Nuvoco Vistas Corporation IPO
Reading Time: 3 minutes

Nuvoco Vistas Corporation IPO

‘नुवोको विस्टाज कॉर्पोरेशन’चा आयपीओ (Nuvoco Vistas Corporation IPO) मार्केटमध्ये विक्रीसाठी उपब्ध झाला आहे. यामध्ये आपण गुंतवणूक करायला हवी की नको? आजच्या घडीला घेतलेला निर्णय भविष्यात पश्चातापास कारणीभूत  ठरणार नाही ना? अशी चलबिचल मनात असताना उगाच धाडसी निर्णय घेत अंधारात तीर मारणे म्हणजे आत्मघात ठरू शकतो. या आयपीओ बाबत कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी आपणास माहिती असायला हव्यात.

Nuvoco Vistas Corporation IPO:  १० महत्वाचे मुद्दे

१. कोणत्या क्षेत्रात कार्यरत?

 • ‘नुवोको विस्टाज कॉर्पोरेशन’ ही भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे. पूर्व भारतात ती पहिल्या स्थानावर आहे. 
 • सिमेंटची ५० उत्पादने, आरएमएक्स म्हणजे रेडी मिक्स काँक्रीट आणि आधुनिक बांधकाम साहित्य बनविण्याचे काम नुवोको विस्टाज करते. 
 • डिसेंबर २०२० च्या अंदाजपत्रकानुसार कंपनी देशभरातील सिमेंटच्या उत्पादनापैकी नुवोको विस्टाजने ४.२ टक्के सिमेंट उत्पादित केले होते.

२. कंपनीचा थोडक्यात इतिहास:

 • ‘हेमा, रेखा, जया और सुषमा… सबकी पसंद निरमा’ अशा जिंगलची जाहिरात असणारी ‘निरमा पावडर’ आपणास माहितच असेल.
 • १९६९ साली करसनभाई पटेल यांनी रुजवलेला तोच निरमा ग्रुप. आज घडीला वॉशिंग पावडर, साबण, मीठ, सौंदर्यप्रसाधने आणि सिमेंट अशा विविधांगी उत्पादनांत कार्यरत आहे.
 • याच निरमा ग्रुपने २०१४ साली सिमेंट क्षेत्रात पाय रोवले, राजस्थानच्या निंबोल येथे ग्रीनफिल्ड सिमेंट प्लांट सुरु केला.
 • पुढे २०१६ साली ‘LafargeHolcim’ आणि २०२० सालच्या फेब्रुवारी महिन्यात ‘एन यु व्हिस्टा’ या भारतीय सिमेंट कंपन्या निरमा ग्रुपने विकत घेतल्या.
 • सर्व कंपन्या एका छताखाली आणत त्यास ‘नुवोको विस्टाज कॉर्पोरेशन’चे एकसूत्री स्वरूप दिले गेले.

३. कंपनीचे व्यवस्थापक आणि शेअरहोल्डर्स:

 • नियोगी एंटरप्राईज आणि डॉ. करसनभाई पटेल हे ‘नुवोको विस्टाज कॉर्पोरेशन’चे प्रोमोटर्स आहेत. कंपनीमध्ये दोहोंचे मिळून ८९.९९ टक्के शेअर्स आहेत.
 • प्रोमोटर्स ग्रुपचे घटक म्हणून हिरेन पटेल आणि राकेश पटेल यांचे कंपनीत ५.०६ टक्के शेअर्स आहेत.
 • तसेच ‘कोटक स्पेशल सिच्युएशन फंड’चे ‘नुवोको विस्टाज’ मध्ये ४.७६ टक्के शेअर्स आहेत.

४. आयपीओ विषयी महत्वाचे:

 • ‘आयपीओ’ मार्फत कंपनीला ५००० कोटी रुपये एवढी रक्कम उभी करायची आहे.
 • कंपनी ‘फ्रेश इश्यू’द्वारे १५०० कोटी रुपयांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचे आवाहन करणार आहे
 • ‘ऑफर फॉर सेल’ (OFS) मार्फत ३५०० कोटी रुपये उभारण्यासाठी कंपनीचे शेअर्स बाजारात गुंतवणुकीसाठी खुले करणार आहे.
 • नुवोको विस्टाजने ६ ऑगस्ट रोजी ‘अँकर इन्व्हेस्टर्स’द्वारे १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली आहे.
 • आयपीओ उपलब्ध होण्याआधीच ठरलेल्या शेअरच्या मूल्यानुसार किमान १० कोटी रुपये गुंतवण्यास तयार असणारे गुंतवणूकदार म्हणजे ‘अँकर इन्व्हेस्टर्स’.

५. ‘आयपीओ’च्या विनियोगाचे नियोजन:

 • कंपनी १३५० कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार आहे. उर्वरित रक्कम ही इतर विनियोग आणि समभाग वाटपासाठी वापरेल.

६. कंपनीचे वित्तीय व्यवस्थापन:

 • ‘नुवोको विस्टाज’चे वित्तीय वर्ष २०१९-२१ दरम्यान उत्पन्न ३ टक्क्याने आणि नफा २६ टक्क्यांनी वाढला.
 • वित्तीय वर्ष २०१९ आणि २०२१ या दोन्हीतही कंपनीला २६ कोटी रुपयाचा तोटा झाला आहे पण २०२० सालात २४९ कोटीचा नफा झाल्याची नोंद आहे.
 • २०२१ सालातच ‘एन यु व्हिस्टा’ विकत घेतल्याने तशा अर्थाने कंपनीच्या नफ्या तोट्याच्या दृष्टीने २०२० आणि २०२१ या वर्षांची तुलना होऊ शकत नाही.
 • ‘नुवोको विस्टाज’ने २०२१ या वित्तीय वर्षात १.७२६ कोटी टन एवढ्या सिमेंटची विक्री केलीय.

७. कंपनीच्या सकारात्मक बाजू:

 • ‘नुवोको विस्टाज’ पूर्व भारतातील सर्वात मोठी सिमेंट उत्पादक कंपनी आहे. पूर्व भारतातील एकत्रित क्षमतेच्या अंदाजे 17 टक्के क्षमतेएवढे सिमेंटचे उत्पादन नुवोको करते.
 • पूर्व आणि उत्तर भारतात कंपनीच्या उत्पादनांची मजबूत विक्री, विपणन आणि वितरण क्षमता आहे.
 • कंपनी उत्पादन क्षमता वाढवताना परतावा सुधारण्यासाठी कार्यक्षमता आणि समन्वय यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

८. गुंतवणुकीचे संभाव्य धोके:

 • कोव्हीड१९ मुळे झालेल्या टाळेबंदीने बांधकाम व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. भविष्यात या महामारीच्या अनुषंगाने काय घडामोडी होतील याचे अंदाज लागत नाहीत.
 • सिमेंट उद्योग म्हणजे खाणकामाशी थेट संबंध. नुकताच संसदेत ‘खाणी आणि खाणकाम विषयक कायदा, २०२१’ मंजूर झालाय. यामुळे खाणीच्या भाडेकराराची आशयपत्रे संपुष्टात येऊ शकतात.
 • तसेच या कायद्याचा बंद पडलेल्या खाणींच्या भाडेकरारावर देखील परिणामकारक ठरू शकते.
 • सिमेंट उद्योग हा कोळसा, पाणी, मजूरवर्ग आणि इतर कच्च्या मालावर अवलंबून आहे. या सर्वांच्या किमती किंवा त्यांची उपलब्धता कंपनीच्या ताब्यात नाही. त्यामुळे यातील कुठल्याही बाबीच्या चढउताराचा कंपनीच्या नफ्या तोट्याच्या गणितावर सहज परिणाम करू शकतो.

९. आयपीओ प्राथमिक माहिती:

 • आयपीओ किंमत पट्टा – रु. ५६० ते रु. ५७० 
 • लॉटसाईज : २६ शेअर्स  
 • किमान अर्ज रक्कम : रु.१४५६० 
 • आयपीओ  कालावधी : ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२१

१०. तुम्ही काय कराल ?

 • कंपनीची आर्थिक कामगिरी निराशाजनक आहे.
 • नव्या हालचालींवरून सकारात्मक उद्योग वाढीच्या शक्यता सुधारण्याकडे कंपनीने लक्ष केंद्रित केल्याचे जाणवत आहे.
 • ‘लाँग टर्म’च्या दृष्टीने फायदा मिळविण्याची अपेक्षा ठेऊन सारासार विचार करून गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकता.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…