श्रीमंत मी होणार!

Reading Time: 4 minutesगुंतवणुकीच्या माध्यमातून श्रीमंत होणं ही वेळखाऊ आणि कंटाळवाणी प्रक्रिया आहे. त्यात जर आपल्याला काहीतरी थरार किंवा ‘एक्साईटमेन्ट’ची अपेक्षा असेल तर ती योग्य नाही. मात्र लवकर श्रीमंत व्हायची घाई प्रत्येकालाच झालेली असते. कधी एकदा जादूची कांडी फिरतेय आणि मी श्रीमंत होतो असे झालेले असते. मात्र महामार्गांवर जागोजागी लावलेली ‘अति घाई, संकटात नेई’ सूचना इथेही लागू होते. आपल्या आर्थिक उन्नतीच्या स्वप्नाला फुंकर घालून, भुलवून, परताव्याविषयी अवास्तव, फसवी आश्वासने देऊन आपल्याला अजूनच नुकसानीत घालणाऱ्या गुंतवणूक योजनांची या जगात काही कमतरता नाही. मल्टी-लेव्हल मार्केटींग किंवा पिरॅमिड योजना या त्यातल्या प्रमुख योजना.