शेअर बाजार- आयटी क्षेत्र जोमात तर बँकिंग, वाहन आणि ऊर्जा क्षेत्राला फटका

Reading Time: 2 minutes भारतीय शेअरबाजारात मागील आठवड्याची सुरुवात एका रोमांचक ट्रेंडिंग डे ने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये अस्थैर्य दिसून आले. संपूर्ण सत्रात चढ-उतार पहायला मिळाला. सोमवारी ट्रेंडिंगचा परिणाम असा झाला की, दोन्ही बाजार पुन्हा आपापल्या स्थानी पोहोचले. अखेर सेन्सेक्स ३१,६४८ अंकांवर थांबला तर निफ्टी फ्लॅट होऊन ९,२६१ अंकांवर बंद झाला.