Arthasakshar Charlie Munger
https://bit.ly/3ivozkW
Reading Time: 4 minutes

Charlie Munger: चार्ली मुंगर  

चार्ली मुंगर (Charlie Munger) म्हणजे प्रसिद्धीपासून दूर राहणारा गुंतवणूक विश्वातील ध्रुवतारा. ज्याप्रमाणे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उजवा हात आणि राजकीय जोडीदार म्हणून अमित शहा यांचे नाव घेतले जाते, त्याचप्रमाणे प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांचे अमित शहा म्हणजेच चार्ली मुंगर अनेकांना माहिती नसतील. गेल्या ६३ वर्षांपासून वॉरेन बफेट यांचे व्यावसायिक पार्टनर असूनही चार्ली मुंगर हे नाव अनेकांसाठी अपरिचित आहे. अर्थात, यासाठी चार्ली मुंगर यांची प्रसिद्धी पासून लांब रहाण्याची सवय कारणीभूत आहे. 

विसाव्या शतकातील श्रेष्ठ विचारवंत आणि गुंतवणूकदारांमध्ये त्यांचा समावेश होतो. मुंगर आजोबांचे वय 95 पेक्षा जास्त असले तरी जगभरातील मिडिया ते काय बोलणार आहेत यावर सतत लक्ष ठेवून असतो. वॉरेन बफेट फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत गेल्या कित्येक वर्षांपासून पहिल्या 10 मध्ये स्थान राखून आहेत. त्यांच्या यशात चार्ली मुंगर यांचा वाटा फार मोठा आहे हे बफेटसुद्धा मोकळ्या मनाने कबूल करतात.

Arthasakshar Charlie Munger

Charlie Munger: चार्ली मुंगर यांची शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात

  • आपला वकिली व्यवसायापेक्षा जास्त नफा धंद्यामध्ये मिळू शकतो याचा अभ्यासपूर्वक विचार करून मुंगर शेअर्स गुंतवणुकीकडे वळले. 
  • पुढे त्यांची भेट एका समान परिचितांद्वारे बफेट यांच्याबरोबर झाली आणि 20 व्या शतकातील सर्वात यशस्वी गुंतवणूक आख्यायिकेला सुरुवात झाली.  
  • करिअरच्या प्रारंभीच वैयक्तिक आयुष्यात मुंगर यांना अनेक धक्के पचवावे लागले. 
  • वयाच्या ३१ व्या वर्षी घटस्फोट घ्यावा लागला. 
  • असाध्य कर्करोगामुळे आपल्या लहानग्याला गमवण्याचे दुखः त्यांना सहन करावे लागले. तरीही त्यांना यशस्वी होण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकले नाही.
  • आपल्या यशाचे श्रेय ते सततच्या अभ्यासाला देतात. 
  • एका भाषणात त्यांनी सांगितले की त्यांची मुले त्यांना गमतीने ‘दोन पायाचे पुस्तक’ म्हणतात कारण मुंगर आजोबा अक्षरशः दिवसरात्र वाचत असतात. त्यांच्या वाचनाला कुठलाही विषय वर्ज्य नाही. 
  • तुम्हाला वाटेल की गुंतवणूकदार असल्याने ते धंदा, व्यापार, कंपन्यांचे वार्षिक अहवाल  याविषयी अभ्यास करत असतील पण त्यांना फिजिक्स, मेडिकल सायन्स, इतिहास, बायोलोजी असा कुठलाही विषय वाचायला चालतो.
  • विविध ज्ञानशाखांमधले प्रमुख प्रवाह सर्व विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे.

पुअर चार्ली’ज अल्मनाक (शब्दशः अर्थ : गरीब बिचाऱ्या चार्लीचे विचारधन) 

  • पुअर चार्ली’ज अल्मनाक मधून त्यांची विविध भाषणे, लेख यांचा संग्रह 2005 मध्ये मुंगर भक्तांनी प्रसिद्ध केला.
  • त्यामध्ये सुरुवातीला वॉरेन बफेट, बिल गेट्स पासून ते समस्त मुंगर कुटुंबियांच्या आठवणी विस्ताराने दिल्या आहेत.

मुंगर आजोबांचे काही महत्वाचे विचार: (Charlie Munger Quotes)

1. People calculate too much and think too little.

लोक खूप जास्त हिशोब आणि खूप थोडा विचार करतात.

2. Knowing what you don’t know is more useful than being brilliant. 

आपल्याला काय माहिती नाही हे माहीत असणे, हुशार असण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे.

3. All I want to know is where I’m going to die so I’ll never go there.

मला फक्त एक जाणून घ्यायचे आहे की मी कोठे मरणार आहे म्हणजे मी तेथे कधीही जाणार नाही.”

4. Spend each day trying to be a little wiser than you were when you woke up.

सकाळी जागे झाल्यापेक्षा होतो त्यापेक्षा थोडे जास्त हुशार होण्याचा प्रयत्न करीत प्रत्येक दिवस घालवा.

5. There is no better teacher than history in determining the future… There are answers worth billions of dollars in 30$ history book.

भविष्य ठरवण्यासाठी इतिहासासारखा श्रेष्ठ शिक्षक नाही. कोट्यावधी डॉलर्सचे मूल्य असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तीस डॉलर्सच्या इतिहासाच्या पुस्तकात असतात.

6. You don’t have to be brilliant, only a little it wiser than the other guys, on average, for a long time.

तुम्ही खूपच हुशार असण्याची गरज नाही, फक्त दीर्घकालावधीसाठी, सरासरीने इतरांपेक्षा थोडेसे अधिक हुशार असणे आवश्यक आहे.

7. If you keep learning all the time you have a huge advantage.

जर तुम्ही तुमचा सर्व वेळ शिकण्यासाठी दिलात, तर त्याचा तुम्हाला प्रचंड मोठा फायदा होईल.

8. A great business at a fair price is superior to a fair business at a great price.

वाजवी किंमतीचा चांगला व्यवसाय हा उत्तम किंमतीच्या वाजवी व्यवसायापेक्षा श्रेष्ठ असतो.

9. Acknowledging what you don’t know is the dawning of wisdom.

आपल्या अज्ञानाचा स्वीकार म्हणजे ज्ञानाची पहाट आहे.

 

10. We both (Charlie Munger and Warren Buffett) insist on a lot of time being available almost every day to just sit and think. That is very uncommon in American business. We read and think.

दररोज भरपूर वेळ फक्त बसून विचार करायला वेळ देण्यासाठी आम्ही दोघे (चार्ली मुंगर आणि वॉरेन बफेट) आग्रही असतो. अमेरिकन व्यवसाय जगात हे असामान्य आहे. आम्ही वाचतो आणि विचार करतो.

11. To get what you want, you have to deserve what you want. The world is not yet a crazy enough place to reward a whole bunch of undeserving people.

आपल्याला जे काही हवे असेल त्यासाठी लायक बना. संपूर्ण नालायक लोकांना हवे ते मिळू देण्याइतकेही जग काही खुळे नाही.

12. I try to get rid of people who always confidently answer questions about which they don’t have any real knowledge.

संपूर्ण ज्ञान नसतानाही नेहमी आत्मविश्वासाने उत्तरे देणाऱ्या लोकांपासून मी नेहमी लांब रहायचा प्रयत्न करतो.

13. Those who keep learning, will keep rising in life.

जे सतत शिकतात, ते आयुष्यात प्रगती करतात.

14. Take a simple idea, and take it seriously.

एका साध्या कल्पनेवरही पूर्ण गांभीर्याने काम करा.

15. Just because you like it does not mean that the world will necessarily give it to you.

एखादी गोष्ट फक्त आपल्याला आवडते म्हणून काही गरजेचे नाही की जग तुम्हाला सहजासहजी ती गोष्ट प्राप्त करू देईल.

पुढे पन्नाशीनंतर एका डोळ्याने दिसायला कमी झाले असता मुंगर यांना एक डोळा काढून टाकावा लागला. कदाचित दोनीही डोळे गेले तर आपले परमप्रिय वाचन कसे करायचे म्हणून त्यांनी ब्रेल लिपीपण शिकून घेतली होती. असे आहेत सदैव ज्ञानोपासना करणारे श्रीमान चार्ली मुंगर !  

– सी.ए. अभिजीत कोळपकर 

[email protected]

(अभिजीत कोळपकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून ते अर्थसाक्षरता अभियानात काम करतात. )

For suggestions and queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Charlie Munger Marathi Mahiti, Charlie Munger Marathi

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…