Reading Time: 3 minutes

शुक्रवार 19 जुलै रोजी एकाच वेळी जगातल्या बहुतांश विमान वाहतूक सेवा आणि बँक सेवा अचानक कोलमडल्या आणि कम्प्युटर स्क्रीनवर अचानक एरर मेसेज धकडला. जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीची कार्यप्रणाली अचानक बिघडली. एखाद्या इंग्लिश मुव्हीला शोभेल अशी ही गोष्ट वाटू शकते. मात्र एआयमधील सर्वांचा वाढता सहभाग लक्षात घेतला तर असं काही घडणं हे सर्वसामान्य माणसांना विचार करायला लावणारं आहे; त्यासोबतच, आज पूर्णपणे या तंत्रज्ञानाच्याच लाईव्ह सपोर्ट सिस्टिमवर अवलंबून असणाऱ्या  सेवा क्षेत्रातील अनेक दिग्गज अशा कंपन्यांच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण होऊ शकतो. 

नेमके कधी आणि काय घडले ?

  • शुक्रवारी सकाळी अचानक कम्प्युटरवर ‘ब्ल्यु स्क्रीन डेथ’ असा मेसेज झळकला आणि मायक्रोसॉफ्ट-365 प्रणाली वापरणारे सर्वच कम्प्युटर काम करायचे थांबले. ‘ब्ल्यु स्क्रीन डेथ’ एक प्रकारची चूक(एरर) आहे, त्यामुळे कामकाज अचानक थांबते, सिस्टम रिस्टार्ट होते आणि डेटा लॉस होण्याची शक्यता असते. 
  • अमेरिकेमधे क्रॉउड स्ट्राइक नावाची सायबर सुरक्षा पुरवणारी कंपनी आहे. या कंपनीचे ‘ फाल्कन सेन्सर ’ नावाचे सॉफ्टवेअर आहे, हे सॉफ्टवेअर कम्प्युटरवर होणारे सायबर हल्ले रोखण्याचे काम करते. 
  • फाल्कन सेन्सर सॉफ्टवेअरचे अपडेट करत असताना त्यात बिघाड होऊन त्याच्याशी संबंधित सर्वच कम्प्युटर बंद पडले.
  • क्रॉउड स्ट्राइक कंपनीचे इडीआर (एंडपॉइंट डिटेक्शन अँड रिस्पॉन्स ) एडपॉइंट शोधण्याचे काम करते तसेच प्रतिसाद  तपासणे आणि त्याप्रमाणेउपाय – योजना करणे या सर्व गोष्टी फाल्कन च्या मदतीने क्रॉउड स्ट्राइक क्लाऊडमधे गोळा करत असते.
  • ही कार्यप्रणाली प्रचंड मोठा असा डेटाबेस वापरत असते आणि त्याचा हिस्टॉरिकल आणि रीयल टाइम अशा  दोन्ही प्रकारे चालणाऱ्या माहितीवर काम करत असते. अतिशय वेगवान आणि मोठ्या प्रमाणावर हे सर्व कामकाज चालते.  

इडीआरमधे रीयल टाईम रिस्पॉन्स असल्यामुळे आलेला धोका लक्षात घेऊन लवकरात लवकर त्याच्यावर उपाय केले जातात. फाल्कन सॉफ्टवेअरच्या बिघडामुळे हे सर्व कामकाज बंद पडून जागतिक स्तरावर याचे परिणाम जाणवले.

विमान वाहतूक सेवा आणि बँक विस्कळीत :

  • मायक्रोसॉफ्टच्या या आउटेजमुळे जगभरातल्या विमान वाहतूक सेवा विस्कळीत झाल्या. 
  • विमान कंपनीची नेव्हीगेशन डिपारचर करणारी कंट्रोल सिस्टम बंद झाली .त्यामुळे विमानतळावरील प्रवासी गोंधळले, बोर्डिंग पास न मिळाल्यामुळे हाताने लिहिलेले तिकीट प्रवाशांना देण्याची वेळ कर्मचाऱ्यावर आली.
  • अमेरिकेमधे डेल्टा ,अमेरिकन ,यूनायटेड या विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना फटका बसला. 
  • भारतामध्ये इंडिगो, एयर इंडिया ,स्पाइसजेट या विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना फटका बसला, यात फ्लाइट रद्द होणं, फ्लाइट निघण्यास उशीर होणं आणि प्रवसांची गर्दी आणि तारांबळ अशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं.
  • दुबई इंटरनॅशनल विमानतळ, मियामी इंटरनॅशनल विमानतळ, सिडनी , टोकियो, फ्रॅंकफर्ट, लॉस एंजेलिस, सिंगापूरमधील देखील विमानतळावर हीच स्थिती होती.
  • मायक्रोसॉफ्टच्या  या आउटेजमुळे बँका आणि इतर वित्तसंस्था यांचे कामकाज देखील विस्कळीत झाले.अ‍ॅमेझॉन वेब सर्विस, डाऊन डिटेक्टर अशा इतर सेवा देणाऱ्या वेबसाइट सुद्धा काही काळ विस्कळीत होत्या.

जाणून घ्या : चुकीच्या खात्यावरू गेलेले पैसे परत कसे मिळवायचे?

मायक्रोसॉफ्टचे नुकसान:

  • या सर्व समस्येमुळे मायक्रोसॉफ्टचे सुद्धा आर्थिक नुकसान झाल्याचे समोर येत आहे. शेअर मार्केटमधे मायक्रोसॉफ्टचे एक शेअरचे मूल्य $ 443.52 वरुन $ 440.37 वर आले आहे. 
  • असे म्हंटले जाते की कंपनीच्या एका शेअर मधे 0.1% चे नुकसान झाले तर कंपनीला 3.33 बिलियन डॉलरचे नुकसान होतं.
  • त्यामुळे काही तासातच मायक्रोसॉफ्टची जवळपास 23 बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे असे समोर येत आहे.

मायक्रोसॉफ्ट आणि क्रॉउड स्ट्राइकची भूमिका :

  • क्रॉउड स्ट्राइकच्या अधिकाऱ्यानी सांगितले की त्यांचे कर्मचारी झालेला सर्व प्रकार आणि त्याचे उपाय शोधण्याचे  काम करत आहे. 
  • तसेच सर्वात महत्वाचे की ही घटना म्हणजे सायबर हल्ला नसून सॉफ्टवेअरच्या अपडेटच्या चुकीमुळे उद्भवलेली समस्या आहे. 
  • लिनक्स आणि मॅक या होस्ट वर याचा काही परिणाम दिसून आला नाही, असे देखील  स्पष्ट केले आहे.
  • ही घटना म्हणजे सायबर हल्ला नाही हे अधिकृतपणे सांगणे अतिशय गरजेचे होते कारण सायबर हल्ला झाला असावा असा गैरसमज लोकांमधे  पसरणे सुरू झाले होते; आजकालच्या रील्सच्या जमान्यात असे गैरसमज पसरणे अर्थात व्हायरल  होणे अवघड नाही.
  • मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले सत्या नडेला यांनी देखील परिस्थिति आटोक्यात येणासाठी प्रयत्न सुरू आहे अशी माहिती दिली.
  • मात्र अशा परिस्थितीचा फायदा इतर कोणी घेऊ नये यासाठी सर्व स्तरावरील लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. 
  • काहीही संशयास्पद माहिती, लिंक यावर विश्वास ठेऊ नये तसेच फिशिंग  ई-मेल वर क्लिक करू नये असे सांगितले जात आहे. 

माहितीपर : आयकर रिटर्न fy 2023-2024 

सद्यस्थिती : 

  • भारतातील विमानसेवा शनिवारपर्यंत पूर्ववत होतील असा दिलासा विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी जनतेला दिला आहे.
  • मायक्रोसॉफ्टने मात्र अजूनही काही ऍप्लिकेशन आणि सुविधा ग्राहकांसाठी सुरू होण्यास उशीर लागू शकतो असे सांगितले आहे.
  • 20 जुलैच्या माहितीनुसार, या घटनेमागच्या  मूळ समस्येचा शोध लागला असून त्यावर उपाय योजना केल्या गेल्या आहेत. मात्र आउटेजच्या परिणामांमुळे निर्माण झालेली परिस्थिति पूर्ववत होण्यासाठी काही दिवस अजून लागतील असे  क्रॉउड स्ट्राइकच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

भविष्यासाठी सावध भूमिका : 

  • या घटनेनंतर मात्र साहजिकच हा विचार मनात येऊन जातो की आपण एकाच कार्यप्रणालीवर किती अवलंबून राहिले पाहिजे. याला काही दुसरा पर्याय असायला हवा ही भविष्याची गरज असू शकते का?
  • बॅकअपसाठी काही सायबर सुरक्षा व्यवस्था अस्तित्वात येऊ शकते का? 
  • आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे जसे अनेक फायदे आहेत, तसे अनेक तोटे आहेत. भविष्यात येणाऱ्या संभाव्य धोक्याची ही सूचना आहे असं समजून काही पाऊले आजच उचलायची गरज आहे का?
  • इतक्या मोठ्या स्तरावरच्या कंपनीच्या सुरक्षेत काही कमतरता निर्माण झाली तर होणाऱ्या नुकसानाचे प्रमाण किती मोठे असू शकते याचा विचार आधीच करणे गरजेचे नाही का? 
  • त्या नुकसानाची भरपाई करण्यात कमीत कमी वेळ लागावा यासाठी काही योजना तयार आहेत का? ज्यामुळे त्याच्यावर अवलंबून असणारे घटक, संस्थाना कमी त्रास सोसावा लागेल. 
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutesमृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.  

मर्यादित भागीदारी संस्था: नियम व वैशिष्ट्ये

Reading Time: 3 minutesव्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे हे प्रश्न सुटू शकतात. डॉक्टर्स, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, वकील, तांत्रिक सल्लागार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार यांना आपल्या ज्ञानाचा आणि सहकाऱ्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मर्यादित भागीदारीमुळे (LLP) आपला व्यवसाय वाढवता येऊ शकेल. अशा प्रकारे मर्यादित भागीदारी असलेली भागीदारी स्थापन करता येणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutesकंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) आणि भागीदारी संस्था (Partnership Firm)

Reading Time: 3 minutesस्वतःचा व्यवसाय सुरु करायचा म्हटलं तर, व्यवसायाचे अनेक पर्याय आपल्या समोर असतात. प्रत्येक प्रकारचे स्वतःचे असं वेगळं वैशिष्ट्य व फायदे तोटे आहेत. आजच्या लेखात आपण भागीदारी संस्था (Partnership Firm), मर्यादित दायित्व भागीदारी म्हणजेच लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (LLP) आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय? त्यांची वैशिष्ट्ये, नोंदणी प्रक्रिया व कार्यपद्धतीची माहिती घेऊया.