MTAR Technologies IPO
https://bit.ly/2NWLIDo
Reading Time: 2 minutes

MTAR Technologies IPO

आजपासून या महिन्यातला पहिला आयपीओ एमटीएआर टेक्नॉलॉजीज (MTAR Technologies IPO) विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या आयपीओ मधून खूप मोठा फायदा होऊ शकतो असे अनेक तज्ज्ञांचे  मत आहे. सदर आयपीओची विक्री  5 मार्च रोजी बंद होईल.  

सन 2021 सुरु झाल्यापासून एकूण 8 आयपीओ येऊन गेले. या महिन्यात अजूनही काही मोठे आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध होतील. गेल्या काही वर्षांत काही अपवाद वगळता आयपीओ गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला आहे. “आत्मनिर्भर भारत” योजनेची लोकप्रियतेचा फायदा एमटीएआर टेक्नॉलॉजीज सारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना नक्कीच होऊ शकतो. 

एमटीएआर टेक्नॉलॉजीजचा (MTAR Technologies)

  • एमटीएआर टेक्नॉलॉजीज ही हैदराबादस्थित टेक कंपनी असून  आयपीओ विक्रीमधून 596 कोटी रुपये जमा करणार आहे. 
  • कंपनीतर्फे आयपीओची किंमत बँड 574-575 रुपये निश्चित करण्यात आली असून किमान लॉट साईज 26 निश्चित करण्यात आली आहे. 
  • याचाच अर्थ नियमानुसार गुंतवणूकदारास किमान 26 शेअर्ससाठी तर कमान 338 शेअर्स / ₹ 194,350 साठी अर्ज करता येईल. 
  • गुंतवणूक तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सदर आयपीओला ग्रे मार्केटमध्ये बम्पर प्रीमियम (75%) मिळत आहे, म्हणजेच ग्रे मार्केट मधील अनलिस्टेड शेअर्स इश्यूच्या किंमतीपेक्षा 430 रुपयांच्या वर 1005 रुपयांवर व्यापार करत आहेत.
  • एकूणच एमटीएआर टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या आयपीओ कडून गुंतवणूकदारांना भरपूर अपेक्षा आहेत.

एमटीएआर टेक्नॉलॉजीज (MTAR Technologies)

  • 1999 साली स्थापन झालेली एमटीएआर टेक्नॉलॉजीज कंपनी हे अभियांत्रिकी उद्योगातील एक आघाडीचा नाव आहे.
  • मिशन-क्रिटिकल प्रिसिजन कम्पोनंट विथ क्लोज टॉलरन्स आणि क्रिटिकल असेम्ब्ली, टेस्टिंग आणि क्वालिटी कंट्रोल प्रोसेस, इत्यादी कंपनीची प्रमुख उत्पादने आहेत.
  • कंपनीची स्थापना झाल्यापासून, एमटीएआर टेक्नॉलॉजीजने आपल्या उत्पादनाच्या पोर्टफोलिओमध्ये महत्त्वपूर्ण असेंब्ली म्हणजेच लिक्विड प्रोपल्शन इंजिन, जीएसएलव्ही मार्क III, बेस श्राऊड असेंबली आणि अग्नी प्रोग्राम्ससाठी एअरफ्रेम्स, एलसीएचे अ‍ॅक्ट्युएटर्स, इंधन पेशींसाठीचे पॉवर युनिट, इंधन मशीनिंग हेड, ब्रिज आणि कॉलम यांचा विस्तार केला आहे.  ड्राइव्ह मेकॅनिझीम्स, थिंबल पॅकेज इत्यादी. जटिल उत्पादनांच्या श्रेणीत भारतीय अण्विक, संरक्षण आणि अवकाश क्षेत्राच्या विविध आवश्यक उत्पादने यांचा समावेश आहे. इस्रो, एनपीसीआयएल, डीआरडीओ, ब्लूम एनर्जी, राफेल, एल्बिट असे एमटीएआर टेक्नॉलॉजीजने महत्वपूर्ण ग्राहक आहेत.
  • हैदराबाद व तेलंगणामध्ये सध्या या कंपनीकडे 7 अत्याधुनिक उत्पादन सुविधा आहेत ज्यात अचूक मशीनिंग, असेंब्ली, विशेष फॅब्रिकेशन, ब्रेझिंग आणि उष्णता उपचार, चाचणी आणि गुणवत्ता नियंत्रण आणि इतर विशेष प्रक्रिया राबविल्या जातात.

कंपनीची वैशिष्ट्ये

  • उत्पादन पोर्टफोलिओची विस्तृत श्रेणी.
  • 7 आधुनिक तंत्रज्ञान निर्मिती युनिट्स.
  • सप्लायर बेस
  • उत्तम आर्थिक ट्रॅक रेकॉर्ड.
  • अनुभवी आणि पात्र व्यवस्थापन.

एमटीएआर टेक्नॉलॉजीज आयपीओ टाइम टेबल

  • एमटीएआर टेक्नॉलॉजीज आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध  – 3 मार्च 2021 
  • क्लोजिंग तारीख  – 5 मार्च 2021
  • अलॉटमेंट  – 10 मार्च 2021
  • रिफंड प्रक्रिया- 12 मार्च 2021
  • डिमॅट अकाउंट मध्ये शेअर्स जमा होण्याची तारीख – 15 मार्च 2021
  • लिस्टिंग – 16 मार्च 2021 

(लेखात माहिती दिलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची, अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. सदर कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…