Arthasakshar Sensex & Nifty
Reading Time: 2 minutes

आयटी क्षेत्र जोमात तर बँकिंग, वाहन आणि ऊर्जा क्षेत्राला फटका

भारतीय शेअर बाजारात मागील आठवड्याची सुरुवात एका रोमांचक ट्रेंडिंग डे ने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी (SENSEX NIFTY) या दोन्हींमध्ये अस्थैर्य दिसून आले. संपूर्ण सत्रात चढ-उतार पहायला मिळाला. सोमवारी ट्रेंडिंगचा परिणाम असा झाला की, दोन्ही बाजार पुन्हा आपापल्या स्थानी पोहोचले. अखेर सेन्सेक्स ३१,६४८ अंकांवर थांबला तर निफ्टी फ्लॅट होऊन ९,२६१ अंकांवर बंद झाला. 

कोरोना, कोसळणारा शेअर बाजार आणि सामान्य गुंतवणूकदार !

आयटी क्षेत्र जोमात:  

 • एचसीएल टेक्नोलॉजी, इन्फोसिस आणि माइंडट्रीसारख्या स्टॉक्सला ३ ते ४ टक्क्यांदरम्यान फायदा झाला. 
 • इतर कंपन्या उदा. ३ आय इन्फोटेक, हिंदुजा ग्लोबल, सोनाटा सॉफ्टवेअर आणि अप्टेक अनुक्रमे १९.०५%, ९.९९%, ८.६१% आणि ५.७७% पर्यंत वाढले. 
 • विप्रो आणि टीव्हीएस इलेक्ट्रॉनिक्स आज सुमारे ३ टक्क्यांनी घसरले.

कच्चे खनिज तेल खरेदी केल्याबद्दल खरेदीदाराला पैसे?

पीएसयू बँकांची चढाई:

 • शुक्रवारच्या नफ्यात आणखी वाढ करत पीएसयू बँकांनी सोमवारी एका परफेक्ट बुलरनचा आनंद घेतला. 
 • यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि जे अँड के सारख्या सरकारी बँकांनी (PSB) नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) सुमारे २० टक्क्यांची वाढ घेतली. 
 • इंडियन बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रने अनुक्रमे १६.१८ टक्के आणि १०.०५ टक्क्यांची वाढ घेतली. 
 • निफ्टी पीएसयू बँक इंडेक्समध्ये फक्त एसबीआय ०.३९ अंकांची घसरण घेत बंद झाली. निफ्टी बँक इंडेक्समध्ये एक विरोधाभासी चित्र समोर आले. कारण यात ०.७७ टक्क्यांची घसरण झाली. पीएनबी, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँकसारख्या पीएसबीसह फक्त एचडीएफसीच आज ग्रीन झोनमध्ये क्लोज झाली. 
 • १५ एप्रिल २०२० रोजी निफ्टी बँकेत कोटक बँकेला सर्वाधिक तोटा सहन करावा लागला होता. तसेच एचडीएफसी बँकेचे शेअर्सदेखील ३.५८% नी घसरले होते. याचे वेळी आरबीएल बँकेची ३.३% दरम्यान वृद्धी झाली होती परंतु या आठवड्यात सर्वाधिक ६.५६ टक्क्यांची घसरण झाली  आहे. 
 • आरआयएल, टाटा पॉवर, ओएनजीसी आणि पॉवर ग्रिडमधील घसरणीसह ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सनाही मोठा फटका बसला आहे.

बाजारातील अस्थिरता व जेष्ठ नागरिक

धातूंनी चमक गमावली: 

 • लॉकडाउनचा कालावधीच्या अनिश्चिततेमुळे अनेक मेटलच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
 • देशव्यापी लॉकडाउननंतरही कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. तसेच सरकारी आकड्यांचे संकेत असे आहेत की, मे च्या पहिल्या आठवड्यात हे आकडे अंतिम टप्प्यात पोहोचतील. त्यामुळे लॉकडाउन वाढू शकते. 
 • एस अँड पी बीएसई मेटल इंडेक्समध्ये फक्त नाल्कोने ६.८८ टक्के अधिक सकारात्मक वृद्धी केली. 
 • टाटा स्टील, हिंदुस्तान झिंक, वेदांता, कोल इंडिया आणि सेल सहित इतर लिस्टेड शेअर्स पडले. त्यांचे यात हिंडाल्को अग्रभागी असून शेअरबाजारात ती ६.०५ टक्क्यांनी घसरली.

– श्री अमर देव सिंह

 प्रमुख सल्लागार, एंजल ब्रोकिंग लिमिटेड 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…