Reading Time: 4 minutes

भारतातील शेअर बाजारावर नोंद असलेल्या यशस्वी कंपन्यांमधली दादा कंपनी म्हणून “आयटीसी लिमिटेड” ओळखली जाते. हिंदीमध्ये आजोबांना “दादाजी” नावाने हाक मारतात. आयटीसी लिमिटेड मात्र भल्याभल्या कॉर्पोरेटर्ससाठी कर्तुत्वाबरोबरच वयाने सुद्धा दादाजी आहे. आयटीसीचा जन्म १९१० साली “इम्पेरियल टोबाको कंपनी” म्हणून कोलकाता येथे झाला. तेव्हा प्रमुख व्यवसाय तंबाखू आणि सिगारेट होता.

‘आयटीसी’ची यशोगाथा मागील भागावरून पुढे चालू-

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -‘आयटीसी’ची यशोगाथा

सेगमेंट ३ : FMCG 

  • कंपनीचे व्यवसाय विस्तारीकरण मोहिमेतले एक यशस्वी क्षेत्र म्हणजे “एफएमसीजी” (FMCG = Fast Moving Consumer Goods).
  • सिगारेट विक्रेते टपरीधारक किंवा छोटे दुकानदार असतात. 
  • कंपनीच्या लक्षात आले की या छोट्या दुकानदारांकडे बिस्किटाची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. सिगरेट व्यवसायामुळे आपल्याकडे आधीच विक्रेते तयार आहेत, फक्त त्यांना बिस्कीटसुद्धा विक्रीसाठी द्यायचे आहेत. या प्रकारे बिस्कीट व्यवसायाची आयटीसीने सुरुवात केली. वाढत्या व्यवसायाबरोबर कंपनीने वेफर्स, चॉकलेट्स असे अनेक प्रोडक्ट्स बाजारात आणले. 
  • सुरुवातीला छोट्या प्रमाणात असणारा हा व्यवसाय कंपनीने मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे. 
  • सिगारेट व्यवसायापेक्षा जास्त विक्री आणि नफा या क्षेत्रातून मिळवायचे कंपनीचे धोरण आहे.  २०३० साला पर्यंत रु. १ लाख कोटी वार्षिक विक्री या क्षेत्रातून करायची असे आयटीसीचे धाडसी लक्ष्य आहे.  
  • आयटीसीचे विविध ब्रांडची माहिती तुम्ही येथे क्लिक करून घेऊ शकता.
  • काही प्रमुख ब्रॅंड्सची त्यांच्या प्रत्येकी बाजार हिश्श्यावर पकड पुढीलप्रमाणे आहे  : 
ब्रँड  मार्केट लिडरशिप 
आशीर्वाद आटा ब्रँडेड पिठामध्ये क्रमांक १
सनफिस्ट बिस्किट क्रीम बिस्किटांत क्रमांक १
बिंगो स्नॅक्स

तेच ते टेढे मेढे बिंगो !

स्नॅक्स विभागात क्रमांक १
क्लासमेट वह्या वह्यांमध्ये क्रमांक १
यिप्पी नूडल्स नूडल्स मध्ये क्रमांक २
एंगेज डिओड्रन्टस डिओड्रन्टस मध्ये क्रमांक २
फिएमा बॉडीवोश बॉडीवोश मध्ये क्रमांक २
मंगलदिप अगरबत्ती धूप विभागात क्रमांक १,

अगरबत्ती विभागात क्रमांक २

आयटीसी समूहाचे FMCG व्यवसायातील प्रमुख ब्रँड :

आयटीसी FMCG व्यवसाय विक्रीचा वाढता आलेख पुढीलप्रमाणे आहे :

आयटीसी FMCG व्यवसायाची एकूण विक्री तब्ब्ल  रु. 18 हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे. विविध प्रमुख ब्रँडची विक्री पुढीलप्रमाणे आहे. 

सेगमेंट ४ : कृषी उत्पादने (Agro Business):

  • आयटीसीच्या एकूण नफ्यापैकी फक्त ३% नफा कृषी व्यवसायातून येत असला, तरी कंपनी या वस्तू निर्यात करणारी भारतातील दुसरी सगळ्यात मोठी निर्यातदार कंपनी आहे. 
  • मसाले, कच्ची तंबाखू, गहू, सोया असे धान्ये, कॉफी, फळे, मरीन प्रोडक्ट्स म्हणजे  फ्रोजन श्रिम्प्स (डबाबंद कोळंबी) यांचा 
  • याव्यतिरिक्त रेडी टू इट प्रकारची खाद्यपदार्थही कंपनी उत्पादन व निर्यात करते. या विभागात कंपनीने २०१९ मध्ये “मास्टर शेफ” ब्रँड सुरु केला आहे. 
  • इ- चौपाल  : कृषी क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना मालाला सुयोग्य भाव कसा मिळवता येईल, यासाठी आयटीसीने २० वर्षांपूर्वीच इ -चौपाल या क्रांतिकारी योजनेचा शुभारंभ केला होता. ४० लाख शेतकऱ्यांचा इ -चौपाल मुळे फायदा झाला आहे.
  • पिकांबाबत हवामान, खते, बी-बियाणे, लागवडीचा योग्य हंगाम अशा अत्यंत महत्वाच्या बाबींची माहिती शेतकऱ्यांना इ- चौपाल द्वारे दिली जाते.
  • निर्यातीबरोबरच आपल्या एफएमसीजी व्यवसायासाठी कंपनीला कच्च्या मालाचा पुरवठा वेळेवर आणि योग्य भावात आवश्यक असतो. 
  • गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध कल्याणकारी योजना व कार्यक्रमांमुळे आयटीसीचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहे. 

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – टायटनची यशोगाथा (भाग १)

सेगमेंट ५ : पॅकेजिंग व पेपरबोर्ड

  • आयटीसी सिगारेट्स या आपल्या मुख्य व्यवसायासाठी आवश्यक पाकिटे दुसऱ्या कंपन्यांकडून खरेदी करत असे. दुसरीकडून खरेदी करण्याऐवजी आपण स्वतःच पॅकेजिंग केले, तर नफा अजून वाढेल म्हणून आयटीसीने १९२५ मध्ये पॅकेजिंग कंपनीचं विकत घेऊन टाकली. 
  • सध्या अनेक भारतीय व परदेशी कंपन्या आयटीसीच्या पॅकेजिंग व्यवसायाचे ग्राहकआहेत. उदा: कोलगेट, टाटा टी, डिएगो, रॅडिको खेतान इ.
  • आयटीसीच्या एकूण नफ्यापैकी ६% नफा पॅकेजिंग व पेपरबोर्ड  येतो. 

सेगमेंट ६ : आयटीसी इन्फोटेक 

  • आयटीसी माहिती तंत्रज्ञान व्यवसायातही छोट्या प्रमाणात आहे. ग्राहकांना डिजिटल सोल्यूशन्स देण्याच्या व्यवसाय कंपनी करते.
  • एकूण नफ्यामध्ये आयटीसी इन्फोटेकचा फार काही सहभाग नाही.  

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – टायटनची यशोगाथा (भाग २)

व्यवस्थापन :

  • आयटीसीचे व्यवस्थापन सुरुवातीपासूनच व्यावसायिक होते.
  • श्री. वाय.सी. देवेश्वर १९९६ पासून २०१६ पर्यंत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. व्यवसाय विस्तारीकरण करताना आयटीसी खूपच जास्त व्यवसायांत होती. त्यांनी खाद्यतेल, आर्थिक सेवा असे कंपनीच्या दीर्घकालीन प्रगतीच्या दृष्टीने प्राधान्य नसलेले व्यवसाय चक्क विकून टाकले. 
  • त्यांच्या नेतृत्वामध्ये  नफ्यामध्ये ३५ पट वाढ झाली.  उद्योगविश्वात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. 
  • २०१२ मध्ये पदमभूषण पुरस्काराने श्री.वाय.सी. देवेश्वर यांना गौरवण्यात आले . 
  • २०१३ मध्ये हॉर्वर्ड बिजनेस रिव्हिव्हने भारतातले सर्वोत्कृष्ट व जगातले ७ वे सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून त्यांचा गौरव केला.  
  • सध्याचे आयटीसीचे चेअरमन श्री.संजीव पुरी आहेत. त्यांनी १९८६ मध्ये आयटीसीमध्ये काम करायला सुरुवात केली होती. 

आर्थिक निकालांबाबत 

  • तुम्हाला कंपनीचा वार्षिक अहवाल आणि इतर आर्थिक माहिती अभ्यासायची असेल, तर येथे क्लिक करा.
  • कंपनीचे गेल्या काही वर्षातील शेअर्सचे भाव बघण्यासाठी येथे क्लिक करा. 

कंपनीचा FY 2018-19 चा आर्थिक निकाल :

स्रोत : आयटीसी वार्षिक अहवाल 

  • आर्थिक वर्ष २००८-०९ मध्ये आयटीसीची विक्री रु.५,६१२ कोटी  २०१८-१९ मध्ये कोटी होती. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये वाढून एकूण विक्री तब्बल रु. ४४,४१५ कोटी पर्यंत पोहोचली. गेल्या १० वर्षांत विक्री ११% दराने दरवर्षी वाढली.  
  • कंपनीचा करोत्तर नफ्यात गेल्या १० वर्षांत प्रतिवर्ष १४.३०%  वाढ होत होती.
  • गेल्या १० वर्षांत आयटीसीच्या शेअर्सनी २०.३०% दराने प्रतिवर्ष परतावा दिला आहे. याच काळात सेन्सेक्स म्हणजे मुंबई  बाजारात नोंदलेल्या कंपन्यांचा सरासरी परताव्याचा दर १४.८०% होता.

– सी.ए. अभिजीत कोळपकर

(अभिजीत कोळपकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून ते अर्थसाक्षरता अभियानात काम करतात. तसेच अर्थसाक्षरता अभियानाच्या कार्यशाळा घेतात). 

(या लेखमालेतील कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची, अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच या कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात माहिती दिलेल्या कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:  https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…