NSC RFSC
Reading Time: 2 minutes

NSC RFSC 

मुंबई शेअरबाजार पुरस्कृत इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज व राष्ट्रीय शेअरबाजार पुरस्कृत एनसीसी आरएफएससी (NSC RFSC) हे भारतातील दोन आंतरराष्ट्रीय शेअरबाजार आहेत. गांधीनगरजवळ नव्यानेच वसवण्यात आलेल्या गिफ्टसिटी या आंतराष्ट्रीय व्यापार केंद्र असलेल्या स्मार्ट शहरात दिवसभरातील 22 तास कामकाज चालू असणारा इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज व 15 तास सुरू असणारा एनसीसी आरएफएससी यामुळे जगभरातील लोकांना भारतातील आंतरराष्ट्रीय बाजारात व्यवहार करण्याची सोय झाली आहे. येथे करविषयक अनेक सवलती असल्याने  गुंतवणूकदारांना कमीतकमी खर्चात स्पर्धात्मकदराने येथे व्यवहार करता येतात.

भारतीय गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास परवानगी –

  • या बाजारात परकीय कंपन्यांचे अन्य भारतीय बाजारात न नोंदवलेले शेअर, भारतीय कंपन्यांचे शेअर, डिपॉझिटरी रिसीट, करन्सी, कमोडिटी, इंडेक्स, कर्जरोखे, व्याजदर यांचे डेरिव्हेटिव्हचे व्यवहार होतात. 
  • या व्यवहारांवर एसटीटी/ सिटीटी, आयकर, लाभांशकर, भांडवली नफ्यावर कर लागत नसल्याने गुंतवणूकदाराना भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. 
  • येथील दलाल बाजार नियमांचे पालन करून स्वतःसाठी, देशीविदेशी थेट गुंतवणूकदार ग्राहकांच्या वतीने व्यवहार करू शकतात. 
  • हे दोन्ही बाजार चालू होऊन 4 वर्षांहून अधिक कालावधी झाला असून अजूनपर्यंत तेथे निवासी भारतीयांना कोणतेही व्यवहार करता येत नव्हते कारण अनिवासी भारतीय गुंतवणूकदार व परदेशी गुंतवणूकदार सोडून, बाजारात व्यवहार करण्यास परवानगी नव्हती. आता काही अटीशर्तीवर निवासी भारतीय गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास परवानगी देण्याचे एनएसस्सी इंटरनॅशनल एक्सचेंजने ठरवले आहे.
  • यासंबंधी पत्रक काढून योग्य तो खुलासा करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय शेअरबाजारकडून देण्यात आली आहे. यामुळे भारतीय गुंतवणूकदारांना एक वेगळा गुंतवणूक पर्याय उपलब्ध झाला आहे. 
  • आता भारतीय गुंतवणूकदार आरबीआयच्या, भांडवली खात्यातून व्यवहार करण्यात येणाऱ्या एलआरएस नियमाधीन राहून, प्रत्येक आर्थिक वर्षात 250000 डॉलर्स पर्यंत रक्कम भारताबाहेर पाठवण्याच्या नियमाधीन राहून या मर्यादेपर्यंत  बाजारात व्यवहार करता येतील.
  • हे व्यवहार डिपॉझिटरी रिसीप्ट किंवा सॅन्डबॉक्स स्वरूपात असतील यासाठी येथील ब्रोकरकडे वेगळे डिपॉझिटरी खाते उघडावे लागेल. याच खात्यात ते धारण करता येतील.
  • येथे करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर विविध करातून वगळले गेल्याने अतिशय कमी प्रक्रिया खर्चात ही गुंतवणूक करता येईल. ही प्रक्रिया अतिशय सुलभ असेल.
  • गुंतवणूकदारांना त्यांनी धारण केलेल्या गुंतवणुकीच्या प्रमाणात, ही गुंतवणूक अत्यल्प असली तरी ऑप्शन ट्रेडिंग करता येईल. 
  • गुंतवणूकदारास त्याच्या धारण प्रमाणाप्रमाणे प्रमाणशीर पद्धतीने त्यावरील फायदे जसे डिव्हिडंड, बोनस मिळतील. 

यासंबंधात पूर्ण माहिती लवकरात लवकर तपशीलवार पद्धतीने जाहीर करण्यात येऊन विविध मध्यस्थांमार्फत गुंतवणूकदारांना ती उपलब्ध करून दिली जाईल.

– उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: NSC RFSC in Marathi, NSC RFSC Marathi mahiti, NSC RFSC Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…