ॲपद्वारे सुरक्षित ट्रेडिंग करण्याचे ५ मार्ग
शेअर ट्रेडिंग ॲप्स सध्या चांगलीच लोकप्रिय होत आहेत. कोरोना व्हायरस आता औपचारिकदृष्ट्या आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेपासून आपल्या सार्वजनिक जीवनापर्यंत या विषाणूने जवळपास सर्वकाही रोखून धरले आहे. आपण आपला दिवस कसा बसा डिजिटल उपकरणांद्वारे ढकलतोय, विशेषत: आपल्या स्मार्टफोनवर! स्मार्टफोनने आपल्याला मित्र आणि नातेवाईकांशी जोडलेले आहे, तसेच व्यापार आणि गुंतवणुकीसह दैनंदिन गरजांसाठी तंत्रज्ञान प्रणित उपायांसह आपल्याला सशक्त बनवले आहे. त्यामुळे आपण ऑल न्यू डिजिटल ट्रेडिंग अवतारासाठी सज्ज होत आहोत. याच धर्तीवर आपल्या स्मार्टफोनद्वारे सुरक्षित ट्रेडिंग करण्याची सुरवात केली पाहिजे.
शेअर बाजारात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या ४ महत्वाच्या गोष्टी
शेअर ट्रेडिंग ॲप्स – सुरक्षित ट्रेडिंग करण्याचे ५ मार्ग
१. आपले लॉगिन क्रेडेन्शिअल्स शेअर करू नका:
- आपले लॉगिन क्रिडेन्शिअल कुणाशीही शेअर करू नका. हे थोडे बंधनकारक वाटू शकते, मात्र अनेक ट्रेडर आपले लॉगिन क्रेडेन्शिअल हलकेच घेतात, असे दिसून आले आहे.
- लक्षात ठेवा, ब्रोकर किंवा तुमची बँक (कोणतीही) कधीच तुमच्याकडून ट्रेडिंग आयडी आणि पासवर्ड मागणार नाही.
- ही माहिती देण्याची विनंती कोणी केली तर तत्काळ याची माहिती सर्व्हिस प्रोव्हायडरसोबतच पोलिसांना द्या.
- आपले क्रेडेन्शिअल्स् कुणी पाहू शकेल, अशा ठिकाणी लिहिणे किंवा सेव्ह करणे टाळा.
- आपल्याला डिजिटल आणि भौतिक जगात आपल्या खात्याच्या ऑलराउंड सुरक्षेची सुनिश्चिती करावी लागेल.
डिमॅट अकाऊंट संदर्भात महत्वाची प्रश्नोत्तरे (FAQ)
२. आपली पासवर्ड सुरक्षा वाढवा:
- आपल्या ट्रेडिंग खात्यासाठी छोटा किंवा सहज समजेल असा पासवर्ड ठेवणे टाळा. कारण सायबर हल्लेखोर तो सहज शोधू शकतो.
- अल्फान्यूमरिक पासवर्डचा उपयोग करून आपल्या खात्याला उच्च प्रकारच्या सुरक्षा द्या.
- अर्थात, वित्तीय सेवा प्रदाता सध्या स्वत:हूनच अल्फान्यूमरिक पासवर्ड अनिवार्य करतात. त्यांनी असे केले नाही तरी तुमच्याकडून खबरदारी बाळगा.
- आपले नाव, जन्म तारखेचा मेळ असलेला सरळ पासवर्ड कधीही वापरू नका. सर्जनशील बना.
३. रुटकिट इन्स्टॉलेशन कधीही ठेवू नका:
- बहुतांश वेळा पेड ॲप्लिकेशनचे मोफत ओव्हर-द-काउंटर व्हर्जन मिळाल्यास ते आकर्षक वाटू शकते. मात्र हा विषय शेअर ट्रेडिंगचा असल्यामुळे एखादी डील खूपच अविश्वसनीय वाटत असेल, तर ती कधीही खरी नसणार.
- अशा प्रकारच्या ओव्हर-द-काउंटर व्हर्जनमध्ये ॲप्लिकेशन-लेव्हल मालवेअर (एक नुकसानकारक प्रोग्राम) असते किंवा ते रुटकिट लेव्हलवर तैनात केलेले असते.
- कोणत्याही स्थितीत असे ॲप्लिकेशन आपल्या फोनच्या सुरक्षेची भिंत तोडून आपली क्रेडिट आणि इतर संवेदनशील माहिती सहजपणे काढू शकतात.
- अखेरीस, असे ॲप्स इन्स्टॉल केल्यास पैसा कमी वाचतो आणि नुकसानच जास्त होते. त्यामुळे हे टाळले पाहिजे.
- तुम्ही असे ॲप इन्स्टॉल केले असेल, तर तुम्ही तुमचे डिव्हाइस फॅक्टरी डिफॉल्टवर रीस्टोअर केले आहे का, हे पहा.
सायबर सुरक्षा – इंटरनेट वापरताना कुठे क्लीक करताय ?
४. सार्वजनिक ठिकाणी लॉगिन करणे टाळा:
- तुम्ही कधीही सार्वजनिक ठिकाणी खाते सुरू केले, तर एखादी व्यक्ती वाकून तुमचा पासवर्ड पाहू शकण्याची शक्यता आहे.
- आपण टाइप करत असलेल्या कीबोर्डवरून हे सहज लक्षात येते. त्यामुळे तुमचा अल्फान्यूमरिक पासवर्डदेखील निरर्थक ठरतो.
- सार्वजनिक ठिकाणी मोफत हॉटस्पॉटचा वापर करणे टाळा. कारण यामुळे आपल्या डिव्हाइसला सायबर धोक्यांची शक्यता निर्माण होते.
५. प्रत्येक ट्रेड सुरक्षित करा:
- ट्रेडिंग करताना बाजार वारंवार अस्थिर होत असतो.
- कोव्हिड-१९ नंतर तर बाजार नेहमीच अशा प्रकारचा ट्रेडिंग पॅटर्न दर्शवत आहे.
- अस्थिर काळात आपला प्लॅटफॉर्म मजबूत टेक्नोलॉजीकल इन्फ्रास्ट्रक्चरने सपोर्टेड नसेल, तर डायनॅमिक लोड आपल्या प्लॅटफॉर्मला धोका पोहचवू शकतो.
- अशा प्रकरणी आपण आपले ट्रेडिंग पूर्ण करू शकणार नाहीत. तसेच आपले काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे नेहमीच सर्व ट्रेड्सना सुरक्षित ठेवू शकणा-या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म/मोबाइल ॲपवर विश्वास ठेवला पाहिजे.
- ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर स्वत: नोंदणी करण्यापूर्वी त्यासंबंधी पूर्णपणे माहिती करून घेतली पाहिजे. तंत्रज्ञानविषयक त्रुटी असणाऱ्या प्लॅटफॉर्मचा वापर करणे टाळा.
सायबर सुरक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स
अशा प्रकारे, काही सोप्या नियमांचे पालन करा, जेणेकरून तुम्ही सुरक्षित ट्रेडिंग करू शकाल आणि तुमच्या मेहनतीची कमाईही व्यर्थ जाणार नाही. कारण बचतीचा एक रुपयादेखील तुमचीच कमाई आहे.
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies