Money Transfer alert: चुकीच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाल्यास करा हे उपाय

Reading Time: 2 minutes ऑनलाईन व्यवहार करताना चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर होऊ शकतात. चुकीचा क्रमांक टाईप केला जाऊ शकतो. यामुळे बँकेचे व्यवहार, मनी ट्रान्सजॅक्शन  घाईत करू नयेत.  परंतु चुकून चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठवले असल्यास पाठवणाऱ्या व्यक्तीला प्रचंड ताण येतो. त्याच्यासाठी ते संकटापेक्षा कमी नसतं. व्यक्तीला वाटतं की आपले  पैसे कायमस्वरूपी गेले. तीच व्यक्ती कोणत्या कंपनीत किंवा कार्यालयात नोकरी करत असेल आणि त्याच्याकडून दुसऱ्या व्यक्तीचे, त्याच्या कार्यालयाचे किंवा कंपनीचे पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यात गेले असतील तर त्याच्यासाठी ते मोठं संकट असू शकतं. पण घाबरण्याचं कारण नाही, कारण यावर उपाय आहेत. रिझर्व्ह बँकेने याबद्दल काही तरतुदी केल्या आहेत.

१ सप्टेंबरपासून बदललेले आयकराचे ८ महत्वपूर्ण नियम तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes बँक नियमांपाठोपाठ आता करासंबंधित नवीन नियमांची अंमलबजावणीही सुरु करण्यात आली आहे. जुलै २०१९ च्या अर्थसंकल्पात करासंदर्भात काही नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. हे नियम संसदेत प्रस्तावितही करण्यात आले होते. परंतु आता हे बदल याच म्हणजेच सप्टेंबर २०१९  पासून लागू करण्यात आले आहेत.

भारतीय बनावटीचे रूपे कार्ड

Reading Time: 3 minutes व्हिझा/मास्टरकार्ड ची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने २००९ मध्ये एक पाऊल उचलले. भारतीय राष्ट्रीय भरणा महामंडळ (NPCI National Payment Corporation of India ) च्या माध्यमातून एक स्वदेशी कार्ड बाजारात आणायचे ठरवले. त्यानुसार मार्च २०१२ मध्ये अधिकृतरित्या रूपे कार्ड देशभरात बाजारात आणले गेले.Rupee आणि Payment या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून ‘RuPay’ हा शब्द तयार केला गेला. भारतीय बाजारात व्यवहार ग्राहकांना व बँकांना सोयीचे व्हावे म्हणून हे रूपे कार्ड सामान्य (domestic) बाजारात आणले गेले.