Personal Loan पर्सनल लोन
https://bit.ly/2BExVab
Reading Time: 3 minutes

Personal Loan FAQ

वैयक्तिक कर्जासंदर्भात अनेक प्रश्न (Personal Loan FAQ) सर्वसामान्यांच्या मनात असतात. वैयक्तिक कर्ज अनेक कारणांसाठी घेतले जाते. लग्न, परदेशी सहल, घराचे नूतनीकरण किंवा क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठीही घेतले जाते. 

संबंधित लेख: सिबिल (CIBIL) – आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया

Personal Loan FAQ : वैयक्तिक कर्जाविषयी सर्व काही

१. वैयक्तिक कर्ज मिळण्याची पात्रता काय आहे? 

वैयक्तिक कर्ज हे सगळ्यात सहज मिळणारं लोन समजलं जातं. परंतु हे लोन मिळायलासुद्धा काही पात्रता, विश्वसनियता लागते. वैयक्तिक कर्ज देताना प्रथम प्राथमिकता नोकरदारास दिली जाते.  व्यावसायिक व्यक्तीला वैयक्तिक कर्ज मिळवताना अडचण येऊ शकते.

  • नोकरदार व्यक्तीसाठी वैयक्तिक कर्जाची पात्रता-
    • ज्या व्यक्तीचा पगार नियमित आहे,
    • किमान मासिक पगार मर्यादा ही प्रत्येक बँकेनुसार ठरवली जाते. सामान्यतः ही मर्यादा किमान साडेसात हजार रुपये इतकी असते,
    • नोकरीला किमान एक वर्ष झालं असावं, कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचं वय किमान २१ वर्षे आणि जास्तीत जास्त ५९ वर्षे असलेल्यांना वैयक्तिक कर्ज मिळू शकतं.
  • व्यावसायिकांसाठी वैयक्तिक कर्जाची पात्रता-
    • नियमित उत्पन्न यात महत्वाचा मुद्दा असतो.
    • व्यवसायाला किमान ३ वर्षे झालेली असावीत,
    • व्यक्तीचं वय किमान २४ जास्तीत जास्त ६३ असावं.

हे नक्की वाचा: चांगल्या क्रेडिट स्कोअरचे ४ फायदे

२. वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • वैयक्तिक कर्ज घेताना कोणतीही सुरक्षितता बँकेकडे किंवा नॉन बँकिंग फायनांशिअल कंपनीकडे (NBFC) ठेवावी लागत नाहीत. काही जुजबी मूलभूत कागदपत्रे बँकेकडे किंवा NBFC कडे द्यावी लागतात.
  • पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर कार्ड, तीन वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स दाखवावे लागतात.

३. वैयक्तिक कर्जाचे व्याजदर किती असतात?

  • वैयक्तिक कर्ज मिळणे जितकं सोपं वाटतं  तेवढीच त्याची एक दुसरी बाजूसुद्धा आहे. वैयक्तिक कर्ज हे ‘कोलॅटरल फ्री’ लोन असल्याने वाहन, गृह कर्जाप्रमाणे बँकेकडे काहीही गहाण न ठेवता कर्ज मिळतं.
  • वैयक्तिक कर्ज बुडवलं तर बँक कोणत्याही वस्तूचा लिलाव करून किंवा त्यावर कब्जा करून आपली रक्कम मिळवू शकत नाही म्हणून यामुळे वैयक्तिक कर्जावरील व्याजदर इतर कर्जापेक्षा अधिक असतात.
  • जवळपास १५% ते ३६% पर्यंत व्याजदर असू शकतो. व्याजदर हा कर्जाच्या जोखीम क्षमतेवर (Risk Factor) अवलंबून असतो. वैयक्तिक कर्ज परत करण्याचा अवधी १२ ते ६० महिने असतात. आपल्या सोयीनुसार हा अवधी  निश्चित करता येतो. 

४. कर्ज मंजूर झाल्यावर कर्जाची रक्कम किती दिवसांत प्राप्त होते?

  • कर्जाची रक्कम जमा करण्याचा कालावधी हा प्रत्येक बँकेच्या पॉलिसीनुसार वेगवेगळा असू शकतो. साधारणतः सात दिवसांत (Seven Working Days) ही रक्कम प्राप्त होते.
  • रक्कम धनादेश रुपात किंवा डिमांड ड्राफ्ट रुपात मिळू शकते. आजकाल ही रक्कम सरळ बँकेत बचत खात्यात जमा होते.

५. कर्जाची रक्कम:-

  • जास्तीतजास्त किती कर्ज मिळू शकतं? ही बाब अनेक गोष्टींवर आधारित असते. शिवाय प्रत्येक बँकेनुसार बदलत राहते.
  • व्यक्ती नोकरदार आहे की धंदेवाईक हे बँकेकडून बघितलं जातं. व्यक्तीचे मासिक हप्ते त्याच्या मासिक उत्पन्नाच्या अर्ध्या रक्कमेचे होऊ नये हे बँकेकडून किंवा NBFC कडून प्रथम बघितलं जातं, त्यानुसार कर्ज मंजुर केलं जातं.
  • अर्जदार व्यक्तीने पूर्वी कोणतं कर्ज घेतलेलं आहे का? वैयक्तिक कर्जाच्या अर्जावेळी आणखी कुठलं कर्ज व्यक्तीच्या माथ्यावर आहे का? त्याचे किती हप्ते आहेत? किती बाकी आहेत? आधीच घेतलेल्या कर्जाचे हप्ते किती रकमेचे आहेत? ते हप्ते भरताना मासिक उत्पन्न किती हाती पडतं? या सगळ्यांचा विचार केला जातो.
  • वैयक्तिक कर्ज घेणारी व्यक्ती व्यावसायिक व्यक्ती असेल तर त्याने दाखवलेल्या नवीनतम म्हणजे नुकत्याच नफा तोटा निवेदनात किती नफा झाला आहे या बाबीचा विचार केला जातो. 

विशेष लेख:  गृहकर्ज घ्यायचं आहे? मग या गोष्टी तपासून पहा

५. कमीत कमी किती रकमेचे वैयक्तिक कर्ज मिळतं?

  • ही बाब प्रत्येक बँकेनुसार बदलू शकते. तरीही कमीतकमी ३०,००० ही रक्कम जवळपास सर्व बँकांनी ठरवली आहे. तीस हजार पेक्षा कमी रकमेचं वैयक्तिक कर्ज मिळू शकत नाही.

६. कोणत्या बँकेकडून वैयक्तिक कर्ज घ्यावं?

  • वैयक्तिक कर्ज घेताना अनेक बँकांच्या ऑफर्सची तुलना करून बघणे श्रेयस्कर असतं. कोणती बँक किती कालावधीसाठी, किती व्याजदराने कर्ज देतेय, बँकेची ‘प्रोसेसिंग फी’(प्रक्रिया दर) किती आहे?  या बाबींचा विचार करून बँक निवडावी.
  • बँक व्यक्तीचं क्रेडिट स्कोअर तपासते. साधारणतः ९००च्या जवळपास असणारा स्कोअर हा चांगला क्रेडिट स्कोअर मानला जातो.  
  • क्रेडिट स्कोअर वरून बँकेला समजतं की व्यक्तीने घेतलेले पूर्वीची  सर्व कर्जे, क्रेडिट कार्ड्सचे हप्ते योग्यरित्या वेळेत भरले आहेत. क्रेडिट स्कोअर काहीसा कमी असल्यास वैयक्तिक कर्जाची रक्कमही त्या तुलनेत कमी करून मंजूर केली जाऊ शकते.

७. कमी रकमेच्या मासिक हप्त्यांमध्ये कर्ज घ्यावं का?

  • मासिक हप्त्यांची रक्कम कमी असल्यास मोठ्या कालावधीसाठी कर्जाचे हप्ते भरावे लागतात. त्यामुळे व्यक्तीला जास्त व्याज भरावं लागतं. यासाठी काही ऑनलाईन ‘टूल’ उपलब्ध आहेत. यावरून व्यक्तीला किती मासिक हप्त्यांत, किती व्याजदराने कर्ज फेडता येईल याचा आराखडा मिळेल. त्याचा अभ्यास करून, आपण किती व्याजदराने किती काळ कर्ज फेडू शकू हे तपासून कर्ज घ्यावे.

८. जोडीदारासोबत वैयक्तीक कर्ज घेता येतं का?

  • वैयक्तिक कर्ज हे पती पत्नी मिळून किंवा आई वडिलांपैकी एकासोबत मिळून घेता येतं. याचा फायदा असा की उत्पन्न क्षमता जास्त दिसून वैयक्तिक कर्ज जास्त रकमेचं मिळण्याची शक्यता वाढते. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं की जोडीदाराचा क्रेडिट स्कोअर ठीक नसेल तर कर्ज मंजुरीची शक्यता कमी होते.

९. वैयक्तिक कर्ज घेतल्यावर कर भरण्यात काही सवलत मिळते का?

  • वैयक्तिक कर्ज घेतल्यावर सामान्यत: कर संबंधित फायदे मिळत नाहीत. पण वैयक्तिक कर्ज हे घर घेताना डाऊन पेमेंट भरण्यासाठी किंवा गृह नुतनीकरणासाठी घेतले असल्यास आयकर कायदा, कलम २४ नुसार करसवलतीस (Tax deduction) पात्र ठराल. हा फायदा फक्त व्याजदरासंबंधित असेल कर्जाच्या रकमेवर नसेल.

१०. वैयक्तिक कर्ज की क्रेडिट कार्ड लोन, योग्य पर्याय कोणता?

  • क्रेडिट कार्डवर कर्ज मिळण्यासाठी व्यक्तीला  ज्या बँकेचं क्रेडिट कार्ड आहे त्या बँकेकडेच कर्जाचा अर्ज करता येईल.  वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी कोणत्याही बँकेकडे अर्ज करता येतो.
  • क्रेडिट कार्डवर कर्ज घेताना वैयक्तिक कर्जासाठी लागणारे कागदपत्रे आवश्यक नसतात.

खरतर वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) घ्यायची वेळ येऊच नये. कर्ज कुठलंही असो निव्वळ आपल्या गरजेसाठी आणि गरजेपुरतंच घ्यावं कारण गरज नसताना चैनीसाठी घेतलेलं कर्ज अनेक आर्थिक संकटाना आमंत्रण देणारं ठरतं.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Personal Loan Marathi, Personal Loan in Marathi, Personal Loan Marathi Mahiti, पर्सनल लोन मराठी माहिती, पर्सनल लोन मराठी 

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…