Reading Time: < 1 minute

नमस्कार! म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘एसडब्लूपी’बद्दल. “एसडब्लूपी म्हणजेच सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन”.

 • एसआयपी आणि एसटीपी मध्ये आपण पाहिले की आपण पद्धतशीरपणे इक्विटीमध्ये गुंतवणूक करत असतो. ‘एसडब्लूपी’मध्ये आपण आपल्या गरजेनुसार पैसे काढत असतो. 

 • ही सुविधा अशा लोकांसाठी योग्य आहे ज्यांना नियमितपणे महिन्याला किंवा तिमाहीला खर्चासाठी पैशाची गरज असते. 

 • ज्यांनी म्युच्युअल फंडामध्ये एकगठ्ठा रक्कम गुंतवलेली आहे, असे गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार आपल्याला महिन्याला किंवा तिमाहीला लागणाऱ्या रकमेची ‘एसडब्लूपी’चा विनंती अर्ज म्युच्युअल फंडाकडे देऊ शकतो. 

 • त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार दर महिन्याला किंवा तिमाहीला त्याच्या बँकेत ‘एसडब्लूपी’ची रक्कम म्युच्युअल फंडच्या युनिट्समधून निघून जमा होत असते.

 • आपली ‘एसडब्लूपी’ची रक्कम ही म्युच्युअल फंडामधून मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नापेक्षा कमी असावी. जेणेकरून आपली मूळ गुंतवणूक खाली जाणार नाही.

 • उदाहरणार्थ, जर आपण म्युच्युअल फंडातून १०% परताव्याची अपेक्षा करत असू, तर आपली ‘एसडब्लूपी’ची रक्कम वार्षिक ८-९% असावी जेणे करून आपल्याला नियमित उत्पन्न मिळेल व आपली गुंतवणूकही वाढत राहील. शक्यतो आपण जो पर्यंत नोकरी किंवा व्यवसाय करत असतो तोपर्यंत आपण एसआयपी किंवा एसटीपी मध्ये गुंतवणूक करत राहिले पाहिजे व जेव्हा आपण निवृत्त होतो तेव्हा नियमित उत्पन्नासाठी आपण ‘एसडब्लूपी’ चालू केली पाहिजे. 

ह्या सुविधेचा वापर गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार उत्तमरित्या करू शकतात. 

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ११

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १२

म्युच्युअल फंड सही है l

धन्यवाद!

–निलेश तावडे 

9324543832 

nilesh0630@gmail.com

(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Reading Time: 2 minutes

नमस्कार!म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘एसटीपी’बद्दल. “एसटीपी म्हणजे सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन”

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात-  भाग ३

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ४

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ५

 • जेव्हा आपण दर महिन्याला ठराविक रक्कमेची गुंतवणूक करतो, तेव्हा म्युच्युअल फंडचे वितरक आपल्याला ‘एसआयपी’चा सल्ला देतात. 

 • जेव्हा आपल्याला एकगठ्ठा रक्कम इक्विटी फंडामध्ये गुंतवायची असते तेव्हा शेअर मार्केटमधल्या शॉर्ट टर्म अस्थिरतेचा प्रभाव आपल्या एकगठ्ठा इक्विटी गुंतवणुकीवर होऊ नये, त्यासाठी वितरक आपल्याला ती रक्कम एकगठ्ठा कर्जरोखे निगडित ‘डेट फंडा’मध्ये गुंतवून ठराविक मुदतीने इक्विटी फंडामध्ये थोडे थोडे ट्रान्सफर करण्याचा सल्ला देतात. त्यालाच “सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन” म्हणतात. 

 • डेट फंडामध्ये एक रक्कमी गुंतवून करून आपल्याला सुरवातीला एकदाच ‘एसटीपी’चा अर्ज द्यावा लागतो. 

 • डेट फंड आपल्या स्थिर परतावा देतात व ठराविक कालावधी मध्ये थोडी थोडी रक्कम इक्विटी फंडात ट्रान्सफर केल्याने कमी सरासरी किंमतचा लाभ गुंतवणूकदाराला मिळतो. 

 • अशाप्रकारे आपण जास्त जोखीम न घेता इक्विटी फंडामध्ये पद्धतशीरपणे गुंतवणूक करू शकतो. साधारण आपली जी एकगठ्ठा रक्कम असते त्याचे १८-२४ भाग करून येणाऱ्या १८ ते २४ महिन्यांमध्ये इक्विटी फंडामध्ये ट्रान्सफर करू शकतो. 

 • ज्या डेट फंडामध्ये आपण एकगठ्ठा रक्कम गुंतवितो त्याला स्रोत योजना (Source Scheme) असे म्हणतात व ज्या इक्विटी योजनांमध्ये आपण एसटीपी करतो त्याला लक्ष्य योजना (Target Scheme) म्हणतात. 

 • डेट फंडमध्ये आपण कधीही वाढीव रक्कम गुंतवू शकतो ज्याने आपली एसटीपी दीर्घ काळाकरिता चालू राहते व आपल्याला चक्रवाढ वाढीचा लाभ होतो. 

शेअर बाजारामधल्या अस्थिरतेवर मात करण्यासाठी म्युच्युअल फंडाची एसटीपी फायदेशीर ठरते. प्रत्येक घरात एक तरी इक्विटी फंडातील एसआयपी असलीच पाहिजे. 

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ६

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ७

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ८

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ९

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात-  भाग १०