Reading Time: 2 minutes

अशाप्रकारे लोक ठरतात फ्रॉड कॉलचे बळी-

 • सर्वप्रथम हे लक्षात गया की फ्रॉड कॉल करणारे नेहमीच हुशार आणि प्रोफेशनल असतात. ते लोकांना कॉल करून स्वत: बँकेचे कर्मचारी म्हणून ओळख करून देतात नंतर ग्राहकाला फोन करण्यामागे अधिक फायदा करून देणारी योजना किंवा अमुकतमुक लोन ऑफर यांसारखी मजबूत कारणे सांगतात. 
 • त्यामुळे ज्यांना खरंच एखाद्या लोनची, पैशांची गरज असते, अशा ग्राहकांना ते आपल्या जाळ्यात ओढतात. त्यांना सुरक्षित कॉल असल्याचं खोटं सांगत अकाऊंटशी निगडित त्यांची बँकेची खाजगी माहिती मिळवतात. 
 • तसेच एखादी फ्रॉड वेबसाईट पाठवून ती ओपन केली किंवा फोनमध्ये एखादे ऍप इन्स्टॉल केले जाते आणि काही क्षणात त्या फ्रॉड व्यक्तीपर्यंत आपली सर्व माहिती पोहोचते. 
 • जोपर्यंत ग्राहकाला काही समजेल  तोपर्यंत त्याच्या अकाऊंटमधील पैसा गायब झालेला असतो.

 

नाकी वाचा – Online Banking : सुरक्षित ऑनलाईन बँकिंगसाठी ५ महत्त्वाच्या टिप्स

 

अशावेळी कोणती माहिती आपण आजिबात द्यायला नको ?

 • क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर
 • कार्डचा सीवीवी नंबर (जो कार्डच्या मागे ३ किंवा ४ अंकी संख्येचा असतो.)
 • वन टाईम पासवर्ड (ओटीपी नंबर)
 • पासवर्ड
 • कार्डची एक्सपायरी डेट
 • एटीएम पिन
 • इंटरनेट बँकिंगचा लॉग इन आयडी

 

बँकेच्या बनावट फ्रॉडपासून बचावासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा

 

 • जर बँकेकडून कोणत्याही कर्मचाऱ्याचा ग्राहकाला फोन आला आणि आपल्याला एटीएम पिन, ओटीपी किंवा पासवर्डबाबत विचारलं, तर त्याला उत्तर देऊ नये. वन टाईम पासवर्ड किंवा इतर खाजगी माहिती त्यांना मिळाली तर ते इंटरनेट बँकिगद्वारे आपले पैसे काढू शकतात.
 • जर असा फ्रॉड कॉल आला तर लक्षात ठेवा – पासवर्ड, डेबिट कार्ड, पिन, सीवीवी किंवा इतर खाजगी माहिती शेअर करू नका. असा कॉल आल्यास आपल्या बँकेला याबाबत माहिती अवश्य कळवा.
 • फ्रॉड कॉलवर जर आपण चुकून पासवर्ड सांगितला तर लगेच तो बदलून टाकावा.
 • पासवर्ड किंवा पिन सारखी माहिती गुप्त ठेवावी. इतकंच नव्हे तर तुमच्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना पण त्याची माहिती नसते. अशात जर कॉलवर तुमची PIN सारखी माहिती विचारली गेली तर समजा की हा फ्रॉड कॉलच आहे.

 

हेही वाचा – तुमची एकापेक्षा अनेक बँक खाती असावी का ?

 

विकसित, डिजिटल, कॅशलेस कंट्री… आणि त्यातील केअरलेस सिटीजन्स…

 • बँकेच्या नियमांनुसार कोणत्याही बँकेतील कर्मचारी आपल्याला फोनवर आपले खाते तपशील विचारू शकत नाहीत. 
 • जेव्हा एखादे ऍप इन्स्टॉल करता तेव्हा तुम्ही तो पूर्ण मेसेज न वाचताच प्रत्येक ‘Agree’ किंवा ‘Allow’ यावर क्लिक करत जाता. तुमचा फोन तर स्मार्ट असतो पण त्यावेळेस तुम्ही स्मार्ट असता का? 
 • तसेच तुमची google history ही तुम्ही डीलिट जरी केली तरी अशा फ्रॉड लोकांसाठी ही history स्टोअर होत असते.
 • त्यामुळे प्रत्येक असे व्यवहार करताना, तुमची खाजगी माहिती देताना, ऍप इन्स्टॉल करताना किंवा एखाद्या वेबसाईट वर क्लिक करताना संपूर्ण विचार करून आणि डोळे उघडे ठेऊनच पुढची पाऊले उचला.

 

ही सर्व खबरदारी घेतल्याने, ऑनलाईन व्यवहारामुळे होणाऱ्या फसवणुकी तर नक्कीच थांबू शकतात..!

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…