पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यायचा आहे? मग हे वाचा

Reading Time: 4 minutes

निसर्गाचा कोप म्हणजे काय याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्रासाहित अन्य राज्येही घेत आहेत. खरंतर निसर्गाचं रौद्र रूप बघण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पण प्रत्येकवेळी आपला भारत देश येणाऱ्या संकटाला धीराने तोंड देत आला आहे. अशा प्रसंगातच ‘माणुसकी’ नावाच्या धर्माचे प्रकर्षाने दर्शन होते. 

 • सांगली, कोल्हापूरला आलेल्या महापुरामध्ये लाखो  लोकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. याशिवाय माणसांसोबत गुरे ढोरेही वाहून गेली आहेत.
 • या सर्व लोकांच्या पुनर्वसनाची समस्या तर गंभीर आहेच पण सध्या सर्वात मोठी समस्या आहे ती जीवनावश्यक मूलभूत गरजांची म्हणजेच अन्न, वस्त्र व निवारा. 
 • सध्या या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचं काम जोमाने सुरू आहे. लाखो लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी पोचविण्यात आले आहे. परंतु हजारो नागरिक अजूनही पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. 
 • सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या लोकांचा निवाऱ्याचा प्रश्न जरी सुटला असला तरी त्यांच्यासाठी अन्न, पुरेसे कपडे, औषधे तसंच इतर दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे.  
 • पाण्यात अडकलेल्या परंतु उंचावर असलेल्या घरांमुळे सुरक्षित असलेल्या लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न नसला तरी त्यांना पाणी व काही प्रमाणात अन्न व दैनंदिन वस्तूंचा तुटवडाही भासत आहे. 
 • या सर्वांना शासनाकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येत असली तरी ती खूपच कमी पडत आहे. 
 • जात, धर्म, राजकारण विसरून या लोकांना मदत करणे हे एक माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे. 
 • तुम्हाला जर मदतीची इच्छा असेल तर खाली दिलेल्या ठिकाणी तुम्ही तुमची मदत पाठवू शकता. 

पुरग्रस्तांसाना देणगी देण्यासाठीचे विविध पर्याय:

१. मुख्यमंत्री सहाय्यता निधी

 • महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते.
 • https://cmrf.maharashtra.gov.in/index.action# या लिंकवर क्लिक करून त्यावर भीम ॲपच्या सहाय्याने कोड स्कॅन करून मदत करू शकता.

२. पंतप्रधान सहाय्यता निधी:

 • देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत देण्यासाठी ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. 
 • https://pmnrf.gov.in/en/online-donation या लिंकवर क्लीक करून पॅन क्रमांक टाकून भीम ॲप तसेच युपीआयच्या साहाय्याने यासाठी देणगी देऊ शकता. 

 ३. नाम (NAAM) फाऊंडेशन: 

  • पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी नाम फाउंडेशनमार्फतही देणगी स्वीकारण्यात येत आहे. 
  • ही देणगी औषधे, शुद्ध पाण्याच्या बाटल्या, फळे, कोरडा खाऊ, बिस्किटे, साबण, टूथ ब्रश, टूथ पेस्ट, इत्यादी वस्तू फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये जमा कराव्यात. 
 • पुणे:
  • पत्ता: ११३२/३, दुसरा मजला, विष्णू दर्शन,

                    राहुल मेडिकल बिल्डिंग, ललित महाल हॉटेल मागे, एफ.सी.रोड.,

                    मॉडेल कॉलनी, पुणे- ४११०१६

                    संपर्क: ९८८१०४१३५४ 

 • औरंगाबाद:
  • नाम फाउंडेशन, MGM खाडी सेंटर, JNEC कॅम्पस, N- ६, ४३१००५संपर्क: ९११२१६१५६ 

 ४. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती कोल्हापूर:

  • कोल्हापूर शहरात २३ ठिकाणी पुरग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. या पुरग्रस्तांना अन्न, शुद्ध पाणी, औषधे, आरोग्य सेवा कोल्हापूर शहरातील विविध सामाजिक संस्थानी सुरू केलेली आहे. या संस्थापैकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), जनकल्याण समिती तर्फे यापैकी ५ ते ६ केंद्रावर भोजन, औषधे, शुद्ध पाणी व आरोग्य सेवा सुरू केली आहे. या मदत कार्यास आपण सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन कार्यवाह, रा. स्व. संघ, जनकल्याण समिती यांनी केले आहे. 
  • या मदत कार्यात रा. स्व. संघ, जनकल्याण समिती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कार्यकर्ते सहभागी होत आहेत. आपण पुरग्रस्तांना धान्य, शुद्ध पाणी, औषधे तसेच रोख रक्कम, चेकने निधी म्हणून द्यावे ही विनंती.
 • मदत संकलन केंद्र –
  • आपली मदत पंचगंगा सहकारी बँकेच्या सर्व शाखा – महाद्वार रोड, देवकर पाणंद, प्रतिभा नगर व कावळा नाका शाखेत जमा करावी.
  • NEFT/RTGS/Online Transfer – IFSC Code – MAHB0000326
  • Cheques in favour of –

                    आरएसएस जनकल्याण समिती

                    बँक ऑफ महाराष्ट्र

                   शाखा: न्यू महाद्वार रोड, खरी कॉर्नर, कोल्हापूर 

                   बचत खाते क्र.: 60025310280*

 • IFSC Code – MAHB0000326*
 • रक्कम रोख अथवा चेक रूपाने दिल्यास रीतसर पावती देण्यात येईल. या देणगीस 80G खाली करसवलत आहे.
 • संपर्क –
  • विनायक कुलकर्णी, कार्यवाह, रा. स्व. संघ, जनकल्याण समिती, कोल्हापूर. मोबाईल – 9422034500
  • अमर पारगावकर, मोबाईल – 9423825245
  • केशव गोवेकर, मोबाईल  – 9373655777

५. सकाळ रिलीफ फंड:  

 • यासाठी राज्याभरातल्या ‘सकाळ’च्या कोणत्याही कार्यालयाशी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधा. रोख रक्कम स्वीकारण्याची व्यवस्थाही ‘सकाळ’च्या सर्व कार्यालयांमध्ये शनिवारपासून (ता.१०) करण्यात येत आहे.
 • पत्ता : ५९५, बुधवार पेठ, पुणे-४११ ००२
 • या देणगीस 80G खाली करसवलत आहे.
 • या कठीण प्रसंगाला तोड देण्यासाठी हजारो स्वयंसेवकांची मदत लागणार आहेत. त्यामुळे ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे  त्यांनीही ‘सकाळ’शी संपर्क साधावा. पुणे आणि अन्य भागांतून मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी संस्था संघटना मदतीसाठी ‘सकाळ’शी संपर्क साधत आहेत, अशा सर्वांना आपण कोणत्या स्वरूपात मदत करू इच्छता हे ‘सकाळ’ला कळवा.
 • संपर्क – 98810999081 
 • मिस्ड कॅाल द्या – 98810999081 
 • फोन – 9881598815 
 • इ-मेल – Support@sakalrelieffund.com

याशिवाय अनेक सामाजिक संस्थाही मदत कार्यात सहभागी झाल्या आहेत. स्थानिक पातळीवरही धर्म, जात, वैयक्तिक मतभेद विसरून जोमाने मदतकार्य चालू आहे. या प्रसंगी मदत करणे आवश्यकच आहे. फक्त मदत करताना विश्वसनीय संस्थेच्या अथवा व्यक्तीच्या हातातच मदत सोपवा कारण आपल्याकडे मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. आपली मदत योग्य ठिकाणी पोचणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा जपून कर मदत मनुजा…. 

(आपणांस माहिती असणाऱ्या विश्वसनीय संस्थांची नावेही आम्हाला जरूर कळवा. )

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]