Arthasakshar Reliance Industries
Reading Time: 3 minutes

“रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड”ची हक्कभाग विक्री 

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी हक्कभाग विक्री आजपासून सुरु (Reliance industries Ltd rights issue)

शेअर बाजारात नोंदणी केलेल्या कंपन्या आपल्या वृद्धी योजनांसाठी, व्यावसायिक अधिग्रहणासाठी, कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी भांडवल बाजारात नव्याने भांडवल विक्री करून किंवा सध्याच्या धारकांना हक्क समभाग देऊन भांडवल उभारणी करू शकतात. या योजनेनुसार विक्री केलेले समभाग सहसा अधिमूल्य आकारून दिले जातात. 

भांडवलबाजार : समभाग आणि रोखे

  • कंपनीच्या भाग भांडवलात होणारी वाढ अल्प असते त्यावर आकारलेले अधिमूल्य अधिक असले तरी ते विद्यमान बाजारभावाच्या तुलनेत आकर्षक असते यामुळे होणारी भाग भांडवलातील वाढ (ज्यावर फारतर थोडा अधिक लाभांश द्यावा लागेल) त्यामुळे अल्प किंमत मोजून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन नियोजित कार्यासाठी उपयोग करून व्यवसायवृद्धी साधता येते.
  • अस्तित्वात असलेल्या कंपनीने पुन्हा भागविक्री करताना विद्यमान भागधारकांना समभाग दिलेच पाहिजेत असे बंधन नाही.
  • असे भाग द्यायचे की नाहीत किंवा प्राधान्याने द्यायचे असल्यास त्यांची संख्या किती ठेवायची ते ठरवून त्यास भागधारकांची मंजुरी घ्यावी लागते.  
  • हक्कभाग देताना ते कोणत्या प्रमाणात किती रुपयांनी द्यायचे संचालक मंडळास ठरवता येते. 
  • यासाठी सेबीने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून त्याचे पालन करावे लागते. 

भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करताय? मग आधी हे वाचा

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हक्कभाग विक्री (Reliance industries Ltd rights issue)

  • भांडवल बाजारातील आघाडीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी आजपासून हक्कभाग विक्री चालू केली असून ती ३ जून २०२० पर्यंत चालू राहील. 
  • १४ मे २०२० रोजी जे कंपनीचे भागधारक होते त्याना त्यांनी धारणा केलेल्या प्रत्येकी १५ समभागांकरिता १ समभाग ₹ १२५७/- ने मिळेल ही किंमत ३० एप्रिल २०२० च्या बंद भावाहून १४% ने कमी आहे. 
  • यासाठीच्या मागणीसोबत २५% रक्कम घ्यायची असून त्याची विभागणी ₹२.५० समभाग मूल्य आणि ₹३११.७५ अधिमूल्य अशी होईल, शिल्लक समभाग मूल्य व अधिमूल्य एक किंवा अधिक हप्त्यात ३१ मार्च २०२१ पूर्वी मागितले जाईल. 
  • यामधील कालावधीत असे अंशतः भागभरणा झालेले समभाग शेअरबाजारात खरेदी विक्री करता येतील त्यामुळे गुंतवणूकदारांना तरलता उपलब्ध होईल. 
  • यासाठी मुंबई शेअरबाजार व राष्ट्रीय शेअरबाजाराची तत्वतः मान्यता मिळवली आहे. 
  • यामुळे रिलायन्सचे भागभांडवल ६.६६% ने वाढेल व त्यांच्याकडे ₹ ५३१२५/- कोटी जमा होतील आत्तापर्यंतच्या इतिहासात ही सर्वाधिक रकमेची हक्कभाग विक्री असून शेअरबाजार निर्देशांक त्याच्या उच्चतम स्तराहून ३०% ने खाली आला असताना इतकी मोठी रक्कम उभारणे आव्हानात्मक आहे. 
  • कंपनी प्रवर्तक आपल्या वाट्याचे सर्व भाग (५०.०७%) स्वीकारणार असून भांडवल बाजार नियमांचे अधीन राहून भरणा न झालेले भाग ही घेणार आहेत. 
  • यावरून कंपनी प्रवर्तक याबाबत आशावादी असल्याचे कळून येते. 
  • ३० वर्षाच्या कालखंडानंतर प्रथमच ही हक्कभाग विक्री करण्यात येत आहे. 
  • सध्या कोविड १९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून भांडवल बाजार नियामक सेबीने काही सवलती दिल्या आहेत.
  • शेअर्स प्रमाणेच ASBA सवलतीचा वापर करून मागणी करायची असून R-WAP सुविधा उपलब्ध केली आहे. 
  • ही सुविधा ASBA ला पर्याय नसून अधिकची सुविधा आहे यामुळे धारक ऑनलाइन बँकिंग द्वारे UPI चा वापर करू शकतील.

शेअर बाजार: रिलायन्सचे वाढते बाजारमूल्य

विद्यमान भागधारक असलेल्या व्यक्तींपुढे खालील पर्याय आहेत.

  • आपल्याला मिळालेल्या समभागांचा देकार पूर्णतः अथवा अंशतः स्वीकारणे, अधिक समभागांची मागणी करणे.
  • देकार पूर्णपणे नाकारणे.
  • आपला देकार बाजारभावाप्रमाणे विकणे किंवा योग्य किंमत घेवून / न घेता दुसऱ्या व्यक्तीस देणे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड”ची महत्वाची आकडेवारी –

  • गेल्या महिनाभरात आपल्या उपकंपनीच्या १४.८१ % भांडवलाची विक्री करून रिलायन्सने ₹ ६७१९५ कोटी रुपये मिळवले आहेत. 
  • कंपनीवर ₹ १.५३ लाख कोटी कर्ज असून त्याची परतफेड करण्यास निव्वळ नफ्यातील बरीच रक्कम खर्च होते. 
  • मार्च २०२१पर्यंत कंपनीस पूर्णपणे कर्जमुक्त करण्याचा कंपनीने चेअरमन मुकेश अंबानी यांचा मानस असून तो पूर्ण करण्यास या हक्कभाग विक्रीची मदत होईल. 
  • या हक्कभाग विक्रीतील ६०% रक्कम कर्जफेड करण्यास तर उर्वरित रक्कम टेलिकॉम व रिटेल क्षेत्राच्या विकास योजनांसाठी वापरली जाईल. 

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीबद्दल ८ महत्वपूर्ण गोष्टी

तांत्रिक विश्लेषण-

  • तांत्रिकदृष्ट्या पाहिले असता ६.६६% भांडवल वाढीमुळे शेअरच्या बाजारभावात भागविक्रीनंतर शेअर्सची उलाढाल वाढून तेवढीच घट होऊ शकते.
  • त्याचप्रमाणे गेल्या ५२ आठवड्यातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड” च्या शेअरचा भाव  ₹ ८६७/- ते ₹ १६०२/-  या पातळीत राहिला, त्या तुलनेत ₹१२५७/- हा भाव फारसा आकर्षक नाही. 
  • विद्यमान भागधारक त्यांना मिळणाऱ्या हक्कभागांच्या एवढ्या शेअर्सची विक्री करून, फायदा मिळवून आपल्या समभागांची संख्या तेवढीच राखून ठेवू शकतात. 
  • भविष्यात शेअर्सचा भाव हक्कभाग विक्री भागाजवळ किंवा त्याखालीही येऊ शकतो. 
  • सरकार आणि मीडिया हे रिलायन्सच्या प्रभावाखाली असल्याने हे हक्कभाग कसे आकर्षक आहेत त्याचा विविध माध्यमातून प्रचार, प्रसार होऊन प्रभाव पडू शकतो. 

या सर्व गोष्टीं विचारात घेऊन आपल्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घेऊन आपल्या विद्यमान शेअर्सचे व मिळणाऱ्या हक्कभागांचे नेमके काय करायचे यासंबंधीचा निर्णय घ्यावा.

उदय पिंगळे

web search – reliance industries rights issue date, what is rights issue?

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…