Arthasakshar Why my EPF Claim get rejected?
https://bit.ly/3ghXsZR
Reading Time: 3 minutes

ईपीएफ क्लेम रिजेक्ट होण्याची कारणे

ईपीएफ क्लेम रिजेक्ट झाल्यावर अनेकजण निराश झाले. सध्याच्या महामारीच्या काळात अनेकांसाठी ईपीएफ म्हणजे बुडत्याला काडीचा आधार वाटत असणार.  पण हा आधारच निखळला तर?

जेव्हा जेव्हा देशावर कोणतीही आपत्ती येते त्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपले सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. अर्थात याही वेळेस यात अपवाद नाही. 

कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भाव आणि त्यामुळे आपल्याच देशाला नाही, तर संपूर्ण जगाला वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. यातीलच एक मोठी समस्या म्हणजे आर्थिक समस्या. 

कोरोना संकट – दहा कलमी आर्थिक नियोजन

  • कोरोना विषाणूचा कहर आपल्या देशात सुरू झाला आणि सरकारने त्याचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले. 
  • जीवनावश्यक वस्तू निर्मिती, विक्री आणि शेती सोडल्यास इतर सर्व कामकाज अक्षरशः ठप्प झाले. मात्र यामुळे समाजाचा प्रत्येक स्तर थोड्याफार प्रमाणात अडचणीत आला. 
  • सरकारने पॅकेज जाहीर केले त्यामुळे गरीब लोकांना काही प्रमाणात मदत मिळू लागली. परंतु सर्वसामान्य मध्यमवर्गीय नोकरदार वर्ग मात्र अडचणीत आलेला आहे. 
  • कोविड-१९ मूळे येणार्‍या अडचणीला सामोरे जाण्यासाठीच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (EPFO) मार्च २०२० मध्ये भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफ काढता येण्याची तरतूद केली. 
  • या अंतर्गत कर्मचार्‍यांना त्यांच्या ईपीएफ खात्यामधील रकमेच्या ७५% पर्यन्त अथवा तीन महिन्याचा बेसिक आणि महागाई भत्ता मिळून होणारी रक्कम यापैकी जी कमी असेल ती रक्कम मिळेल. 
  • लाखो सदस्यांना पैशाची गरज असल्यामुळे ही बातमी समजल्यावर त्यांनी पीएफ काढण्यासाठी अर्ज करायला सुरुवात केली. 
  • काही जणांचे अर्ज मान्य झाले आणि लवकरच रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली. मात्र बर्‍याच जणांचे अर्ज हे ईपीएफ संस्थेकडून नाकारण्यात आले. मग मात्र लोक वैतागायला लागले. 
  • आधीच करोना संकट आणि त्यात असलेल्या एकमेव मार्गात देखील इतक्या अडचणी. मात्र सदोष अर्जांमुळे मुळे ईपीएफओ देखील काही करू शकत नाही.    
  • तेव्हा ही परिस्थिति येऊ न देण्यासाठी आपण भविष्य निर्वाह निधी (PF) काढताना काय चुका होतात आणि त्या कशा टाळत येतील हे पाहूया.

करोना कर्ज म्हणजे काय?

ईपीएफ क्लेम रिजेक्ट होण्याची कारणे- 

१. बँकेची चुकीची माहिती

  • आपल्याला हे माहितीच आहे की ईपीएफ खात्यासाठी प्रत्येकाला एक सार्वत्रिक खाते क्रमांक अर्थात यूएएन (Universal Account Number) दिलेला असतो. 
  • यामध्ये आपल्या पीएफ खात्याला संलग्नीत असलेल्या बँक खात्याची सर्व माहिती ही अचूक असणे आवश्यक असते. 
  • आपण पीएफ काढणार असाल टीआर संलग्नीत -असलेले बँक खाते चालू आहे का, खाते क्रमांक,आयएफएससी (IFSC) हे अचूक आहेत का तपासणे गरजेचे आहे.
  • आपल्याला मिळणारी रक्कम ही याच खात्यात जमा होणार असते त्यामुळे ही माहिती बरोबर असणे तितकेच महत्वाचे आहे. अन्यथा चुकीच्या बँक माहितीमुळे तुमची पीएफची रक्कम खात्यावर येण्यास उशीर लागेल.
  • आपण ईपीएफओ च्या संकेतस्थळावर जाऊन आपली KYC भागामध्ये आपली बँक माहिती तपासू शकतो आणि काही बादल करायचे असल्यास ते देखील करू शकतो.
  • आपण एकदा दुरुस्ती केल्यानंतर आपली कंपनी ती माहिती सत्यपित (verified) करते.

कोरोना – आव्हान मोठे, समाजमन संभ्रमित ठेवून कसे चालेल?

२. अपूर्ण केवायसी –

  • जर आपले केवायसी तपशील पूर्ण नसेल अथवा आपल्या कंपनीकडून सत्यपित केला गेला नसेल तरीदेखील आपला अर्ज नाकारला जाऊ शकतो. 
  • आपल्या ई-सेवा खात्यामधून आपला केवायसी तपशील पूर्ण आहे का तपासून तो पूर्ण भरून घेणे गरजेचे आहे. तसेच आपण जारी आपली केवायसी कागदपत्रे अद्ययावत केली तरी देखील आपण कामकाज करत असलेल्या संथेकडून ती सत्यपित होऊन त्याची नोंद होणे आवश्यक आहे.
  • याशिवाय जर आपल्या सेवेला पाच पेक्षा कमी वर्ष झाले असतील, तर पॅन (PAN) ची देखील ईपीएफओ वर नोंद होणे ईपीएफ काढण्यासाठी महत्वाचे आहे.

३. चुकीची जन्मतारीख –

  • तुमची ईपीएफओ मधील जन्मतारीख जर तुम्ही काम करत असलेल्या संस्थेमध्ये नोंद असलेल्या जन्मतारखेसोबत जुळत नसेल तरीदेखील पीएफ अर्ज नाकारला जातो. 
  • तेव्हा आपल्या जन्मतारीखेचा दाखला देताना दोन्ही ठिकाणची जन्मतारीख आधीच सत्यपित करून घेणे उत्तम.

कोरोना:  ईएमआय भरण्यास मुदतवाढ, तुम्ही काय कराल ?…

४. यूएएन हा आधार सोबत लिंक नसणे –

  • आपला यूएएन (UAN) हा आपल्या आधार ( AADHAR ) सोबत लिंक असल्याशिवाय आपला पीएफ काढण्यासाठीचा अर्ज मान्य होऊ शकत नाही. 
  • जर आपला पीएफ काढण्याचा विचार असेल तर सर्वप्रथम आपला यूएएन आधार सोबत लिंक करून घ्यावा. 
  • हे करण्याआधीच आपले आधार( AADHAR )  देखील सत्यंकीत केलेले असावे.

जन धन, आधार कार्डची अपरिहार्यता ‘कोरोना’ संकटात सिद्ध…

५. अटींची पूर्तता न करणे –

  • मार्च मध्ये करण्यात आलेली पीएफ काढता येण्याची तरतूद ही सध्याच्या कोविड-१९ च्या काळात आर्थिक गरजेला लक्षात घेऊन करण्यात आली आहे. 
  • त्यामुळेच ही प्रक्रिया फार काही अटी न ठेवता आणि जलद ठेवली आहे. 
  • जर सर्व अटींची पूर्तता झाली असेल तर अगदी तीन कार्यालयीन दिवसात आपला अर्ज मान्य होऊ शकतो. 
  • यासाठीच्या काही महत्वाच्या बाबी म्हणजे – आपला यूएएन सक्रिय असला पाहिजे ,आधार सत्यंकीत असून यूएएन सोबत लिंक असले पाहिजे आणि बँक खात्याची माहिती अचूक असून ती यूएएन सोबत संलग्नीत असली पाहिजे.    
  • जर अर्ज करण्याआधी आपण नोकरी सोडली असेल तर नोकरी सोडून एक महिना झालयांनातरच अर्ज करता येतो हे लक्षात घ्यावे आणि आपली कामावरून बाहेर पडण्याचा  दिनांक ईपीएफओच्या डेटा बेस मध्ये अद्ययावत झालेला असावी.
  • लग्नासाठी, नोकरी गेल्यामुळे, घर घेण्यासाठी इ. कारणांसाठी जर पीएफ काढायचा असेल, तर त्यासाठीचे नियम व अटी वेगळ्या असतील.

लॉकडाऊन व अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य बदल…

या सर्व गोष्टींची अर्ज करण्याआधी माहिती असणे गरजेचे ठरते जेणेकरून आपला अर्ज नाकारला जाणार नाही. या सर्व चुका टाळून जर आपण अर्ज केला तर नक्कीच अर्ज मानी होऊन लवकरच रक्कम आपल्या खात्यात जमा होईल.

माहिती अद्ययावत करण्यासाठी, दुरुस्ती करण्यासाठी उपयोगी संकेतस्थळे –

१. https://unifiedportal-mem.epfindia.gov.in

२. https://iwu.epfindia.gov.in/eKYC

३. https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: EPF Claim Rejection reasons in Marathi, EPF Claim reject honyachi karane 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.