Loan Repayment
Reading Time: 3 minutes

Loan Repayment Tips

आजच्या लेखात आपण लवकरात लवकर गृहकर्जाची परतफेड करण्यासाठीच्या टिप्सबद्दल (Loan Repayment Tips) माहिती घेणार आहोत. सर्वसामान्य माणूस कर्ज घेतल्या दिवसापासून डोक्यावरचा कर्जाचा भार कधी उतरेल याचा विचार करत असतो. गृहकर्जाची परतफेड हे सामान्य माणसाच्या आयुष्यातले सर्वात मोठे आर्थिक उद्दिष्ट असते.

आपले स्वतःचे घर असावे अशी प्रत्येक मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबाची इच्छा असतेच. हे घराचं स्वप्न साकारण्यासाठी सर्वसामान्यपणे गृहकर्जाची मदत घेतली जाते. अनेक व्यक्ती आर्थिक व्यवस्थापनाच्या मदतीने लवकरात लवकर आपले गृहकर्ज फेडून कर्जमुक्त होतात. सर्वप्रथम लक्षात घ्या की गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही जेवढा जास्त वेळ घ्याल तेवढेच जास्त व्याज तुम्हाला बँकेला द्यावे लागेल. याचाच अर्थ कमी वेळेत कर्जफेड करण्यासाठी तुम्हाला हप्त्यांची रक्कम वाढवून घ्यावी लागेल.आजच्या लेखात गृहकर्जाची लवकरात लवकर परतफेड करण्यासाठी ७ टिप्स कोणत्या याबद्दलची माहिती घेऊया. 

हे नक्की वाचा:  गृहकर्जाची वेळेआधी परतफेड करण्यापूर्वी या ८ गोष्टींचा विचार करा

Loan Repayment Tips: वेळेआधी गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी ७ महत्वाच्या टिप्स 

१. वीस टक्क्यांपर्यंत डाऊन पेमेंट भरा

  • कर्ज घेताना शक्य असल्यास डाऊन पेमेंट साठी मोठी रक्कम द्या 
  • एकूण रकमेच्या किमान 20 ते 30 टक्के रक्कम आधीच देऊन टाका यामुळे तुम्हाला ज्या रक्कमेवर व्याज द्यावे लागणार आहे ती रक्कम म्हणजेच मुद्दल कमी होईल
  • पर्यायाने तुमचे व्याज आणि वेळ देखील वाचेल
  • डाऊन पेमेंटची रक्कम तुमच्या आर्थिक क्षमतेवरती ठरवा.

२. परतफेडीच्या हप्त्यांची रक्कम वाढवा

  • परतफेडीच्या हप्त्यांची रक्कम वाढवल्यामुळे तुमचे कर्ज तर लवकर कमी होईलच पण त्यासोबतच तुमचे बँकेला जास्त प्रमाणात द्याव्या लागणाऱ्या व्याजाची रक्कम देखील नक्कीच कमी होईल. 
  • आधीच सांगितल्याप्रमाणे जेवढा जास्त वेळ तुम्ही कर्ज भरण्यासाठी घ्याल तेवढेच जास्त तुमचे व्याज वाढेल हे लक्षात ठेवा.
  • घर घेत असताना सामान्यपणे प्रत्येक जण क्षमतेपेक्षा मोठ्या रकमेचं कर्ज घेतो त्यामुळे कर्ज घेतल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष तुम्ही ठरवला आहे तेवढाच कर्जाचा हप्ता भरा
  • दोन-तीन वर्षांनंतर मात्र तुमची कमाई नक्कीच वाढलेली असते अशावेळी आपण कर्जाच्या हप्त्यांची रक्कम वाढवु शकतो का याचा नक्कीच विचार करा, कारण जर तुम्ही ती रक्कम अगदी लहान म्हणजेच दोन हजाराने जरी वाढवू शकलात तरी लक्षात घ्या तुमचा कर्ज परतफेडीचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

३. काही रक्कम आधी भरा

  • मित्रांनो, तुमच्याकडे काही कालावधीने जर एखादी मोठी रक्कम जमा झाली तर कर्जाच्या हत्यासोबतच ती रक्कम देखील बँकेत जमा करा यामुळे तुमची कर्जाची मुद्दल रक्कम देखील कमी होईल त्यासोबतच कर्ज परत करण्याचा कालावधी आणि व्याज देखील मोठ्या प्रमाणात कमी होईल.
  • मित्रांनो लक्षात घ्या रक्कम आधी दिल्यामुळे तुम्हाला कुठलाही दंड भरावा लागत नाही. 
  • काही बँक मात्र अशी मोठ्या प्रमाणात कर्जाची रक्कम भरू देत नाहीत त्यामुळे कर्ज घ्यायच्या आधी या गोष्टींचा नक्कीच विचार करा.

विशेष लेख: होम लोन फेडणे कठीण जातंय? मग ‘होम लोन ट्रान्स्फर’ पर्यायाचा विचार करा 

४. कर्ज परत करण्यासाठी कमी कालावधीची निवड करा

  • कर्ज घेतल्यानंतर अनेकजण शक्यतो परतफेडीचा हप्ता कमी रक्कमेचा घेण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात घ्या वर सांगितल्याप्रमाणे यात तुमचा वेळ आणि व्याज देखील अधिक प्रमाणात जाते 
  • त्यामुळे परतफेडीच्या रक्कमेचा हप्ता निवडताना शक्यतो थोडा मोठा निवडा जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्यामध्ये काहीही बदल करायची वेळ येऊ नये.
  • कर्ज परतफेडीचा मोठा हप्ता घेऊन जर तुम्ही वेळेत कर्ज परतफेड केली तर तुमचा क्रेडिट स्कोअर देखील वाढतो 
  • लवकर कर्ज परत केल्यामुळे तुम्हाला भविष्यात कर्ज मिळायला देखील अडचण येत नाही.

५. कमी टक्के व्याजदराने कर्ज देणारी बँक निवडा

  • मित्रांनो अनेक वेळेस असे किस्से ऐकायला मिळतात की काहीही माहिती न घेता एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतले आणि त्याला काही वर्षांनी पश्चाताप झाला की आपण खूप जास्त व्याजदराने कर्ज घेतले आहे आपण घेतलेल्या व्याजदरापेक्षा ही कमी व्याजदरात आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकले असते.
  • कर्ज घ्यायच्या आधी बाजाराची पूर्णपणे माहिती घ्या कुठली बँक कुठल्या व्याजदराने कर्ज देऊ करत आहे याचा अभ्यास करा आणि त्यानंतर सर्वात कमी व्याजदराने कर्ज देणाऱ्या बँके कडूनच कर्ज घ्या.

६. कर्ज परतफेडीचा मासिक हप्ता चुकवू नका

  • आपला कर्ज परतफेडीचा मासिक हप्ता भरायचा राहून जाणे हे अनेक अर्थांनी अडचणीचे ठरू शकते.
  • सर्वप्रथम यामुळे तुम्हाला काही प्रमाणात जास्त टॅक्स भरावा लागू शकतो.
  • या चुकलेल्या मासिक हप्त्यामुळे तुमचा क्रेडिट रिपोर्ट खराब होऊ शकतो व सिबिल स्कोअर देखील कमी होऊ शकतो..
  • मासिक हप्ता भरायचा राहून जाणे ही जरी छोटी गोष्ट वाटत असली तरी भविष्यात तुम्हाला कर्ज मिळवताना या लहान गोष्टीमुळे मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
  •  जर तुमचा सिबिल स्कोअर कमी झाला तर भविष्यात तुमचा कर्जाचा प्रस्ताव नामंजूर देखील केला जाऊ शकतो 
  • तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यात देखील अडचणी निर्माण होऊ शकतात.
  • या सर्व अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी तुमचा मासिक परतफेडीचा हप्ता कधीही कुठल्याही परिस्थितीत चुकू देऊ नका.

७. जागा भाड्याने द्या

  • तुमची काही जागा भाड्याने दिल्यामुळे तुमच्या वरील कर्जाचा आर्थिक बोजा कमी होऊ शकतो किंवा त्या रकमेच्या मदतीने तुम्ही कर्जाच्या परतफेडीचा हप्ता जास्त रकमेने भरू शकता.
  • जर तुम्ही दोन किंवा तीन मजली बांधकाम केलं असेल तर एक मजला तरी नक्कीच भाड्याने देऊ शकता
  • जर एकच मजली घर बांधलेला असेल तर घराचा काही भाग तरी भाड्याने नक्कीच देऊ शकता.

हे नक्की वाचा: गृहकर्ज – लवकर परतफेड की गुंतवणूक?

कर सवलतीचा फायदा 

  • गृहकर्जाची परतफेड करताना कारामध्येही काही सवलती मिळू शकतात. आयकर रिटर्न वेळेवर भरल्यास तुम्हाला करसवलत मिळते.
  • आयकर कायद्याच्या कलम २४ बी, कलम ८० सी आणि कलम ८० ईई नुसार गृहकर्जाचे व्याज व मुद्दलाच्या परतफेडीवर कर सवलत मिळते. 
  • या संदर्भात विस्तृत माहिती मिळवण्यासाठी आपल्या करसल्लागाराचा सल्ला अवश्य घ्यावा

या सर्व टिप्सचा योग्य पद्धतीने अवलंब केल्यास तुम्ही गृहकर्जाच्या परतफेडीत जास्तीचे द्यावे लागणारे व्याज आणि परतफेडीसाठी लागणारा कालवधी दोन्ही वाचवू शकता.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Loan Repayment in Marathi, Loan Repayment Marathi Mahiti, Loan Repayment Tips in Marathi, Loan Repayment Tips Marathi Mahiti, Loan Repayment Tips Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…