Reading Time: 2 minutes

Phule Yojna – 

 • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची प्रमुख आरोग्य योजना आहे.
 • आर्थिकदृष्टया गरीब जनतेला मोफत उपचार करता यावेत म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. 
 • गरजू लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून कॅशलेस मोफत सुविधा पुरवल्या जातात. 
 • वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत असलेले पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

 

योजनेचे फायदे – Scheme Benefits 

 • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कुटुंबाच्या उपचारासाठी २ लाख रुपयांची मदत केली जाते. 
 • या योजनेच्या माध्यमातून पुढील महत्वाच्या आजारांवर मोफत उपचार केले जातात. 
  • प्लास्टिक सर्जरी, 
  • हृदयरोग, 
  • मोतीबिंदू, 
  • कॅन्सर ऑपरेशन 
  • सर्वसाधारण शस्त्रक्रिया
  • कान नाक व घसा शस्त्रक्रिया
  • नेत्रा रोग शस्त्रक्रिया
  • स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र
  • अस्थीरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
  • पोट व जठर शस्त्रक्रिया
  • कार्डियाक आणि कार्डिऑथोरासिक सर्जरी 
  • बालरोग शस्त्रक्रिया
  • प्रजनन व मूत्ररोग शस्त्रक्रिया
  • मज्जातंतू विकृती शास्त्र
  • कर्करोग शस्त्रक्रिया
  • वैद्यकीय कर्करोग उपचार
  • रेडिओथेरपी कर्करोग
  • त्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया
  • जळीत
  • पॉलिट्रामा
  • प्रोस्थेसिस
  • जोखिमी देखभाल
  • जनरल मेडिसिन
  • संसर्गजन्य रोग
  • बालरोग्य वैद्यकीय व्यवस्थापन
  • हृदय रोग
  • नेफरोलॉजी
  • न्यूरोलॉजी
  • पल्मोनोलॉजी
  • चर्मरोग चिकित्सा
  • रोमेटोलॉजी
  • इंडोक्रायनोलॉजी
  • मेडिकल गेस्ट्रोलॉजी
  • इंटर वेन्शनल रेडिओलॉजी
 • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब वर्ष १.५ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक अर्थसहाय्य दिले जाते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी हीच मर्यादा २.५ लाखांपर्यंत आहे

 

योजनेची पात्रता Scheme Eligibility –

  • महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पिवळी आणि केशरी शिधापत्रिका धारक पात्र आहेत. 
  • शिधापत्रिका धारकांचे उत्पन्न १ लाख रुपयांपर्यंत असावे. 
  • पात्रताधारकांना २ अपत्यांपेक्षा जास्त मुले नसणे आवश्यक आहे. 
 • लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. 

 

नक्की वाचा : मुलींचे भविष्य अधिक सुरक्षित करणारी सुकन्या समृद्धी योजना 

आवश्यक कागदपत्रे Important Documents –

 • आधार कार्ड, मतदार कार्ड वाहन, वाहन चालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका, आणि ७/१२ आवश्यक आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत ओळखपत्र देण्यात येत असते. 

 

https://pmmodiyojanaye.in/mahatma-jyotiba-phule-jan-arogya-yojana/

 

 • महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
 • पासपोर्ट साइज फोटो
 • शिधापत्रिका
 • श्रेणी A, श्रेणी B, श्रेणी C मधील कोणतेही एक दस्तऐवज.
 • पीएम जन आरोग्य योजनेत नोंदणी केल्याचा पुरावा
 • खाली दिलेल्या यादीतील अर्जदाराचे कोणतेही एक ओळखपत्र:
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदार आयडी
  • शाळा/कॉलेज आयडी
  • चालक परवाना
  • पासपोर्ट
  • स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र
  • MJPJAY चे आरोग्य कार्ड
  • अपंगत्व प्रमाणपत्र
  • फोटोसह राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जारी केलेले ज्येष्ठ नागरिक कार्ड
  • सैनिक बोर्ड सागरी मत्स्यव्यवसाय ओळखपत्राद्वारे जारी केलेले संरक्षण माजी सैनिक कार्ड (कृषी मंत्रालय/मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र सरकार द्वारे जारी केलेले).
 • या योजनेमध्ये कोरोना आजारावरील उपचारांचा समावेश करण्यात आला होता. 
 • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत ९९६ प्रकारच्या गंभीर खर्चिक ऑपरेशन्स करता येतात. 

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करावी? –

 • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात आरोग्य मित्र उपलब्ध असतात, त्यांची मदत घेता येते. 
 • रुग्णालयात असणारे आरोग्य मित्र रुग्णांची ऑनलाईन नोंदणी करून त्यांना मदत करण्याचे सहाय्य करतात. 
 • रुग्णाची नोंदणी करत असताना त्याच्याजवळ ओळखपत्र असणे गरजेचे असते. 
 • आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या वेबसाईटवर उपलब्ध आहे.  

 

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्याची पद्धती – 

 • आजारी असणाऱ्या व्यक्तीने सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करणे गरजेचे असते. 
 • डॉक्टरांकडून आजाराचे निदान झाले की त्यासंदर्भातील खर्चाची माहिती डॉक्टरांकडून घ्यावी. 
 • त्यानंतर रुग्णालयात असणाऱ्या आरोग्य मित्रांच्या मदतीने ऑनलाईन अर्ज भरावा. 
 • त्यानंतर आजारी व्यक्तीचा मोफत उपचार केले जातात. 

नक्की वाचा : प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.