Arthasakshar Share Market Sensex & Nifty
Reading Time: 2 minutes

शेअर बाजार – निफ्टी आणि सेन्सेक्समधील तेजी कायम 

शेअर बाजार अपडेट्स –

भारतीय शेअर बाजार वृद्धीचा ट्रेंड कायम राखून बुधवारी सकारात्मक स्थितीत बंद झाला. निफ्टीने २.११ टक्के किंवा १८७.४५ अंकांची वृद्धी करत ९ हजाराचा टप्पा पार केला. तो अखेर ९,०६६.५५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सदेखील २.०६% किंवा ६२२.४४ अंकांनी वाढून ३०,८१८.६१ अंकांवर बंद झाला. निफ्टी फार्माच्या ४ टक्के वृद्धीसह सेक्टरल निर्देशांकातही वृद्धी दिसून आली. 

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड”ची हक्कभाग विक्री

बाजारातील गेनर्स व लूझर्स: 

 • १२७७ शेअर्सनी बुधवारी वाढ दर्शवली तर १०४४ शेअर्सनी किंमत गमावली. तसेच १६९ शेअर्स त्यांच्या किंमतीवर स्थिर राहिले. 
 • डॉ. रेड्डीज लॅब (५.८२%), एचडीएफसी (६.१५%), एम अँड एम (५.७१%), बीपीसीएल (५.६९ %) आणि श्री सिमेंट (६.२४%) हे निफ्टीतील टॉप गेनर्सपैकी होते. 
 • निफ्टी फार्मा सेक्टर ४ टक्क्यांनी वाढले. त्यानंतर ऑटो, एनर्जी आणि बँकिंग क्षेत्राने नंबर लावला.
 • बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक दिवसाअखेरपर्यंत प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले.
 • दुसरीकडे टॉप निफ्टी लूझर्समध्ये इंडसइंड बँक (२.६०%), भारती इन्फ्राटेल (६.९९%), हिरो मोटोकॉर्प (२.३४%), भारती एअरटेल (०.६५%) आणि वेदान्ता (१.६१%) यांचा समावेश झाला.
 • रिलायन्स इंडस्ट्रीजी त्यांच्या सबस्क्रिप्शनसाठीचा हक्कांचा मुद्दा सुरु केला, त्यामुळे त्यांचा शेअर जवळपास २ % नी वाढला. कंपनीने हक्कांच्या मुद्द्यांमुळे ५३,१२५ कोटींची वाढ होईल, असा प्रस्ताव ठेवला आहे. ३ जून २०२० रोजी हे सबस्क्रिप्शन पूर्ण होईल.
 • बजाज फायनान्सने मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाहीनंतर कर भरल्यानंतर ९४८ कोटी रुपयांचा नफा घोषित केला. हा नफा १९.४% नी घटला असला तरी शेअरची किंमत जवळपास ४ टक्क्यांनी वाढली. 
 • एल अँड टी इन्फोटेकनेही मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत ४२७ कोटी रुपयांचा प्रत्यक्ष नफा दर्शवल्यामुळे शेअरची किंमतदेखील ६ टक्क्यांनी वाढली. मागील वर्षीच्या कंपनीने नोंदवलेल्या नफ्यापेक्षा यावर्षीचा नफा १२.९ टक्क्यांनी जास्त नोंदवला गेला.

रिलायन्स हक्कभाग विक्री – कसा कराल अर्ज?

लसीच्या चाचण्यांमुळे बाजारात तात्पुरता उत्साह:

 • कोव्हिड-१९ लसीसाठीच्या चाचण्यांमुळे आजही गुंतवणूकदारांच्या भावना उत्साही राहिल्या.
 • तथापि, अमेरिका-चीनमधील कोव्हिड-१९ च्या उद्रेकावरून सुरू असलेल्या वादाचे दुष्परिणाम आजही बाजारातील सकारात्मकतेवर झालेले दिसून आले
 • देशातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी आज बाजारातील निर्देशांनी तसेच प्रमुख सेक्टरला निर्देशांकांनी दिवसभरात सकारात्मक व्यापार केला.

– श्री अमर देव सिंह

 प्रमुख सल्लागार,

एंजल ब्रोकिंग लिमिटेड

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…