Home Loan Repayment Options: गृहकर्ज परतफेडीचे हे ६ पर्याय तुम्हाला माहिती आहेत का?
Reading Time: 4 minutes‘लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून (खरेदी करून)’ ही म्हण का प्रचलित झाली असेल ते एखाद्या गृहकर्ज घेतलेल्या व्यक्तीला विचारणं म्हणजे साऱ्या विश्वाचं ज्ञान एका तासात मिळविण्याची संधी आहे. गृहकर्जाची परतफेड करणे म्हणजे दीर्घकालीन बांधिलकी असते. किमान १० ते कमाल ३० वर्षांपर्यंत आपण ईएमआय म्हणजेच हप्त्यांच्या फेऱ्यात अडकून पडलेले असता. याचा परिणाम कर्जदाराच्या एकूणच आर्थिक आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्यावर कळत नकळत होत असतो. परंतु बऱ्याचदा गृहकर्जाशिवाय पर्याय देखील नसतो. अशावेळी कर्जाची पद्धत विचारपूर्वक निवडली तर काही परतफेड अधिकाधिक सुसह्य होऊ शकते.