Reading Time: 2 minutes

नमस्कार! म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “निधी व्यवस्थापन प्रक्रियेबद्दल (Fund Management Process)”

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात-  भाग ३

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ४

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ५

  • म्युच्युअल फंडाचा सर्वात महत्वाचा भाग असतो तो “फंड मॅनेजमेंट टीम सीआयओ (Chief Investment Officer)”. हा टीमचा मुख्य असतो. 

  • काही मोठ्या म्युच्युअल फंडामध्ये  कर्जरोखे व समभाग (Debt &Equity) यासाठी वेग वेगळे सीआयओ देखील असतात. 

  • डेट किंवा कर्जरोखे म्हणजे कर्जरोख्यांशी संबंधित योजनांसाठी, तसेच इक्विटी संबंधित योजनांसाठी वेग वेगळे फंड मॅनेजर्स असतात. 

  • डेट फंड मॅनेजर्सना मदत करण्याकरता क्रेडिट अनॅलिस्ट (Credit Analyst) असतात. ते बाजारमध्ये उपलब्ध असलेल्या निरनिराळया कर्जरोख्यांचा अभ्यास करत असतात, त्यात ते कर्जरोख्यांची पतमानांकन तसेच कंपनीचे प्रायोजक / संचालक आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स (Corporate Governance) याची पूर्ण माहिती मिळवून देतात. तसेच, कर्जरोखे बाजारमध्ये चाललेल्या उलाढाली बद्दल फंड मॅनेजर्सना माहिती पुरवितात. 

  • फंड मॅनेजर्सनी निवडलेले कर्जरोखे खरेदी विक्री करण्या करिता डेट डीलर्स (Debt Dealers) असतात, जे बाजारातील दलालांशी किंवा प्रत्यक्ष कर्जरोखे कंपनीशी संपर्क करून कर्जरोख्यांची खरेदी विक्री करत असतात. 

  • डेट फंड मॅनेजर्स त्यांना इन्व्हेस्टमेंटसाठी मिळणाऱ्या फंड्सच्या अनुषंगाने क्रेडिट अनॅलिस्ट आणि डेट डीलर्सच्या मदतीने आपली कर्जरोख्यांमधील गुंतवणूक उत्तमरित्या सांभाळतात. 

  • जे इक्विटी फंड मॅनेजर्स असतात त्यांना मदत करण्याकरिता इक्विटी अनॅलिस्ट (Equity Analyst) असतात जे शेयर बाजारातील कंपन्यांचा बारकाईने अभ्यास करतात व फंड मॅनेजर्सना कंपनी गुंतवणूक करण्यायोग्य आहे की नाही याची माहिती पुरवितात. त्यासाठी ते काहीवेळा कंपनीच्या प्लांट किंवा फॅक्टरीमध्ये प्रत्यक्ष जाऊन माहिती गोळा करतात. 

  • फंड मॅनेजर्सनी निश्चित केलेल्या शेयरची खरेदी विक्री करण्याकरिता इक्विटी डीलर्स (Equity Dealers) असतात. जे बाजारातील इक्विटी दलालांशी संपर्क साधून खरेदी विक्री करत असतात. 

  • डेट डीलर्स तसेच इक्विटी डीलर्स बाजारातील निरनिराळ्या लोकांशी संपर्क ठेवून बाजारामध्ये होणाऱ्या मोठ्या उलाढालींबद्दल फंड मॅनेजर्सना माहिती पुरवितात जेणेकरून फंड मॅनेजर्स योग्य ती पावले तत्परतेने उचलू शकतात. अशी ही प्रोफेशनल फंड मॅनेजर्स ची टीम आपल्या गुंतवणुकीदारासाठी खूप मेहनत घेत असते. 

गुंतवणूकदारांनी फंड मॅनेजर्सवर विश्वास ठेवून दीर्घ मुदतीसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली पाहिजे. 

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

म्युच्युअल फंड सही है l

धन्यवाद!

– निलेश तावडे 

9324543832 

nilesh0630@gmail.com

(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला  भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/