इन्कम टॅक्स रिटर्नच्या ई-व्हेरिफिकेशनच्या ५ सोप्या पद्धती
Reading Time: 2 minutesआत्तापर्यंत आयकर रिटर्न भरल्यानंतर ते व्हेरिफाय करण्यासाठी ITR-V हा फॉर्म म्हणजे ITR फाईल केल्यावर आयकर विभागाच्या साईटवर तयार होणारी पोचपावती (acknowledgement) डाऊनलोड करावी लागत असे. नंतर सदर पावती सही करून सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर म्हणजे सी.पी.सी. बेंगलोरला पाठवावा लागत असे. नाही म्हटलं, तरी ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ होती. आता मात्र ही प्रकिया इलेक्ट्रॉनिकली त्वरित पूर्ण करण्याच्या ५ सोप्या आणि सहज पद्धती उपलब्ध आहेत. याबद्दल अनेकजणांना माहिती नसते.