Browsing Tag
आर्थिक व्यवहार
5 posts
मित्राला व्यवसायामध्ये आर्थिक मदत करताना लक्षात ठेवा या ६ गोष्टी
Reading Time: 3 minutesआपल्या मित्राला चालू व्यवसाय वाढविण्यासाठी, विस्तारण्यासाठी, अन्य ठिकाणी कार्यालय स्थापण्यासाठी भांडवलाची गरज लागते. त्यावेळी एक मित्र म्हणून त्याला मदत करणे हे आपले कर्तव्य असते. पण असे व्यवहार मैत्रीत करताना भावना व कर्तव्य याचा गोंधळ/ घोळ हमखास होतो. त्यासाठी काही पथ्ये पाळली, तर निष्कारण नंतर होणार मनस्ताप टाळू शकतो. शिवाय मित्राला मदत होऊन त्याचा व्यवसाय व्हायलाही मदत होईल व आपली मैत्रीही अबाधित राहील. अर्थात ही भांडवल उभारणीची मदत डोळे झाकून न करता जर डोळस पणे केली, तर सोन्याहून पिवळे नाहीतर पितळ किंवा कथिलाचा वाळा!
‘आरबिआय’च्या या नवीन नियमांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Reading Time: 2 minutesसध्या ऑनलाईन शॉपिंगचे वेड मेट्रो सिटीपासून अगदी खेडोपाडीही पोचले आहे. अगदी किराणा मालापासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यत सर्व प्रकारच्या खरेदीसाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत. ऑफलाईन व्यवहार करतानाही रोख रकमेपेक्षा ऑनलाईन व्यवहारांनाच ग्राहक जास्त पसंती देत आहेत. रोख रक्कम जवळ बाळगण्यापेक्षा कार्ड पेमेंट व वॉलेट पेमेंटला पसंती दिली जात आहे. पण “सोय तितकी गैरसोय” या म्हणीनुसार काही वेळा ‘Transaction failed” हा मेसेज समोर दिसल्यावर अनेकांचा हिरमोड होतो. एकीकडे खात्यातून पैसे डेबिट झालेले असतात पण लाभार्थीच्या खात्यात मात्र जमा होत नाहीत. अशा प्रसंगी मग नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
Kids Saving Account: मुलांना आर्थिक नियोजन शिकवणारे ‘किड्स सेव्हिंग अकाउंट’
Reading Time: 3 minutesकमी वयातच मुलांना बचतीची सवय लागावी म्हणून आपल्यापैकी कित्येकांच्या पालकांनी एक ‘खाऊच्या पैशाचा गल्ला’ आपल्या हातात आणून दिला असेल. आपणही पालक म्हणून ‘पिग्गीबँक’ मुलांना दिली असेल. या काही वर्षांमध्ये जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आर्थिक साक्षरता आणि बचतीची सवय आपणही आपल्या मुलांना जमेल तितक्या लवकर शिकवली पाहिजे. आता आपल्या लहान मुलांचे बचत खाते उघडण्यासाठी त्यांच्या वयाच्या १८ वर्षे पूर्ण होण्याची वाट पहावी लागणार नाही. आता तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलांचेही बचत खाते उघडू शकता. त्याबद्दल सविस्तर माहिती वाचा-