नोकरीच्या शोधात आहात का ? महाजॉब्स पोर्टलला भेट द्या ! 

Reading Time: 2 minutes

महाजॉब्स पोर्टल (Mahajobs Portal)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरु केलेल्या “महाजॉब्स पोर्टल”  (Mahajobs Portal) या नोकरीविषयक पोर्टलला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील इच्छुक उमेदवारांनी पहिल्याच दिवशी ‘महाजॉब्स’ला मोठा प्रतिसाद दिला.  नोकरी शोधणारे 13,300  आणि 147  छोट्या मोठ्या उद्योजकांनी पहिल्या दिवशी वेबसाइटवर आपले खाते (Sign up) केले आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी उमेदवारांची संख्या 88,473 आणि उद्योजकांची संख्या 751 एवढी झाली होती.

७८% भारतीय लघु, सूक्ष्म उद्योगांचे लॉकडाऊन

 • कोव्हीड-19 महामारीमुळे करण्यात आलेले लॉकडाऊन, काही नैसर्गिक आपत्ती अशा अनेक कारणांचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला आहे. मंदीमुळे अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. 
 • याच काळात महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार त्यांच्या  गावात  परत गेल्यामुळे कामगारांचा तुटवडा  निर्माण  झाला आहे. 
 • कामगारांच्या तुटवड्यामुळे अनेक कारखाने सुरू होऊ शकलेले नाहीत, तर अनेक कारखाने अपुऱ्या मनुष्यबळावर कसेबसे काम करत आहेत.
 • बेरोजगारांना नोकरीची गरज, तर उद्योगांना कामगारांची गरज अशी परस्परपूरक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये गरज होती ती या दोन टोकांना एकत्र आणण्याची. 
 • या पोर्टलमुळे नोकरी शोधणारे गरजू नागरिक आणि उद्योजक यांच्यातील अंतर कमी होण्यास मदत होईल. 
 • गरजूंना नोकरी आणि उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळवून देण्यासाठी या पोर्टलची खूप मोठी मदत होणार आहे.  
 • या पोर्टलद्वारे महाराष्ट्रातील उद्योगांसाठी कायमस्वरूपी कामगार व्यवस्था निर्माण करणे सहज शक्य होईल. 

कोव्हिड-१९ : अडथळ्यापासून संधीपर्यंत !

Mahajobs Portal – स्थानिकांना संधी :

 • स्थानिक रहिवाशांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या मुख्य उद्देशाने “महाजॉब्स पोर्टल” सुरू करण्यात आले आहे. 
 • या पोर्टलद्वारे स्थानिक रहिवाशांना व कामगारांना उद्योजक खास करून स्थानिक उद्योजक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतील.  
 • कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कर्मचार्‍यांच्या भरतीसाठी या पोर्टलमुळे मोलाची मदत होणार आहे. 
 • पोर्टलवर नोकरी करणार्‍यांना अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
 • पोर्टलवर एकूण 17 प्रकारचे सेक्टर्स उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, टेक्सटाईल आणि फार्मास्युटिकलचा समावेश आहे. 
 • यापैकी आपल्या प्रोफाईलला सुयोग्य असणाऱ्या नोकरीसाठी उमेदवार अर्ज करु शकतात.
 • “महाजॉब्स पोर्टल” हे महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभाग, कामगार विभाग आणि कौशल्य विकास-उद्योजकता यांच्या संयुक्त उद्यमाने सुरु करण्यात आले आहे.

कोरोनाव्हायरस आणि करिअर

महाजॉब पोर्टलवर नोंदणी कशी कराल? (Mahajob Portal Registration )

 1. सर्वप्रथम  महाजॉब पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या  https://mahajobs.maharashtra.gov.in/
 2. जॉब फाइंडर नोंदणीवर टॅप करा
 3. नाव, ई-मेल आयडी, संपर्क क्रमांक भरा. आवश्यक तपशील भरा.
 4. आपल्याकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असल्यास “होय” हा पर्याय निवडा
 5. आपल्याला आपल्या नोंदणीकृत क्रमांकावर तसेच आपल्या ई-मेल आयडीवर एक ओटीपी क्रमांक मिळेल
 6. ओटीपी क्रमांक भरून आपला मोबाईल नंबर सत्यापित (Verify) करा आणि योग्य पासवर्ड निश्चित करा.
 7. योग्य कॅप्चा प्रविष्ट करा आणि सबमिट बटन दाबा.

अधिक माहितीसाठी महाजॉब पोर्टलच्या https://mahajobs.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 

 Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Click to rate this post!
[Total: 3 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.