Reading Time: 2 minutes
 • सध्याच्या काळात बॅंकांचे व्याजदर आकर्षक राहिले नाहीत. त्यामुळे ठेवींवरच्या व्याजावर अवलंबून असणाऱ्याना आता आपले पुढे कसे भागणार आणि आता कशात गुंतवणूक करावी, अशी काळजी आपल्याला वाटत असते. 

 • ८-१० वर्षांपूर्वी १०-१२ % आसपास असलेले व्याजदर आता ६.५०-७% इतके खाली आले. जसजशी देशाची आर्थिक प्रगती होत जाते, तसेतसे व्याजदर कमी होतात, असे प्रगत देशांकडे पाहिले की लक्षात येते. 

 • त्यामुळे या पुढील काळात आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखण्यासाठी RBI ही दीर्घ मुदतीमध्ये  व्याज दर कमी करत राहील असा कल आहे

 • त्यामुळे अशा परिस्थितीत ठेवींवरच्या व्याजापेक्षा थोड्या अधिक प्रमाणात आणि नियमित उत्पन्नासाठी इक्विटी जास्त असलेल्या इक्विटी हायब्रीड फंड योजनांकडे गुंतवणूकदारांनी लक्ष दिले पाहिजे. 

 • निवृत्तीच्या काळात खरे उत्पन्न (मिळणारे व्याज – महागाई दर) वाढविण्यासाठी हायब्रीड योजनेतून “सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लान” (एसडब्ल्यूपी) चांगला उपयोग होईल. मात्र, अल्प मुदतीमध्ये बाजारातील चढ उतारा मुळे जर भांडवलात तात्पुरती घट झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता हवी. 

 • याशिवाय हायब्रीड फंड  योजनांचे इतरही फायदे आहेतच. 

१) एकाच योजनेतून डेट (कर्जरोखे) आणि इक्विटी (शेअर्स) योजनेचे फायदे (म्हणजे स्थिरता आणि वृद्धी) मिळू शकतात. उत्तम  ऍसेट ऑलोकेशन साठी जास्त योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागत नाही, 

२) फंड व्यवस्थापक नियोजित “ऍसेट ऍलोकेशन” कायम ठेवण्यासाठी दरमहा “रिबॅलन्सिंग” करीत असल्याने गुंतवणूकदाराला त्याकडे लक्ष ठेवावे लागत नाही. डेट व इक्विटी भागाच्या विक्रीवर “एक्झिट लोड” द्यावा लागत नाही, 

३) नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी या योजना अतिशय उपयुक्त ठरतात, 

4) “रिबॅलन्सिंग”साठी जेव्हा फंड व्यवस्थापक डेट किंवा इक्विटी भागाची विक्री करतात, त्यावरील अल्प मुदतीचा भांडवली लाभ कर हा म्युच्युअल  फंडासाठी शून्य असतो.

हायब्रीड फंडात इक्विटी किंवा डेट प्रकार जास्त असणाऱ्या योजना असतात.

 • डेट प्रकार जास्त (७० % पेक्षा) असणाऱ्या खुल्या योजनांना “कॉन्सर्व्हेटिव्ह हायब्रीड फंड” असे म्हटले जाते. यात साधारणपणे १५ ते ३० टक्के इक्विटी आणि उर्वरित डेट असतात. यामुळे जोखीम कमी असते; पण परतावाही इक्विटी आधारित हायब्रीड फंड  योजनांपेक्षा कमी असतो.

 • त्यामुळे अधिक परताव्यासाठी इक्विटीचे प्रमाण जास्त (६५ % पेक्षा) असलेल्या योजनांची “अग्रेसिव्ह इक्विटी हायब्रीड फंड”निवड करावी. एकरकमी किंवा “सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान’द्वारे (एसआयपी) ठराविक रक्कम हायब्रीड फंड योजनेत जमा करून त्यातून निवृत्तीच्या काळात रक्कम काढून घेता येते, ज्याला सिस्टीमॅटिक विड्रॉवल प्लान (एसडब्ल्यूपी) म्हणतात. 

 • दरमहा किती रक्कम काढावी, हे गुंतवणूकदाराने ठरवायचे असते. (पूर्वीची कामगिरी बघता साधारणपणे वार्षिक ९% रक्कम काढणे सहजशक्य आहे.). 

उदाहरण द्यायचे झाल्यास जर गुंतवणूकदाराने रु. १०,००,००० गुंतवले व दर महिन्याच्या १० तारखेला रु. ७५०० एस डब्लू पी केली तर गुंतवणूक दाराला नियमित उत्पन्न चालू होते. 

 • गुंतवणूकदार एस डब्लू पी ची रक्कम केंव्हाही बदलू शकतो. ज्या वर्षी म्युच्युअल फंड ९ % पेक्षा जास्त परतावा देतात तेंव्हा एस डब्लू पी मधून काढलेल्या रकमेच्या वरची रक्कम आपली गुंतवणुकीत जमा होते, मात्र जर ९% पेक्षा कमी परतावा असेल तर आपले भांडवल थोडे खाली जाण्याची शक्यता असते.

 • मात्र मागील इतिहास पाहता दीर्घ मुदतीमध्ये आपले भांडवल खाली जाण्याची शक्यता नगण्य असते. हायब्रीड फंडातून मासिक लाभांश घेण्याचाही पर्याय असतो. 

 • मात्र १ फेब्रुवारी २०१८ च्या बजेट प्रमाणे डिविडेंड वर डिविडेंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स लागतो. त्यामुळे डिविडेंड पर्याय पेक्षा ग्रोथ पर्यायातून एस डब्लू पी जास्त आकर्षक ठरते.

 • बहुतेक सर्वच म्युच्युअल फंड कंपन्यांच्या हायब्रीड फंड प्रकारातील योजना उपलब्ध असल्याने निवडीला खूप वाव आहे. बॅंकेत जशी मुदलाची आणि व्याजाची हमी दिली जाते, तशी म्युच्युअल फंडाकडून जरी मिळत नसली, तरीसुद्धा करमुक्त आणि बॅंकेपेक्षा अधिक परतावा मिळण्यासाठी हायब्रीड योजनांचा विचार केला पाहिजे.

नोव्हेंबर २०१६ म्हणजेच नोटबंदी लागू झाल्यानंतर ह्या हायब्रीड फंड योजनांमध्ये साधारण रु. ३ लाख करोड ची गुंतवणूक झाली आहे. त्यात मुख्यत्वे जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे जे एस डब्लू पी मार्फत दर महिन्याला ठराविक रक्कम आपल्या गुंतवणुकीतून घेत आहेत.

ज्यांना शेयर बाजाराची धास्ती वाटते त्यांनी हायब्रीड फंडांपेक्षा हि कमी जोखिमेचा “क्रेडिट ओप्पोर्टच्युनिटी फंडाची” निवड करावी. मागील इतिहास पाहता ह्या फंडामध्ये दीर्घ मुदतीमध्ये बँक FD च्या साधारण २-३ % जास्त परतावा मिळतो.

Mutual Fund Investments are subject to market risk, please read all scheme related documents before investing.

-निलेश तावडे.

(चित्रसौजन्य- https://bit.ly/2OqhVkC )

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…