutes सर्वोच्च न्यायालयाच्या अपिलेट खंडपीठाने 4 नोव्हेंबर 2022 रोजी वाढीव पेन्शन देण्याच्या बाजूने…