Reading Time: 3 minutes

पालनजी मिस्त्री – लो प्रोफाइल अब्जाधीश

टाटा उद्योग समूह हा आपल्या चांगल्या सामाजिक कामांसाठी आणि जगातील अव्वल दर्जाच्या कंपन्यांसाठी ओळखला जातो. आपल्याला जे.आर.डी टाटा, रतन टाटा, सुमंत मुळगावकर, रुसी मोदी असे टाटा उद्योग समूहाच्या जडणघडणीत वाटा असलेले मोठे लोक माहिती आहेत. पण यामध्ये आणखी एक नाव कौतुकानं घेतलं जातं ते म्हणजे पालनजी मिस्त्री ! (Pallonji Mistry) दिनांक 29 जून 2022 रोजी पालनजी मिस्त्री यांचे वयाच्या 93 व्या वर्षी दुःखद निधन झाले. या लेखातून प्रसिद्धीकडे पाठ फिरवणाऱ्या या उद्द्योगपतीची माहिती आपण घेऊया.

  • पालनजी मिस्त्री शापूरजी पालनजी ग्रुपचे चेअरमन होते. त्यांचा जन्म पारशी कुटुंबात झाला होता. १५ बिलियन डॉलर्सची संपत्ती असणारे पालनजी भारतीय अब्जाधीशांच्या यादीत तर होतेच तसेच ते सर्वात श्रीमंत आयरिश व्यक्ती म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. 
  • १९७६ मध्ये मस्कतच्या राजाचा भव्य राजवाडा बांधणारे पालनजी मिस्त्री यांनी मध्य पूर्वेकडील देशांमध्ये भारतीय बांधकाम क्षेत्रासाठी दरवाजे खुले केले होते. 

 

हे ही वाचा – Forbes list of Billionaires 2021 : हे आहेत फोर्ब्सच्या यादीतील ‘टॉप 10’ अब्जाधीश 

 

पालनजी मिस्त्री यांची व्यवसायिक कारकीर्द – 

  • पालनजी मिस्त्री यांचा जन्म 1929 मध्ये झाला. वयाच्या 18 व्या वर्षापासूनच आपल्या कौटुंबिक व्यवसायात त्यांनी वडिलांना मदत करायला सुरुवात केली. थोड्या कालावधीतच त्यांनी बांधकाम क्षेत्रातले बारकावे शिकून घेतले आणि कौटुंबिक व्यवसायाची प्रगती घडवली. 
  • 1970 च्या दशकात त्यांनी मध्यपूर्वेतील अबुधाबी, दुबई आणि कतारमध्ये आपला व्यवसाय वाढवण्यासाठी विस्तार केला. याच व्यवसाय विस्तारामुळे आज शापूरजी पालनजी ग्रुपचं जाळं आफ्रिका, भारत, मध्य पूर्व आणि दक्षिण आशिया सारख्या देशांमध्ये बांधकाम व्यवसायात कार्यरत आहे. 
  • मुंबईमध्ये सुप्रसिद्ध असणारे ताज हॉटेल, ट्रायडेंड हॉटेल,  मलबार हिल जलाशय, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) इमारत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(BSE) इमारत, ब्रेबॉर्न स्टेडियम इत्यादी लोकप्रिय इमारतींचे बांधकाम पालनजी ग्रुपने केलेले आहे. 
  • शापूरजी पालनजी समूह आपल्या देशात 150 वर्षांपासून काम करत आहे. भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देणारे मिस्त्री कुटुंबीय ऐतिहासिक शापूरजी पालनजी समूह्याद्वारे त्यांचा उद्योग पसारा सांभाळतात. 
  • शापूरजी पालनजी ग्रुपचा व्यवसाय प्रामुख्याने अभियांत्रिकी, बांधकाम, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, जल ऊर्जा आणि आर्थिक सेवांमध्ये आहे. सुमारे 50 देशांमध्ये या ग्रुपचं व्यावसायिक जाळं पसरलेलं आहे. 50 हजार पेक्षा जास्त कर्मचारी या ग्रुपमध्ये काम करतात. 
  • त्यांच्या भारतीय उद्योग जगतातील योगदानामुळे 2016 मध्ये पालनजी मिस्त्री यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. 

टाटा समूहाशी संबंध – 

  • टाटा सन्स कंपनी ही टाटा उद्योग समूहाची होल्डिंग कंपनी आहे. थोडक्यात, टायटन, टीसीएस, टाटा स्टील, टाटा मोटर्स अशा सर्व टाटा समूहाच्या कंपन्यांची मालकी टाटा सन्स कडे आहे. शापूरजी पालनजी ग्रुप हा टाटा ट्रस्ट नंतरचा टाटा सन्सचा 18.4 टक्के इतका हिस्सा असणारा सर्वात मोठा भागधारक होता. 
  • पालनजी आणि रतन टाटा यांचे अत्यंत घनिष्ट संबंध होते. रतन टाटांच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग  होता. रतन टाटा यांनी कंपन्यांच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयांना ते नेहमीच पाठींबा दर्शवत असत. 
  • बाहेर देशातील कंपन्यांची थेट खरेदी असो किंवा कोणत्या कंपन्या विकायच्या असोत, यामध्ये ते थेट भाग घेत. त्यांना 1990 च्या दशकात टाटा समूहाची तत्कालीन कंपनी ACC चे अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते. त्यानंतरच्या काळामध्ये 2004 पर्यंत ते टाटा सन्स बोर्डावर संचालक म्हणून काम पाहत राहिले.

 

हे ही वाचा – Charlie Munger : कोण आहेत गुंतवणूक तपस्वी चार्ली मुंगर ? 

 

लो-प्रोफाइल व्यक्तिमत्व – 

  • पालनजी मिस्त्री व्यावसायिक पार्ट्यांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये जास्त सहभाग घेत नसत. टाटा समूहाच्या कारभारावर अप्रत्यक्ष प्रभाव असण्यासाठी मात्र नेहमीच ते आग्रही असायचे. टाटा समूहावर त्यांचे असणारे वर्चस्व पाहता त्यांना “बॉम्बे हाऊसचे फॅन्टम” असं ओळखलं जायचं. 
  • पालनजी मिस्त्री यांचे टाटांबरोबर कौटुंबिक संबंध सुद्धा होते. रत्न टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा हे पालनजींचे जावई आहेत. पालनजींचा मुलगा सायरस मिस्त्री यांची 2012 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी 2012 ते 2016 पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. टाटा उद्योग समूहाशी बिनसल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी राजीनामा दिला होता. मिस्त्री विरुद्ध टाटा सामना गेली काही वर्षे कोर्टामध्ये सुरु होता आणि आहे. 

प्रसिद्धीच्या झोतातून सदैव दूर असणारे पालनजी मिस्त्री यांनी फार कमी मुलाखती माध्यमांना दिल्या. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ म्हणजे काय हे अक्षरश: जगून दाखवणाऱ्या पालनजी मिस्त्रींकडून ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या’ नवउद्योजकांनी शिकण्यासारखे खूप काही आहे. 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.