Forbes list of Billionaires 2021 : हे आहेत फोर्ब्सच्या यादीतील ‘टॉप 10’ अब्जाधीश 

Reading Time: 2 minutes

Forbes list of Billionaires 2021 

जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी प्रकाशित करणाऱ्या फोर्ब्स मासिकाने दोन दिवसांपूर्वी 35 वी यादी प्रसिद्ध केली (Forbes list of Billionaires 2021). सन 2020 साली आलेल्या कोरोना नावाच्या अभूतपूर्व संकटाने जागतिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम केला असला तरी अब्जाधीशांच्या संपत्तीत मात्र भर पडली आहे. यावर्षी जगातील अब्जाधीशांच्या  संपत्तीत 5 ट्रिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे.

कोरोना महामारीच्या  काळातही सुरवातीचे काही महिने सोडल्यास शेअर बाजाराने उच्चांक गाठला. क्रिप्टोकरन्सी आणि स्टॉकच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या  यादीत  वाढ झाली असून त्यामध्ये 493 नवीन व्यक्ती दाखल झाले आहेत. तसेच, यावर्षी त्यांच्या संपत्तीत झालेली एकूण वाढ आहे  13.1 ट्रिलियन डॉलर्स! 

फोर्ब्सच्या 35 व्या यादीत ‘टॉप टेन’ मध्ये भारतातील एकवेम व्यक्तीने स्थान मिळवलं आहे. ती व्यक्ती कोण हे चाणाक्ष वाचकांनी त्वरित ओळखले असेल….बरोबर…. ती व्यक्ती आहे मुकेश अंबानी!

या आहेत जगातील ‘टॉप 10’ अब्जाधीश व्यक्ती 

1.जेफ बेजोस

 • सलग चौथ्या वर्षी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस. 
 • फोर्ब्सच्या यादीनुसार, गेल्या वर्षी जेफ बेजोस यांची संपत्ती होती 64 अब्ज डॉलर्स, यावर्षी ती वाढून 177 अब्ज डॉलर्स झाली आहे.  
 • अ‍ॅमेझॉनच्या शेअरमध्ये वाढ झाल्याने सहाजिकच बेजोस यांच्या मालमतेत जवळपास तिप्पट वाढ झाली आहे. 

2. इलोन मस्क

 • सध्या गुगल सर्चमध्ये टॉपवर असलेले एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहेत. 
 • टेस्लाच्या शेअर्समध्ये 705% इतकी प्रचंड वाढ झाल्यामुळे इलोन मस्क यांच्या मालमत्तेतही वाढ झाली असून, त्यांची एकूण मालमत्ता आहे 151 अब्ज डॉलर्स!

3.बर्नार्ड अर्नाल्ट

 •  जगातील सर्वात मोठी लक्झरी वस्तू बनविणाऱ्या फ्रान्समधील लुई व्ह्यूटन एसई – एलव्हीएमएच (LVMH) या कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ बर्नार्ड अर्नाल्ट 150 अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 
 • एलव्हीएमएच कंपनीच्या शेअर्समध्ये 86% वाढ झाल्याने त्यांच्या मालमतेत जवळपास दुप्पट वाढ झाली असून  76 अब्ज डॉलर्सवरून 150 अब्ज डॉलर्सवर पोचली आहे

4. बिल गेट्स

 • मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स या यादीत चौथ्या क्रमांकावर असून, बिल गेट्स यांची एकूण मालमत्ता 124 अब्ज डॉलर्स आहे. 
 • बिल गेट्स यांच्याकडे मायक्रोसॉफ्ट, कॅनेडियन नॅशनल रेल्वे आणि ट्रॅक्टर निर्माता डीरे कंपनीचे शेअर्स आहेत.

5. मार्क झुकरबर्ग

 • सोशल मीडिया साईट फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना यावर्षी पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले असले तरी त्यांच्या संपत्तीत 80% एवढी प्रचंड वाढ झाली आहे.
 • मागच्या वर्षी मार्क झुकरबर्ग यांची मालमत्ता होती  42.3 अब्ज डॉलर्स,  तर  यावर्षी वाढून ती 97 अब्ज डॉलर्सवर पोचली आहे.

6.वॉरन बफे

 • तमाम गुंतवणूकदारांचे लाडके  आणि आदर्श  असणारे  वॉरन बफे अर्थात ‘ओरेकल ऑफ ओमाहा’ यांना या यादीत सहाव्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. 
 • वॉरन बफे बर्कशायर हॅथवे या कंपनीचे चेअरमन आणि सीईओ असून, त्यांची एकूण मालमत्ता 96 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

7. लॅरी एलिसन

 • सुप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी ओरेकलचे अध्यक्ष लॅरी एलिसन या यादीतील सातव्या क्रमांकावर आहेत. 
 • लॅरी एलिसन यांची  एकूण मालमत्ता आहे  93 अब्ज डॉलर्स आहे.

8. लॅरी पेज (लॉरेन्स एडवर्ड पेज)

 • या यादीत आपल्या सर्वांच्या लाडक्या गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज आठव्या क्रमांकावर आहेत 
 • लॅरी पेज (लॉरेन्स एडवर्ड पेज) यांची एकूण मालमत्ता आहे 91.5 अब्ज डॉलर्स!

9. सर्गी ब्रिन

 • नवव्या क्रमांकावर पुन्हा गूगल कंपनीचे दुसरे सह-संस्थापक सर्गी ब्रिन यांनी  स्थान  मिळवलं आहे. 
 • त्यांची एकूण मालमत्ता आहे 89 अब्ज डॉलर्स!

10. मुकेश अंबानी

 • भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांनी या यादीत दहावे स्थान मिळविले आहे.
 • या दहाव्या क्रमांकासह मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. 
 • मुकेश अंबानी यांची एकूण मालमत्ता अंदाजे संपत्ती 84.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Forbes list of billionaires 2021  Marathi, Forbes list of billionaires 2021 in Marathi, Forbes list of billionaires 2021 Marathi Mahiti

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!