माझी कन्या भाग्यश्री योजना
Reading Time: 4 minutesकेंद्र सरकारने फेब्रुवारी २०१४ पासून “बेटी बचाओ-बेटी पढाओ” ही योजनाही सुरु केली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार सदर योजनेसाठी मुलींचे जन्मदर कमी असणाऱ्या भारतातील १०० जिल्ह्यांची निवड करून सदर जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. “बेटी बचाओ-बेटी पढाओ” या योजनेच्या धर्तीवरच मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार निर्माण करणे, मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतीबंध करणे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यसरकारने सध्या सुरु असलेली सुकन्या योजना विलीन करुन “माझी कन्या भाग्यश्री” ही नवीन योजना सुरु केली आहे.