गुगल माय बिझनेस म्हणजे नेमकं काय?

Reading Time: 3 minutes“गुगल” हे एक सर्च इंजिन आहे, म्हणजे इंटरनेटवरील एक संकेतस्थळ ज्यावर कुठल्याही विषयाची माहिती असो किंवा तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर एका क्लिकवर मिळते. खाण्यासाठी उत्तम हॉटेल शोधण्यापासून ते चांगला लाँड्रीवाला भैया शोधण्यासाठी हे गुगल कायम आपल्या मदतीसाठी सज्ज असतं. या हॉटेल्स किंवा या सोयी सुविधांची माहिती गुगलवर येते कुठुन? तर याचं उत्तर म्हणजे व्यावसायिक त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी, जास्तीचे गिऱ्हाईक खेचण्यासाठी, जाहिरातीसाठी “गुगल माय बिझनेस” या गुगलमार्फतच चालू झालेल्या टूलचा वापर करतात. थोडक्यात सर्व व्यावसायिकांसाठी हक्काचं व्यासपीठ म्हणजे “गुगल माय बिझनेस”.

गुगल सीईओ “सुंदर पिचाई” यांची झेप

Reading Time: 2 minutesतंत्रज्ञान क्षेत्रातली महाबलाढ्य कंपनी असणाऱ्या गुगलची मालकी अल्फाबेट या कंपनीकडे आहे. सुंदर पिचाई गेल्या ४ वर्षांपासून गुगलचे सीईओ आहेत. त्यांच्या कारकिर्दीत गुगलने चांगलीच आर्थिक घौडदौड केली आहे. अल्फाबेटचे मार्केट कॅप जवळपास ९०० बिलियन डॉलर्स म्हणजे तब्बल ६० लाख कोटी रुपये इतके आहे. आतापर्यंत केवळ गुगल चे सीईओ असणाऱ्या सुंदर पिचाई यांना अल्फाबेटच्या सीईओ पदाची सुद्धा जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यामुळे एकाचवेळी दोन कंपन्यांचे सीईओ म्हणून कार्यरत असणार आहेत.