कोरोना नावाच्या संकटामुळे लॉकडाऊन घोषित झालं घडाळ्याच्या काट्यासोबत धावणाऱ्या “फास्ट लाइफस्टाइल”ची सवय झालेल्या सर्वानाच निवांत वेळ मिळाला. पण बदल हा काही काळापुरताच ठीक वाटतो. त्यानंतर मात्र आपलं दैनंदिन रुटीनच आपल्याला हवंहवंस वाटू लागतं. त्यात हा बदल म्हणजे स्वखुशीने स्वीकारलेला बदल नाही नाईलाजाने स्वीकारावी लागलेली एक अटळ घटना आहे.
या लॉकडाऊन मध्ये अनेकांना नोकरी, व्यवसाय, आर्थिक नियोजन, गुंतवणूक, बचत याची काळजी आणि एकंदरीतच कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे येणाऱ्या नैराश्याने ग्रासलं आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रसिद्ध बिझनेस कोच आणि मोटिवेशनल स्पीकर “चकोर गांधी” यांनी लॉक डाऊन मध्ये बदललेल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन आर्थिक नियोजन व गुंतवणुकी संदर्भात मार्गदर्शन करणारा ऑडिओ आम्ही लिखित व ऑडिओ दोन्ही स्वरूपात प्रकाशित करत आहोत.
नमस्कार ! मी चकोर गांधी.
मॅनेजमेंट गुरु आणि बिझनेस कोच, कंन्सल्टंट, मेन्टॉर !
सावधान धंदा बदलतोय… हा माझा विषय असतो. त्यानिमित्ताने वेगवेगळे व्यवसायिक, कॉमन मॅन किंवा आत्ताच्या सद्य परिस्थितीमध्ये, अनेकांशी संवाद चालू असतो.
आपण खरंतर आतून मनामधून खूप घाबरलो आहोत. आपापल्याला चिंता, स्वतःची, तब्येतीची कुटुंबीयांची, समाजाची, देशाची सर्व जगाची चिंता मनामध्ये आहे, त्याबाबत आपण खूप ज्ञान घेत आहोत आणि काळजीही बाळगत आहोत.
त्याचबरोबर आजूबाजूला काय घडतंय आणि त्या बाबाबत लोकांच्या मनात बरेच प्रश्न आहेत, “अर्था”च्या संबंधित !
कोरोनावर आपण सर्वानी / भारत देशाने खुपच काळजी घेऊन सगळ्या जगासमोर एक चांगले उदाहरण ठेवलेले आहे. पण त्याचबरोबर मनामध्ये पैसे, अर्थिक नियोजन, पुढे काय होणार, काय घडणार, त्याबद्दलही विचार यायला सुरवात झालेली आहे.
माननीय पंतप्रधान दरवेळी आपल्याशी संपर्क साधतात. त्यांचे विचार आपल्यासमोर ठेवतात आणि ते जे काही सूचना देतात त्या आपण सर्वजण अगदी नियमाने पाळत आहोत, पण काही प्रश्न डोळ्यासमोर उभे राहत आहेत.
मनामध्ये येत आहेत की आता आर्थिक नियोजन काय करावं? हे धंदे, व्यवसाय, सगळे सुरळीत केव्हा होईल?
आत्ता ३ मे पर्यंत लॉक डाऊन आहे. पण काही गोष्टींमध्ये हे व्यवहाराचे, व्यपाराचे चाक हळूहळू पुढे न्यावं लागेल. दैनंदिन लागणाऱ्या गोष्टी यांचे कारखाने कसे सुरु करता येतील आणि त्यांची सप्लाय चेन कशी मॅनेज करता येईल, याबद्दल नियोजन चालू आहे. लवकरच त्याची यादी पण प्रसारण होईल की काय.. काय सुरु करायला परवानगी देता येईल.
भारताच्या ५०० जिल्ह्यापैकी कोरोनाचा प्रभाव कमी आहे तिथे हळूहळू हे उद्योग धंदे पहिले चालू होतील असं सूतोवाच आहे. फक्त ते रिलीज केल्यानंतर एकदम ओपन झालंय म्हणजे सर्वानी बाहेर पडण्याची गरज आहे का? जर आपण जबाबदारी वागलो तर या देशाला मा. पंतप्रधानाना व सर्वांनाच कोरोनाच्या प्रादुर्भावापासून दूर ठेवण्यास खुप उपयोग होईल .
मनावर संयम व ताबा ज्याप्रमाणे ठेवलाय त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये ठेवावा. आता आपण कोणत्या गोष्टींचा विचार करायचा?
- प्रमुख्याने मला येणाऱ्या ३ महिन्यांमध्ये मला कशा कशाचे पैसे द्यावे लागणार आहेत, जे चुकवता येणारच नाहीत.
- त्याचबरोबर येणाऱ्या ३ महिन्यांमध्ये माझ्याकडे पैसे कुठून येणार आहेत?
- आता येणारे सुद्धा अनिश्चित आहेत. पण देणाऱ्या काही गोष्टी द्यावे लागणाऱ्या निश्चित आहेत. उदाहरण द्यायचं झालं, तर ईएमआय (EMI)! प्रत्येकाला ईएमआय असतो. तो पुढे न्यावा का मॉरेटरीअम घ्यावं?
- तर त्याच्याबद्धल अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतंय की ते दिलेले बरे समजा ३ महिने जर ईएमआय नाही भरला, तर पुढे त्याचे व्याज लागणार आहे. कारण अख्खा ईएमआय मुद्दल समजला जाणार आहे.
- त्याचबरोबर क्रेडिट कार्डचे पैसे हे तर निश्चितच त्वरित द्यावेत. क्रेडिट कार्ड वरचं व्याज हे खूप जास्त असतं आणि ते परवडण्याजोगं नसतं.
- तिसरी गोष्ट म्हणजे, मला दयावं लागणार भाडे किंवा मला येणार भाडे हे मिळेल का, दोन्ही गोष्टी सामोपचाराने एकमेकांच्या सामंजस्याने कराव्या लागतील .
पहिलं तर आर्थिक नियोजन की माझ्याकडे इतके तरी पैसे ‘सेफ’ असले पाहिजेत. पण माझ्याकडे एवढे पैसे आहेत, तर त्यातील एवढी सेफ्टी म्हणजे मला अर्ध्या रात्री काढता येईल, असे बँक एफडी मध्ये जरूर ठेवावेत आणि ही तर एक वेळ निश्चित आहे की ते अतिशय सुरक्षित असे जे लगेचच मिळू शकतील असा एक इमर्जन्सी फंड (Emergency Fund)!
आज एफडी चे व्याज कमी होत चाललंय आणि कमी होणारच आहे. मग मला ते व्याज पुरणार आहे का? मग मी इतर गोष्टी कडे पण वळू शकतो.
तुम्ही जर इक्विटी (Equity) मध्ये म्हणजे शेअर्स मध्ये जर गुंतवणूक करत असाल आणि त्यातलं कळत असेल, तर मी त्याला लॉन्ग टर्मच म्हणेल शॉर्ट टर्म नाही / डे ट्रेडिंग (Day Trading) नाही.
सकाळी घेतले वाढले किंवा कमी झाले विकले, हे फार धोकादायक आहे. लॉन्ग टर्म मला इन्व्हेस्ट करायचेत.
“लॉन्ग टर्म” मी तीन वेळा म्हणतोय… कारण शेअर्स मध्ये इक्विटीमध्ये घातलेले पैसे तुम्हाला जेव्हा लागतील, त्यावेळेस ते शेअर मार्केट मधून काढता येतीलच असे नाही. त्यावेळेला मार्केट कमी असेल तर, तुम्हाला त्याचा परतावा व त्याच मुद्दल मध्ये घाटा सहन करावा लागेल, नुकसान होईल. त्यामुळे जर कळत असेल, तर चांगल्या कंपन्यांचे शेअर्स… ते सुद्धा एकदम न घेता आत्ताच्या काळामध्ये एक १०% ते १५% घेतले, पुन्हा मार्केट काही कारणामुळे खाली आलं, तर पुन्हा १०% ते १५% अशा ५-६ टप्प्यातून ३ महिन्यात गुंतवणूक करावी. पण आज त्या पैशावर बसावं… एकदम गुंतवणूक करू नये.
कितीही जरी काही वाटले तरी ते मार्केट खाली असेल असे नाही. त्याच्यापेक्षाही खाली जाऊ शकेल किंवा वरही जाऊ शकेल.
चांगल्या कंपन्यांच्या डेट फंडमध्ये तुम्ही पैसे ठेऊ शकता तिथे व्याज सुरक्षित आहेत त्याचं रेटिंग चांगलं असेल, पण हे सर्व करताना योग्य माणसांचा सल्ला आणि एकाचा नाही दोघा तिघांशी बोलून मग निर्णय घ्या. गडबडीत कुठेही पैसे गुंतवू नका.
आज जाणाऱ्या प्रत्येक रुपयाकडे लक्ष ठेवावं. प्रत्येक रुपया बाहेर जाताना मला त्याची गरज आहे का? तो योग्य ठिकाणी गुंतवला जातोय का? आणि मला ४-सहा महिने लागणारे पैसे इमर्जन्सी फंडा मध्ये ठेवता येतील का? प्रथम ते ठेवल्यानंतर इतर गोष्टींचा विचार करायला हरकत नाही.
काही दुष्टीने संधी पण आहे. पण ती टप्याटप्याने संधी आहे आणि माझ्या हातून खूप मोठी संधी हुकतये म्हणून गडबडीत काही निर्णय घेण्यासारखी ही परिस्थिती नाहीये.
मला सर्वजण एक प्रश्न विचारतात की सोन्याची गुंतवणूक कशी राहील?
आता मी जे काही वाचतोय आणि अभ्यास करतोय त्यामध्ये सोन्याच्या किमती वाढायचा काळ आहे, पण मी सांगितल्याप्रमाणे एकदम त्याच्यात गुंतवणूक न करता तुमच्या टोटल असणाऱ्या पैशामध्ये एक हिस्सा कदाचित १०% १५% असेल, हा सोन्यात टप्याटप्याने गुंतवण्यास हरकत नाही आणि त्याला ऑनलाईन गुंतवण्याची आणि ODTF वैगरची पण सोय आहे. पण सोनं … असा कल दिसतोय की एक चांगली गुंतवणूक राहील याची शक्यता आहे. पण एकदम कोणतीही गोष्ट करायला जाऊ नये आणि तुमच्या एकूण असणाऱ्या अर्थांजनांमध्ये एक हिस्सा सोन्यामधल्या गुंतवणुकीत असायला हरकत नाही.
हळू हळू ५-६ महिन्यांनी सगळी उद्योगाची चाके फिरवावीच लागतील. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीला ३ ते ६ महिने पूर्ववत व्हयला लागतील.
त्याचबरोबर भारताला अनेक संध्या उपलब्ध होतील. जागतिक बाजार पेठेमध्ये त्याच्याकडे लक्ष्य ठेवलं, तर आपल्याला आपल्या व्यापार उद्योगात सुद्धा मोठ्या संध्या उपलब्ध होतील.
ही वेळ सगळ्यांनी ३ महिने ६ महिन्याचा हिशोब घालायची आहे आणि स्वतःच आर्थिक नियोजन करायची आहे.
तसे तर demonetization झाल्यापासऊन आपल्या सर्वांना ऑनलाईन पेमेंट सुचवलेले आहे. अनेकजण वापरायलाही लागलेले आहेत. अगदी सध्या सध्या माणसांकडे बरेच ॲप्सआहेत.आपण पटकन म्हणतो मी ऑनलाइन करतो आणि हे देशाच्या प्रगतीमध्ये ऑनलाईन पेमेंट वाढणे स्वाभाविक आहे.
आत्ताच्या दिवसात कोणी कोणी बाहेर पडू शकत नसेल, तर ऑनलाईन पेमेंट करावंच लागतंय! फक्त त्यामध्ये खबरदारी घायची की अनेक फसवे मेसेज येतात, खास करून एक लिंक येते. ती लिंक दाबली तर त्यातून फार मोठे धोके उदभवू शकतात, तर ती काळजी कोठल्याही लिंकवर जाताना घ्या. कोणतीही लिंक उघडताना १० वेळा विचार करावा. कोणतीही कंपनी अशी स्वतःहून मेसेज पाठवत नाही किंवा कुठलाही फोन आला तुमचा कार्ड नंबर काय आहे? तुमचे हे काय ते काय? तुमची बर्थ डेट काय आहे? असे कोणीही विचारत नाही. १०० वेळा विचार करावा की कोण व्यक्ती विचारते काही बिघडत नाही उत्तर देऊ नका. लिंक ओपन करू नका.
अजून एक खबरदारी निश्चित घेता येईल की, पासवर्ड हे सतत बदलावे. सोपे पासवर्ड नसावेत. पासवर्ड वरच्यावर बदल्याने हा धोका टळू शकतो. ही खबरदारी घेणे अपल्या हातात आहे. आपण जर त्याच्यात चौकस राहिलो, तर फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे.
एक चांगली गोष्ट आहे आपल्या गरजा किती कमी आहेत आणि नको असलेल्या गोष्टी पाहिजेत म्हणून घ्यायचा कल इथून पुढे तरी आपल्याकडे राहणार नाही. जेवढ्या गरजा तेवढेच गिर्हाईक किंवा कोणीही पैसे खर्च करून आणण्याच्या मागे लागेल. नको असलेल्या गोष्टीत काही काळ तरी पैसे गुंतवू नयेत, खर्च करू नये अशी माझी सर्वांनां विनंती आहे.
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/
2 comments
मॅनेजमेंट गुरू तथा बिझनेस कोच मा. चकोर गांधी यांचे सद्य स्थितीवरील भाषण ऐकले त्यात अर्थ विषयक कोणती काळजी व उपाययोजना कशा कराव्यात याविषयी खुप अभ्यासपूर्ण माहिती मिळाली त्याबद्दल अर्थ साक्षर चे धन्यवाद यापुढे असेच माहितीपूर्ण सदर द्यावे ही विनंती
मॅनेजमेंट गुरू तथा बिझनेस कोच मा . श्री . चकोर गांधी यांचे सद्य स्थितीवरील भाषण ऐकले त्यात अर्थ विषयक कोणती काळजी घ्यावी व उपाययोजना काय असावी याबद्दल खुपच सुंदर अभ्यासपूर्ण माहिती मिळाली त्याबद्दल अर्थ साक्षर चे मन : पूर्वक धन्यवाद व पुढील कार्यासाठी शुभेच्छा !