रिजर्व बँकेने जाहीर केले १०० रुपयाच्या नोटेचे नवे रूप

Reading Time: 2 minutes
  • रिजर्व बँकेच्या जुलै महिन्यात प्रसिद्ध झालेल्या “मॉनेटरी अँड क्रेडिट इन्फॉरमेशन रिव्ह्यू” च्या नव्या पत्रकानुसार १९ जुलै २०१८ रोजी रिजर्व बँकेने १०० रुपयाच्या नव्या रूपातील नोटा चलनात आणायचे जाहीर केले आहे. 

  • एका बाजूला देशाच्या सांस्कृतिक वारसा असलेला आकृतिबंधाचे दर्शन घडविणाऱ्या महात्मा गांधी मालिकेतील या नोटा फिकट जांभळ्या रंगाच्या आहेत. 

  • तुलनेने लहान (66 मिमी × 142 मिमी) असलेल्या या नोटा डॉ. उर्जित पटेल यांच्या सहीनिशी प्रसारित केल्या जातील. 

  • ही नवी नोट लवकरच चलनात येत असली तरी त्याचवेळी यापूर्वीच्या रु. १०० च्या इतर सर्व नोटाही वैध आणि चलनात राहतील असेही रिजर्व बँकेने नमूद केले आहे. 

नव्या नोटेची काही ठळक वैशिष्ट्ये:

दर्शनी बाजू:

 

१. पारदर्शक रजिस्टरसह ठळक दिसणारा १०० हा अंक 

२. देवनागरी लिपीत छापण्यात आलेला १०० हा अंक 

३. केंद्रस्थानी असलेले महात्मा गांधींचे छायाचित्र 

४. सूक्ष्म अक्षरात लिहिलेली  ‘RBI’, ‘भारत’, ‘India’ and ‘100

५. भारत आणि RBI लिहिलेला सुरक्षा धागा. ठराविक कोनातून पाहिल्यावर धाग्याचा हिरवा रंग निळसर  होतो. 

६. गॅरंटी क्लॉज, वचननाम्या सह गव्हर्नरची स्वाक्षरी, आणि महात्मा गांधींच्या छायाचित्राच्या उजवीकडे RBI चे बोधचिन्ह. 

७. नोटेच्या उजवीकडे अशोक स्तंभाचे बोधचिन्ह. 

८. महात्मा गांधींच्या फोटो आणि १०० च्या अंकांचे वॉटरमार्क. 

९. वरच्या उजव्या आणि खालच्या डाव्या कोपऱ्यात आकारात क्रमकमाने वाढत जाणारे अंक. 

१०. दृष्टिहीनांसाठी 

  • काहीसे उंचावलेले महात्मा गांधींचे छायाचित्र

  • उंचावलेले अशोक स्तंभाचे छायाचित्र

  • स्पर्शज्ञानासाठी त्यावरील  त्रिकोणी आकृती व त्यातील सूक्ष्म अक्षरात छापलेले  १०० 

  • नोटेच्या उजवीकडे आणि डावीकडे अंशीय कोनात आखलेल्या दर्शनी रेषा

मागील बाजू-

१. डावीकडे दर्शविण्यात आलेले नोटेच्या छपाईचे वर्ष 

२. स्वच्छ भारत योजनेचे बोधचिन्ह व घोषवाक्य 

३. भाषा सूची

४. “रानी की वाव” चा आकृतिबंध

५. देवनागरी लिपीतील १०० हा अंक  

या नोटांच्या छपाईचे काम सुरु असून ते पूर्ण झाल्यावर पूर्वापार प्रथेनुसार बँका व इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून या नव्या नोटा चलनात आणल्या जातील. 

(चित्रसौजन्य- https://bit.ly/2Q95I1X )

Leave a Reply

Your email address will not be published.