Success Story Of Lens cart : ‘वाचा’ लेन्सकार्टची यशोगाथा !

Reading Time: 3 minutes

लेन्सकार्ट कंपनीचे (Lens cart Company) मूल्यांकन ५ बिलियन डॉलर्स इतके म्हणजे सुमारे ३८ हजार कोटी रुपये आहे. नवनवीन प्रकारच्या जाहिराती करून लेन्सकार्ट कंपनी नेहेमीच लक्ष आकर्षित करून घेत असते. आपण या लेखात कंपनीच्या यशाच्या प्रवासाची माहिती घेऊ. 

स्वत:च्या हिंमतीवर एखादा व्यवसाय स्थापन करून भारतीय मार्केटचं रूप पालटून टाकणं हे कौतुकास्पद आहे. त्याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे पियुष बन्सल यांची लेन्सकार्ट कंपनी. २०१० मध्ये त्यांनी अमित चौधरी आणि सुमित कपही यांच्यासोबत व्यवसाय स्थापन केला. तेव्हापासून लेन्सकार्ट कंपनीने आयवेअर इंडस्ट्रीचे महत्व सिद्ध केले. आयवेअर म्हणजे चष्मे, गॉगल्स,लेन्सेस इ.  सुरवातीला त्यांनी इंटरनेटच्या मार्फत आयवेअर विकण्यास सुरवात केली. भारतीयांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी भारतात विवध ठिकाणी स्टोअर्स सुरु केले. हा बिझनेसचा प्रकार ओम्नी-चॅनल रिटेल मॉडेल आहे म्हणजे ऑनलाइन तसेच ऑफलाइन मोडमध्ये व्यवसाय करणे. 

आपल्या देशात लेन्सकार्टचे ३० पेक्षा जास्त शहरांत ५५० हून अधिक स्टोअर्स आहेत. पुढील दहा वर्षांत भारतीय आयवेयर इंडस्ट्रीत मारुती सुझुकी कंपनीसारखा बिजनेस करण्याचे ध्येय घेऊन, लेन्सकार्ट कंपनी मार्केटमध्ये नवीन आणि नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा आणणार आहे. 

आयवेअर कंपनी स्थापन करण्याची कल्पना – 

 • पियुष बन्सल हे IIM मध्ये व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत होते. 2007 मध्ये त्यांनी SearchMyCampus सोबत Valyo Technologies हे पहिले व्यवसाय पोर्टल लाँच केले. या साइटचा उद्देश होता की विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करणे. त्यात पुस्तके, इंटर्नशिप, कारपूल सुविधा, अर्धवेळ नोकरी बद्दलच्या समस्या जास्त प्रमाणात होत्या. 
 • त्यांनी हा व्यवसाय करत असतांना हे शोधून काढले की,  चष्मा उद्योग हा दुर्लक्षित उद्योगांपैकी एक आहे. ज्याचा अद्याप Amazon आणि EBay सारख्या ई-कॉमर्स दिग्गजांनी वापर केला नव्हता. हे लक्षात घेऊन त्यांनी अमेरिकेत Flyrr.com हे वेबपोर्टल लाँच केले आणि तेथे सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी असाच प्लॅटफॉर्म भारतात सुरू करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे समस्या सोडवताना त्यांनी कल्पनाशक्ती वापरली आणि नवीन व्यवसाय सुरु केला. 

हेही वाचा – Key investment lessons: महाभारतातून शिका आपल्या आर्थिक गुंतवणुकीची पंचसूत्रे !…

आयवेअर कंपनी मार्केटमध्ये यशस्वी का झाली? 

 • कंपनीची सर्व टीम दर्जा, गुणवत्ता, व्हरायटी आणि नाविन्यता या बाबतीत खूप बारीक सारीक पद्धतीने विचार करते.
 • स्टाईल सोबत टेक्निकचा विचार करायला केला जातो. त्याचसाठी थ्री-डी टेस्टिंग सुविधा त्यांनी विकसित केली आहे. लेन्सकार्ट टीमचे लक्ष केवळ उत्पादनाच्या ट्रेंडसवर नसून तर त्याच्या टिकाऊ आणि गुणवत्तेवर देखील कायम असते. 
 • लेन्सकार्टची टीम विशेषत: जर्मनीमधून आयात केलेल्या रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करते, त्यामुळे Lenskart हा भारतातील एकमेव असा ब्रँड ठरला आहे जो अत्यन्त अचूकतेने ऊत्पादन निर्मिती करतो.
 • लेन्सकार्टकडे रु. 345 पासून सुरू होऊन रु. 30,000 पर्यंत आयवेयर उपलब्ध आहेत. तसेच वेगवेगळ्या ऑफर आहेत. त्यामुळे विविध विभागांतील ग्राहकांपर्यंत बिजनेस घेऊन जाऊ शकतो.
 • घरबसल्या डोळ्यांची तपासणी यांसारख्या काही सेवा ग्राहकांना मिळतात. हे खरोखरच कौतुकास्पद आहेत. 

लेन्सकार्टने  स्पर्धेला कसे तोंड दिले 

 • लेन्सकार्टला ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही ठिकाणी स्पर्धेचा सामना करायला लागला. Coolwinks, Lensbazaar, Vision Express आणि Titan Eyeplus हे त्यांचे काही प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. लेन्सकार्टला ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम इत्यादीसारख्या ई-कॉमर्स दिग्गजांकडून स्पर्धेला सामोरे जावे लागते. 
 • विशेष म्हणजे त्या वेबसाईटवर आयवेअर देखील उपलब्ध होते. ग्राहकांचा प्रतिसाद सुद्धा होता. आयवेअर इंडस्ट्री अत्यंत असंघटित आहे. हे पियुष आणि टीमला लक्षात आले. त्यांनी आयवेयर मार्केटकडे लक्ष दिले. 
 • भारताची आयवेअर इंडस्ट्री रु. 18 ते 20 हजार कोटींची असल्याचा अंदाज आहे. यापैकी फक्त 9-10% हिस्सा संघटीत क्षेत्राकडे आहे. 
 • लेन्सकार्टचा संघटित मार्केटमधील हिस्सा जवळपास 70% आहे. ग्राहकांना सहज पद्धतीने ऑफर्स उपलब्ध करून कंपनी सतत नफा वाढवते आहे. 

.भावी वाटचाल 

 • ‘व्हिजन टू इंडिया’ या आपल्या व्हिजनसह, लेन्सकार्ट कमी किमतीचे फ्रँचायझी मॉडेल घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आहे. 
 • सतत नाविन्याचा ध्यास घेतल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे लेन्सकार्ट आहे. कंपनीने रोजच्या वापरातल्या काँटॅक्ट लेन्सेस लाँच केल्या आहेत. 
 • Aqualens च्या मदतीने Lenskart चे उद्दिष्ट म्हणजे खिशाला परवडणारे आणि कमी क्लिष्ट आयवेयर प्रदान करणे आहे. याद्वारे रु.40 प्रतिदिनप्रमाणे ट्रेंडी आणि कमी खर्चिक लेन्सेस वापरता येतात. 
 • पुढील दोन वर्षांत 500 हून अधिक स्टोअर्स उघडण्याची योजना Lenskart कंपनीचे मुख्य ध्येय आहे. 5 वर्षांच्या अखेरीस एकूण 2,000 स्टोअर्सपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे. 

कंपनी लवकरच शेअर मार्केटमध्ये आयपीओ आणणार आहे असे या क्षेत्रातले जाणकार सांगतात.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Leave a Reply

Your email address will not be published.