Passive income
Reading Time: 3 minutes

Passive income

पर्यायी उत्पन्नाचा (Passive income) सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमची नोकरी / व्यवसाय सांभाळून तुम्ही उत्पन्न मिळवू शकता. अनेकांनी पर्यायी उत्पन्नातून एवढा नफा मिळवला आहे की आपला नोकरी / व्यवसाय सोडून त्यांनी पर्यायी उत्पन्नलाच मुख्य उत्पन्न स्रोत बनविले. कुटुंब सांभाळून घरून काम करण्याची संधी सध्या सर्वांनाच अपेक्षित आहे. त्यात निवृत्त आणि वयाची साठी पार केलेले व्यक्ती, गृहिणी, विद्यार्थी यांचाही समावेश आहेच. घरबसल्या मिळकतीचे काही मार्ग विकसित तंत्र ज्ञानामुळे सहज शक्य झाले आहेत. ते आज आपण पाहणार आहोत. 

हे नक्की वाचा: नोकरी गेल्यानंतरही पैशाचे नियोजन कसे कराल?

Passive income: पर्यायी उत्पन्न मिळविण्याचे ७ मार्ग

१. ऑनलाईन सेलींग  

  • सद्य परिस्थितीमध्ये हा व्यवसाय खूप यश मिळवून देणारा ठरत असून सर्वच वयोगटातील व्यक्ती हा व्यवसाय करून उत्पन्न मिळवू शकतात. 
  • प्रामुख्याने स्त्री वर्ग हा व्यवसाय करीत असून त्यांना बऱ्यापैकी नफा यामध्ये होतो आहे. 
  • घरून काम करून इतर लोकांना हा व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करणे हे या उद्योगाचे स्वरूप आहे.
  • अगदी साडी पासून ते स्वयंपाक घराच्या वस्तूंपर्यंत कुठल्याही वस्तू तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कुठेही बाहेर न जाता विकू शकता. 
  • Meesho सारख्या वेबसाईटवर रिसेलिंग करून किंवा अमेझॉन.कॉम सारख्या वेबसाईटवर विक्री करून अनेकांनी आपली गरिबी दूर केली आहे.
  • लॉकडाऊनमध्ये तर अनेकांनी फेसबूकवर आपल्या मालाची जाहिरात व विक्री करून अर्थार्जनाचे नवीन साधन शोधले.

२. लेखन

  • लेखनाची आवड असणाऱ्या आणि स्वतंत्र विचार शैली असणाऱ्या सर्वांसाठी ब्लॉग लेखनातून अर्थार्जन  करण्याची उत्तम संधी तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिली आहे. 
  • यामध्ये आपण कुठल्याही विषयावर लेखन करून आपले मत मांडू शकता. साल २०२० हे ब्लॉग लेखकांसाठी सर्वाधिक कमाई करणारे क्षेत्र ठरले आहे. 

विशेष लेख: आयुष्यात येणाऱ्या या ४ कठीण प्रसंगांसाठी तुम्ही तयार आहात का?

३. अफिलिएट मार्केटिंग 

  • हा नवीन व्यवसाय सध्या चर्चेत आहे. यामध्ये दरदिवशी काही ना काही उत्पन्न मिळण्याची हमी आहे. 
  • तुमच्या संपर्कात असणाऱ्या सर्व व्यक्तींना उत्तमोत्तम ब्रँडेड गोष्टी सुचवणे आणि त्यांनी खरेदी केलेल्या वस्तूंवर तुम्ही काही टक्के नफा मिळवणे हे या कामाचे स्वरूप आहे. 
  • आजकाल मोठमोठ्या कंपनी आपला नफा वाढविण्याकरिता अफिलिएट मार्केटरच्या शोधात असतात. अमेझॉन कंपनी याचे उत्तम उदाहरण आहे. 
  • अगदी अमॅझॉनला जरी आपण अफिलिएट झालो, तर आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते. यामध्ये जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधून त्यांना आपण सुचवलेल्या वस्तू घेण्यास प्रोत्साहित करण्याचे कौशल्य आपल्यात असायला हवे. 

४. युट्युब 

  • आधुनिक आणि विकसित काळाने उपलब्ध करून दिलेले आणखी एक नवीन व्यासपीठ म्हणजे युट्युब. 
  • अगदी पोळी लाटणे शिकवण्यापासून ते शिवणकामापर्यंत, बाराखडी पासून ते वैद्यकीय अभ्यासापर्यंतचे सर्व विडिओ आपण युट्युबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवू शकतो.अर्थात,त्याचा मोबदला ही नक्कीच मिळतो. 
  • युट्युब चॅनेल तयार करून आपल्याला नवीन माहिती लोकांना देता येते. सध्या तरुण मंडळी यातूनच अर्थार्जन करीत असल्याचे चित्र आहे. 

५. टिफिन / फूड सर्व्हिस  

  • लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त नुकसान झाले ते हॉटेल व टुरिझम उद्योगाचे. मात्र सुरवातीचे एक / दोन महिने सोडले तर घरगुती पदार्थांची विक्री करणारे अथवा टिफिन म्हणजेच जेवणाचा डबा देणारे मात्र प्रचंड व्यग्र होते. 
  • वर्क फ्रॉम होममुळे घर आणि ऑफिस सांभाळताना तारेवरची कसरत करणाऱ्या नोकरदार स्त्रिया असोत व दिवसभर घरातल्या कामात व्यग्र असणारी गृहिणी असो, त्यांनी अडीअडचणीच्या काळात घरगुती जेवणाच्या डब्याला पसंती दिली.
  • याशिवाय अनलॉक सुरु झाल्यांनतर वाढदिवस, सणवार यासारख्या छोट्या व घरगुती कार्यक्रमांसाठी घरगुती जेवणाच्या डब्यालाच सर्वांचीच पसंती मिळाली.
  • कोरोना पेशन्टला टिफिन देणे असो अथवा सण समारंभाचे साग्रसंगीत जेवण असो या व्यवसायला प्रचंड मागणी आहे.

६. ऑनलाईन शिकवणी 

  • असे अनेक कोर्सेस आहेत जे घरून इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने शिकवले जातात. त्यात शालेय विषयांपासून ते गायन, वादन, नृत्य असे अनेक प्रकार आहेत. 
  • ऑनलाईन शिकवणीचा व्यवसाय उत्तम असून आपल्या वेळेनुसार त्याचे नियोजन करता येणे अगदी सहज शक्य आहे आणि महत्वाचे म्हणजे, यामध्ये बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. 

महत्वाचा लेख:पैशाचे व्यवस्थापन: खर्च आणि गुंतवणुकीचा ताळमेळ

. उपयुक्त अभ्यासक्रम तयार करून अर्थार्जन 

  • आपल्या जवळ असलेल्या ज्ञानाचा योग्य आणि पुरेपूर वापर करून आपण अर्थार्जन करू शकता. तेही कुठे हजेरी न लावता. ते कसे?
  • उडेमी हे अत्यंत महत्वपूर्ण व्यासपीठ आपल्याला तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिले आहे. या संकेतस्थळावर म्हत्वाचे सर्व विषयांचे अभ्यासक्रम किंवा इतर काही कोर्सेस उपलब्धआहेत. 
  • युडेमीच्या माध्यमातून अगदी घरबसल्या, कुठलेही शारीरिक श्रम न घेता आपण अर्थार्जन करून शकता. अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांना फायदेशीर असे हे व्यासपीठ आहे.  

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Passive income in Marathi, Passive income Marathi Mahiti, Passive income mhnaje kay?, Passive income ideas in Marathi, Passive income ideas Marathi Mahiti, Passive income Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.