Reading Time: 2 minutes

मागच्या भागात आपण दोन्ही देशांचा जीडीपी, परदेशी कर्ज, दरडोई उत्पन्न व विकास दर या साऱ्या विषयांची तुलनात्मक मांडणी बघितली या भागात इतर महत्वपूर्ण विषयांची तुलना पाहू.

भारताची अर्थव्यवस्था वि. पाकिस्तानची अर्थव्यवस्था – १५ महत्वाचे मुद्दे, भाग- १

६. थेट परकीय गुंतवणूक – २०१७  (FDI- 2017)

भारत: ४३.४८ अब्ज डॉलर 

पाकिस्तान: २७.६१ अब्ज डॉलर

विकसनशील देशांना आर्थिक प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक म्हणजेच एफडीआय (FDI) खूपच महत्वाची असते.  आंतरराष्ट्रीय व्यापार करारामुळे थेट परदेशी गुंतवणूक वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एफडीआयमुळे अनेक  देशांना फायदा झाला आहे. एफडीआयच्या जागतिक यादीमध्ये भारत १९ व्या तर ५९ व्या स्थानावर आहे. 

७. गोल्ड रिझर्व्ह (Gold Reserves)-

भारत: ५५७.७७ टन्स (भारत हा जगातील सर्वात जास्त सोनं आयात करणारा देश आहे.)

पाकिस्तान: ६४.५० टन्स 

आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यवहार करण्यासाठी सोने राखीव चलन म्हणून काम करते. त्यामुळे कोणत्याही देशासाठी जास्त प्रमाणात सोने असणे महत्वाचे आहे. परकीय चलनाचे मूल्य अस्थिर असते.  त्यामध्ये चढउतार होत असतात. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) मान्यतेनुसार बाजारभावाच्या आधारे एखाद्या मान्य देशाच्या कर्जाची परतफेड करण्याकरिता सोने वापरता येते. कर्ज घेणार्‍या राष्ट्रांना कर्ज देताना जागतिक बँकसुद्धा सोने स्वीकारते. सर्वात जास्त गोल्ड रिझर्व्ह असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत नवव्या स्थानावर,  तर पाकिस्तान ४४ व्या स्थानावर आहे. 

८. साक्षरता दर – २०११ (Literacy Rate -2011)

भारत: ७४.०४%  

पाकिस्तान: ६०% 

साक्षरतेमध्येही भारतानेच बाजी मारली असून जास्त लोकसंख्या असूनही, भारतातील साक्षरता दर पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. 

९. वाहतूक (Transportation)- 

भारत: रस्ते  – ५.५ मिलियन किमी (२०१८), रेल्वे ट्रक्स – १,१५,००० किमी 

पाकिस्तान: २,६४,४०१ किमी (२०१८), रेल्वे ट्रक – ११,८८१ किमी 

चांगली वाहतूक व्यवस्था हे प्रतिशिल  देशाचे वैशीष्ट्य आहे. भारताची वाहतूक व्यवस्था ही पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. 

१०. दारिद्र्य (Poverty):

भारत: २८% (UNDP रिपोर्ट २०१८)

पाकिस्तान: २८% 

दारिद्र्य ही समस्या दोन्ही देशांसमोर समसमान प्रमाणात आहे.  

११. महागाई दर (Inflation Rate)-

भारत: २.४९%

पाकिस्तान: ४.७८% 

भारत सध्या वाढत्या महागाईचा सामना करत असला तरीही पाकिस्तानमध्ये मात्र यापेक्षा जास्त महागाई आहे. दोन्ही देशांच्या महागाई दरामध्ये लक्षणीय तफावत आहे.

१२. बेरोजगारीचा दर (Unemployment Rate) –

भारत: ६.१%

पाकिस्तान: ५.९% 

भारतात बेरोजगारीचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. इथे पाकिस्तानचा बेरोजगारी दर भारतापेक्षा कमी आहे. 

१३. मिलिटरी खर्च (Military expenditure) –

भारत: रु. ३.१८ लाख कोटी (अर्थसंकल्प २०१९)

पाकिस्तान:  १२६८६ मिलियन डॉलर (अर्थसंकल्प २०१८)

आजपर्यंत  भारतासोबत झालेली सगळी युद्ध हरुनही भारताशी युद्ध करण्याची आणि ते जिंकण्याची दिवास्वप्न बघणाऱ्या पाकिस्तानचा मिलिटरी खर्च मात्र भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे. पुढील इमेजमधून दोन्ही देशांच्या मिलिटरी खर्चाचा अंदाज येईल.

(Image source: IB Times UK)

१४. भ्रष्ट्राचार (२०१६) –

भारत: ७९ (३८/१००)

पाकिस्तान: ११६ (२९/१००)

भ्रष्ट्राचार ही देशातली अजून एक मोठी समस्या. खरंतर भ्रष्ट्राचार हे अनेक समस्यांचे मूळ आहे. भ्रष्ट्राचारामध्ये मात्र भारत देशाने पाकिस्तानला मागे टाकले आहे.  यासाठी केवळ सरकारनेच नाही तर समस्त देशवासीयांनी एकत्र येण्याची गरज आहे. कारण शेवटी, “हर व्यक्ती से हि देश बनता है…”

१५.  लोकसंख्या (Population) –

भारत: १३३.९२ कोटी (जगात दुसऱ्या क्रमांकावर)

पाकिस्तान: १९.७ कोटी 

भारतात वाढती लोकसंख्या एक मोठे आव्हान आहे. भारताची लोकसंख्या सध्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही लोकसंख्या वाढ, दारिद्र्य, बेरोजगारी यासारख्या समस्यांना तोंड देत आज देशाची अर्थव्यवस्था “टॉप टेन” अर्थव्यवस्थांमध्ये गणली जाते. ही भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Reading Time: 2 minutes

सन १९४७ साली भारत आणि पाकिस्तान नावाचे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. पण एक देश आज जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थसत्ता बनण्याच्या मार्गावर आहे तर, दुसरा आतंकवादाचा अड्डा झाला आहे. या दोन देशांमध्ये तुलना होऊच शकत नाही. 

अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य असणाऱ्या महाराष्ट्राचा जीडीपी (GDP) पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. खाली दिलेल्या १५ महत्वपूर्ण आकडेवारीवरून पाकिस्तानची भारताशी बरोबरी तर दूरच साधी तुलनाही होणं शक्य नाही. 

१. जीडीपी २०१७ ( Gross Domestic Product- 2017)-

भारत :  २.६ लाख कोटी  डॉलर्स  

पाकिस्तान : ३०४९५.१८  कोटी डॉलर्स 

सध्या भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. तर, पाकिस्तानची अर्थव्यवस्था १५४ व्या क्रमांकावर आहे. आकड्यांमधली तफावत बघता पाकिस्तानने भारताशी बरोबरी करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नाही. भारताचा दरडोई जीडीपी (Per Capita GDP) १९३९.६१ डॉलर असून पाकिस्तानचा १७४५.८५ डॉलर आहे. 

२. परकीय चलन साठा (Foreign Exchange Reserves) –

भारत: ४५४४७० मिलियन डॉलर

पाकिस्तान: ११४८९मिलियन डॉलर 

परकीय चलन साठा म्हणजे देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे (RBI) जमा असलेले परकीय चलन. परकीय चलन परकीय चलन साठा परकीय कर्ज परतफेड करण्याची देशाची क्षमता दर्शवते. सर्वात जास्त परकीय चलन साठा असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताचा ७ व्या तर, पाकिस्तान यामध्ये ७३ व्या क्रमांकावर आहे. 

३. परदेशी कर्ज (Foreign debt) –

भारत: ५२९.७ अब्ज डॉलर्स

पाकिस्तान: रु. २९.८६१ ट्रिलिअन 

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कर्जामुळे नखशिखान्त कर्जात बुडालेला पाकिस्तान, डोक्यावरचा कर्जाचा डोंगर उतरवायला सक्षम आहे असं वाटत नाही. कमी फॉरेन एक्स्चेंज रिझर्व्ह असणारा पाकिस्तान दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल करत आहे, असंच चित्र सध्या दिसत आहे.

४. दरडोई उत्पन्न २०१८ (Per Capita Income 2018)-

भारत: रु. १,१२,८३५ प्रतिवर्ष

पाकिस्तान: रु. १,८०,२०४ प्रतिवर्ष

दरडोई उत्पन्नाच्या पाकिस्तान आघाडीवर असले तरी, भारताच्या लोकसंख्येचा विचार करता ही तफावत फार काही मोठी नाही. 

५. विकास दर २०१९ (Growth Rate 2019)

भारत: ५.८% 

पाकिस्तान: ५.७% 

भारत सध्या विकसनशील देश असला, तरी भारताची अर्थव्यवस्था आणि विकास दर पाहता भारत लवकरच विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल. तर, दुसरीकडे पाकिस्तानला मात्र परदेशी कर्ज, एफडीआय व फॉरेन रिझर्वचा अभाव व त्या प्रमाणात असलेल्या कमी विकास दरामुळे यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यातही कर्जबाजारीपणाचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे.

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/